इंटरनेटवर ऑनलाईन देवनागरी (मराठी) लिपितून कसे लिहाल?
(महत्वाची सुचना – हा लेख सुमारे वर्षभरापूर्वी लिहिला असून आता अनेक सुधारणांसह ‘बरह १०.२’ आले आहे. याची कृपया हा लेख वाचत असताना नोंद घ्यावी.)
१. ‘बरह’ च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जा.
२. डाव्या बाजूला साईडबारमध्ये ‘Download’ अशी लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा.
३. आता ‘Download Baraha 8.0’ यावर क्लिक करुन फाईल सेव्ह करा.
४. सेव्ह केलेली फाईल इन्स्टॉल करा.
५. स्टार्ट मेनू, ऑल प्रोग्रॅम्स अथवा डेस्कटॉपवरील ‘baraha direct’ च्या आयकॉनवर क्लिक करा.
६. आता ‘बरह’ च्या क्विक लॉन्च आयकॉन वर सिंगल क्लिक करा.
७. Language वर जाऊन marathi वर या आणि unicode सिलेक्ट करा.
८. तुम्ही आता इंटरनेटवर डायरेक्ट ऑनलाईन लिहिण्यासाठी तयार आहात.
९. मराठी लिहिता लिहिता मध्येच कधीकधी इंग्रजी शब्द लिहिण्याची गरज भासते, अशावेळी आत्ताच मी दाबणार आहे त्याप्रमाणे ‘F11’ हे बटन दाबा. की लगेच तुमचे टायपिंग इंग्रजी होऊ लागेल. परत ‘F11’ दाबले की टायपिंग मराठीतून होऊ लागेल. यावेळी तुम्हाला उजवीकडे तळाला असलेला क्विक लॉन्च आयकॉन ‘MAunc’ चा ‘EN’ झालेला आणि ‘EN’ चा पुन्हा ‘MAunc’ झालेला दिसून येईल.
खरं तर अनेक ब्लॉगर्सना हे सारं काही आधिपासूनच माहित असेल, पण हा लेख त्यांच्यासाठी होता जे या क्षेत्रात नवीन आहेत आणि ज्यांना मराठीतून लिहायची मनापासून ईच्छा आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.