ईमेल चे वर्गीकरण करा

पल्या इंबॉक्स मध्ये अनेक मेल येत असतात. काही मेल मित्रांचे असतात, तर काही मेल एखाद्या सर्व्हिसचे असतात, जी आपण सब्स्क्राईब केलेली आहे. अशावेळी आपल्याला आपल्या मेलमध्ये व्यवस्थितपणा आणायचा असेल, सु्टसुटीतपणा आणायचा असेल, तर त्यासाठी आपण आपल्या इन्बॉक्स चे विवध कप्पे करायला हवेत, जिथे प्रत्येक कप्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल व्यवस्थित ठेवू शकतो, त्यांचे वर्गीकरण करु शकतो. आणि असे वर्गीकरण आपल्याला करता येईल लेबल्स च्या माध्यमातून.

अनेक लोक हे जीमेल वापरत असल्याने, नेहमीप्रमाणे मी जीमेलच्या माध्यमातूनच ही गोष्ट स्पष्ट करणार आहे.
१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीमेल खात्यावर जा.
२. एखाद्या विशिष्ट मित्राकडून येणारा किंवा ठराविक कंपनीकडून, वेबसाईटकडून येणारा, कोणताही एक मेल उघडा.
३. त्या मेलच्या वरच्या पट्टीतून Labels या पर्यायावर जा.

लेबल्स (labels) या पर्यायावर जा

४. आता Create new वर क्लिक करा.
५. Please enter a new label name या ओळीच्या खाली दिलेल्या रिकाम्या जागेत, त्या विशिष्ट मित्राचे, कंपनीचे किंवा वेबसाईटचे नाव टाका.
७. आणि आता OK या बटणावर क्लिक करा.
८. The conversation has been labeled “(इथे तुम्ही दिलेले नाव असेल)”, अशी पिवळ्या पट्टीतील ओळ तुम्हाला थोड्या वेळासाठी दिसून येईल. हवं असल्यास त्यापुढील Learn More या पर्यायावर क्लिक करा.

ठिक आहे, तर एका विशिष्ट मित्र / कंपनी / वेबसाईट कडून वारंवार येणार्‍या मेलसाठी, आता तुम्ही एक खास कप्पा तयार केला आहे. शिवाय त्या कप्याला नावही दिलं आहे. वेगवेगळ्या मित्र / कंपनी / वेबसाईट यांच्यासाठी तुम्ही असे कितीही कप्पे (labels) तयार करु शकता, प्रत्येक कप्याला वेगळं नाव असेल.

तयार केलेले सर्व लेबल्स आपल्याला जीमेल पानाच्या डाव्या बाजूला असलेल्या साईडबारमध्ये दिसतील. प्रत्येक लेबल च्या आधी जोडून एक छोटासा बॉक्स असेल, त्यावर क्लिक करुन आपण लेबलचा कलर चेंज करु शकतो, लेबलचे नाव बदलू शकतो किंवा ते डिलीट करु शकतो.

लेबल ला कलर द्या, एडिट करा, डिलीट करा

अशाप्रकारे labels चा वापर करुन आता आपण आपला इन्बॉक्स नीटनेटका, व्यवस्थित केलेला आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.