एकाहून अधिक वेगवेगळ्या ई-मेल आय.डीं. चे इनबॉक्स् एकत्र कसे कराल?

तुमचे एकाहून अधिक ई-मेल आय.डी. आहेत? आणि त्यासाठी तुम्हाला दरवेळी एकाहून अधिक ठिकाणी लॉग इन व्हावं लागतं? जर असं असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण फायनली मला वरील प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. खरं तर माझे खूप सारे ई-मेल आय.डी. आहेत, पण त्यात मला माझ्या दोन ई-मेल आय.डींची गरज अधिक भासायची. आणि वरुन ते दोनही ई-मेल आय.डी. होते जी-मेलचे! त्यामुळे दरवेळेस मला एकातून लॉग-आऊट व्हावं लागायचं आणि मग परत दुस-यात लॉग-इन. मग परत यातून लॉगाअऊट आणि पहिल्यात लॉग-इन. पण पर्वा माझ्या भावाने सहज बोलता बोलता मला यावर उपाय सांगितला आणि माझी मोठी समस्या सॉल्व्ह झाली. तुम्हालाही जर दोन वेगवेगळ्या ई-मेल आय.डीं.चे इनबॉक्स एकत्र करायचे असतील तर ते असे करता येतील.

१. प्रथम तुमच्या जी-मेलच्या त्यातल्या त्यात एका प्रमुख (जो तुम्हाला इनबॉक्स एकत्र करण्यासाठी वापरायचा आहे) ई-मेल आकाऊंटमध्ये लॉग-इन व्हा.
२. वरच्या बाजूला उजवीकडे “settings” वर क्लिक करा.
३. त्यानंतर “Accounts and Import” वर क्लिक करा.
४. chech mail using POP3 च्या समोर “Add POP3 email account” वर क्लिक करा.
५. आपला दुसरा ई-मेल ऍड्रेस टाईप करुन “Next” वर क्लिक करा.
६. आता त्या आकाऊंटची युजरनेम, पासवर्ड वगॆरे माहिती भरुन Label incoming messages ला टिक मार्क करा.
७. “Add Account” वर क्लिक करा. आणि दिलेला कोड व्हेरिफाय करा.
८. आता तुमच्या दुस-या मेलचा इनबॉक्सही तुम्हाला या प्रमुख मेल अकाऊंटमध्ये दिसू लागेल. त्यासाठी खास एक वेगळं लेबलही असेल.
९. settings – Accounts and Inport – Send mail as – Reply from the same address the message was sent to हे option निवडा.
१०. याशिवाय मेल कंपोझ करत असताना From या option समोर दोन मेल अकाऊंट्सचे पर्याय दिसून येतील.

तर मग झाली ना तुमची एक मोठी समस्या दूऽऽऽर…!?

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.