एखाद्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट कसा घ्याल?

आश्चर्य वाटतं पण मला इतके दिवस ही गोष्ट माहित नव्हती की स्क्रिनशॉट घेणं हे इतकं सोपं आहे. आणि हे जेंव्हा मला कळलं, तेंव्हा मला वाटलं की हे मला आधीच का कळलं नाही. म्हणजे समजलं ना!? बरं जाऊ दे! तर स्किनशॉट घेणं म्हणजे तुम्ही तुमच्या वेब ब्राऊजरच्या विंडोमध्ये जी वेबसाईट पहात आहात, तिचा आहे तसा फोटो घेणं. त्यानंतर आपण त्याचा आवश्यक तितका भागही कट करु शकतो.

याची आवश्यकता कधी भासते? जेंव्हा आपल्याला एखाद्या वेबसाईटसोबत किंवा असं म्हणा एखाद्या वेबसाईटच्या सेटिंग्जसोबत काही अडचण येते आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला दुस-याची मदत घेणं आवश्यक बनतं. अशावेळी त्या वेबसाईटचा स्क्रिनशॉट घेऊन आणि तो एखाद्या जाणकाराला दाखवून आपण आपली नेमकी अडचण त्याच्यासमोर मांडू शकतो.

तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर तुम्हाला ऍड-ऑन ची खूपच चांगली मदत होऊ शकेल. मला वाटतं जर तुम्ही ऍड-ऑन्स साठी screenshot असं सर्च केलंत तर तुम्हाला असे बरेच ऍड-ऑन्स मिळतील के जे स्क्रिनशॉट घेण्याकरता मदत करतील. पण मी सध्या वापरत आहे तो ऍड-ऑन आहे fireshot 0.80. तुम्ही हा ऍड-ऑन जरुर इंन्सटॉल करा. याच्या मदतीने तुम्ही एखाद्या वेबसाईचा पूर्ण स्क्रिनशॉट घेऊ शकता आणि त्यानंतर गरज भासल्यास आवश्यक तो भाग कट करुन निराळा ठेवू शकता.

मला वाटतं स्क्रिनशॉट घेतल्यानंतर सिलेक्ट आणि पॉइंटर हे दोनच अधिक महत्त्वाचे ऑपशन्स आहेत. कारण सिलेक्टद्वारे तुम्ही आवश्यक तेव्हढाच भाग सिलेक्ट करु शकता आणि पॉइंटरद्वारे कोणत्या भागात तुम्हाला कोणती अडचण आहे ते तुम्ही सांगू शकता. जसं…या इमेजवर क्लिक करुन ती मोठ्या आकारात पहा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.