ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा

कॅलक्युलेटर हे अनेक प्रकारचे असू शकतात, आपला नेहमीचा स्टँडर्ड क्यॅलक्युलेटर, करंसी कॅलक्युलेटर, टाईम कॅलक्युलेटर ते अगदी लव्ह कॅलक्युलेटर पर्यंत! आज आपण पाहणार आहोत कॅलक्युलेटर.कॉम जिथे अगदी सर्व प्रकारचे कॅलक्युलेटर्स मोफत आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत. इंटरनेट वर सर्फिंग करत असताना आपल्याला अनेकदा कॅलक्युलेटर ची गरज भासू शकते. आपण एखादा आकडा डॉलरमध्ये वाचतो आणि मग त्याचे किती रुपये होतील!? हे… १ = ५० असं गृहित धरुन ठोकठाळ्यानेच मनातल्या मनात काढतो. पण आपल्याला आपल्या उत्तरात अचूकता आणि गतिमानता हवी असेल तर मात्र कॅलक्युलेटर ची गरज भासते. एखादी आकडेमोड करत असताना आपण लहानपणी पाठ केलेले पाढे मनातल्या मनात गाऊ लागतो. गाण्याचा सुर चुकला की मग आहेच… एके, दुणे… म्हणतात ना! पहिले पाढे पंच्चावन्न!

कॅलक्युलेटर, आकडेमोड

आता नेहमीच्या कॅलक्युलेटर बाबत काय बोलू!? ज्यांना प्रत्यक्षात कॅलक्युलेटर चालवता येतं, त्यांना एखाद्या साईटची माहिती सांगत बसण्यात काही अर्थ नाही. ते इतके सुज्ञ आहेत की, वर दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर त्यांना सारं काही समजेल. पण मग आता ही पोस्ट भरवायची कशी!? हा खरा प्रश्न आहे!!! कारण मी जर इथेच थांबलो, तर या पोस्टचा आकार प्रमाणापेक्षा कमी होईल! …असं नाही वाटत तुम्हाला!? चला मग! टाईमपास म्हणून लव्ह कॅलक्युलेटर बाबत बोलू… पण नको! हा एक स्वतंत्र विषय व्हायला हवा. तो मी लवकरच हातात घेईन… मग काय करायचं!? थांबायचं!? आमच्या सरांनी असंच कंटाळून क्लास सोडला की मला आनंद व्हायचा! आणि असा आनंद अधुनमधून बर्‍याचदा मिळायचा. आय होप! तुम्हाला असा आनंद झाला नसेल! झाला तरी काय!? आनंदच झाला ना! मग ठिक आहे!

कॅलक्युलेटर.कॉम च्या मुख्य पानावर एकून पंधरा प्रकारचे कॅलक्युलेटर उपलब्ध आहेत. त्यानंतर त्याखाली विषयानुरुप एक डिरेक्टरी दिली आहे. त्यातील तुम्हाला हव्या त्या विषयानुसार तुम्ही कॅलक्युलेटरची निवड करु शकता. किंवा तुमच्या मनातील एखाद्या शब्दाद्वारेही तुम्ही त्यानुरुप कॅलक्युलेटरचा शोध घेऊ शकता. त्याबाबतचा ‘Search’ हा पर्याय डिरेक्टरीच्या खालीच दिलेला आहे. अशाप्रकारे आपण जर एखाद्या कॅलक्युलेटरचा शोध घेत असाल, तर कॅलक्युलेटर.कॉम हा आपल्या समोरील सर्वोत्तम पर्याय आहे.

प्रश्न पडलाय ना! की मी ‘थांबायचं!’ असं म्हणून परत सांगायला का सुरुवात केली!? कारण आमचे सर देखील असंच करायचे! ‘शिकवायचं थांबवतो’ असं म्हणून परत ‘फक्त १० मि. – १५मि.’ करत शिकवत रहायचे!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.