ऑनलाईन मोबाईल रिचार्ज

तुम्ही ज्या कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरत आहात, त्याच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर सहजतेने तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करता येत असेल, तर ही गोष्ट खूपच छान आहे. पण जर तसं करणं शक्य नसेल… उदा. तुमच्या विशिष्ट बॅंकेचे ऑनलाईन आकाऊंट ते स्विकारत नाहीत… इ.इ. तर त्यासाठी तुम्हाला rechargeitnow.com ही वेबसाईट वापरता येईल. ccavenue चे मर्चंट अकाऊंट ते वापरत असल्याने, भारतातील अगदी कोणत्याही बॅंकेचे ऑनलाईन बॅंकिंक, ए.टी.एम. कार्ड ते स्विकारतात. याशिवाय या वेबसाईटचा वापर करुन तुम्ही डिश टि.व्ही., टाटा स्काय, सन डायरेक्ट यांच्या ‘डायरेक्ट टु होम’ सेवा देखील रिचर्ज करु शकाल.

१. त्यासाठी आधी rechargeitnow.com या वेबसाईटवर रजिस्टर व्हा. साईन-इन करा.
२. mobile, DTH, TATA WALKY यापॆकी काय रिचार्ज करायचे आहे ते निवडा.
३. त्यानंतर ती सेवा पुरवणारा सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. ‘GO’ वर क्लिक करा.
४. त्यानंतर उघडल्या जाणा-या पानावर कितीचा रिचार्ज करायचा आहे ते सांगा. ‘Continue’ वर क्लिक करा.
५. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बॅंकिंग यापॆकी ज्याचा उपयोग तुम्ही पॆशे देण्यासाठी करणार आहात त्याची निवड करा. आणि बॅंकेचे नाव सांगा.
६. ‘टर्मस् आणि कंडिशन्स्’ ना चेक करा. ‘Buy Now’ वर क्लिक करा.
७. त्यानंतर तुमची माहिती असलेला फॉर्म उघडला जाईल. तिथे खाली परत एकदा ‘पेमेंट मोड’ सिलेक्ट करा आणी तो फॉर्म ‘सबमिट’ करा.
८. ‘नेट बॅंकिंक’ बाबत आपल्या बॅंक आकाऊंट मध्ये लॉग-इन व्हा.
९. तुम्हाला पावती दिसेल ती ‘confirm’ करा. छोट्या-मोठ्या ऒपचारिकता पूर्ण करा.
१०. त्यानंतर तुम्ही rechargeitnow वर परताल. तिथे तुमच्या बिलाची पावती असेल, ती तुम्ही प्रिंट करु शकाल.
११. तुमचा मोबाईल रिचार्ज झालेला असेल! साईन-आऊट व्हा.

* मला वाटतं असा ऑनलाईन रिचार्ज पहिल्यांदाच करत असाल, तर तो ५० रु. चाच करुन पहावा. त्यातून तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागतं ते समजेल. आणि पुढच्यावेळी रिचार्ज करताना रिचार्ज करायची अमाऊंट तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाप्रमाणे ठरवावी 🙂 पण फार काळजी करु नये… ही साईट विश्वसनीय आहे. ऍलेक्सा रॅंकिंगमध्ये या वेबसाईटचा भारतीय क्रमांक १२३१ आहे. (ई-सकाळचा ५४९०). यावरुन भारतातील अनेक लोक आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी rechargeitnow ही वेबसाईट वापरतात याबाबत खात्री असावी. तर मग पुढच्यावेळी तुमचा मोबाईल राचार्ज करायची वेळ आली असेल, पण तुमच्याकडे बाहेर जायला वेळ नसेल, अशावेळी ऑनलाईन रिचार्ज हा कदाचीत तुमच्यासमोरील सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.