ऑफर – मोबाईलवर फोटो एडिट करण्यासाठी मोफत साधने!

गेल्या रविवारी NewsHunt वर कोणतेही ईपुस्तक हे केवळ १ रुपया या किमतीत मिळत होते. अशी सहा पुस्तके प्रत्येकास खरेदी करता येणार होती. ‘मेलूहाचे मृत्यूंजय’ या मालिकेतली तीन पुस्तकांचा मिळून असलेला ५५० रुपयांचा संचही त्यादिवशी मला १ रुपयात मिळाला. पण ही माहिती मी केवळ 2know.in ला फेसबुकवर जे लोक फॉलो करतात त्यांच्यापर्यंतच पोहचवू शकलो. कारण वेळही कमी होता आणि एखाद्या ऑफरची माहिती देणं हा लेखाचा विषय ठरु शकत नाही.
तरीही आज एका ऑफरची माहिती देण्यासाठी मी हा लेख लिहित आहे. जे लोक ईमेलने 2know.in चे लेख वाचतात, त्यांनाही या ऑफर बाबत समजावे, हा या लेखामागचा उद्देश आहे. पण माझी सर्व वाचकांना अशी विनंती आहे की, आपण 2know.in चे फेसबुक पेज लाईक करावे, जेणेकरुन आपणास एखादी ऑफर किंवा महत्त्वाची माहिती ही मला सहजतेने सांगता येईल. कारण प्रत्येक छोट्या-मोठ्या ऑफर साठी एक स्वतंत्र लेख लिहिने शक्य नाही. आपण जर फेसबुक वापरत नसाल, तर गूगल प्लस किंवा ट्विटरवर 2know.in ला फॉलो करता येईल. ज्यांना Google Hangouts या मेसेंजर वरुन नवीन माहिती हवी असेल, त्यांनी या इथे जाऊन आपल्या ईमेलची नोंद करावी.
—————————————————————–
आज मला Aviary या स्मार्टफोन वरील फोटो एडिटींग अ‍ॅप बाबत सांगायचं आहे. Aviary या अ‍ॅपचे नुकतेच Adobe मध्ये विलिनीकरण झाले आहे. आपण Adobe Photoshop, Adobe Reader मुळे Adobe हे नाव ऐकलेच असेल. तर Adobe मध्ये विलिनीकरण झाले यानिमित्त Aviary ने आपल्या युजर्सना एक चांगली ऑफर दिली आहे. त्यामध्ये आपणास Aviary वरील सर्व फोटो इफेक्टस आणि फोटो एडिटींगची इतर साधने ही पूर्णतः मोफत दिली जाणार आहेत.
त्यासाठी सर्वप्रथम Avairy हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. अँड्रॉईड फोन आणि आय फोन अशा दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन्स साठी हे अ‍ॅप उपलब्ध आहे. अँड्रॉईड फोन वापरणारे लोक गूगल प्ले स्टोअर मधून हे अ‍ॅप इन्स्टॉल करु शकतात. जे लोक आधिपासूनच Avairy हे अ‍ॅप वापरत आहेत, त्यांना हे अ‍ॅप अपडेट करावे लागेल. 
आता Aviary ओपन करा. या अ‍ॅपच्या पर्यायांमध्ये (Options) जा. आपण जर Adobe चे पूर्वीपासूनच सदस्य असाल, तर Sign in करा, नाहीतर Sign Up करुन Aodbe ID तयार करा. म्हणजेच Adobe चे सदस्य बना. या अ‍ॅपच्या अगदी वर उजव्या बाजूस एक चिन्ह दिसेल, त्यावर टच करा किंवा या अ‍ॅपच्या Options मध्ये जाऊन GO TO SHOP वर टच करा.

Aviary फोटो एडिटर
ऑफर – Aviary फोटो एडिटर शॉप

Aviary Supply Shop मधून आपल्याला हवे असलेले कोणतेही Effects, Frames, Stickers आणि Overlays हे Free वर टच करुन मोफत इन्स्टॉल करता येतात. शॉपमध्ये असलेले सर्वकाही इन्स्टॉल करण्यासाठी साधरणतः ३५० एमबी इन्टरनल मेमरीची गरज भासते. तेंव्हा आपल्या फोनमध्ये आवश्यक इन्टरनल मेमरी असल्याची खात्री करुन घ्या व त्यानंतर फोटो एडिटींगची ही सर्व साधणे इन्स्टॉल करा. मोबाईल इंटरनेट वापरत असाल, तर आपला डेटा प्लॅन पुरेसा असल्याची खात्री करायला विसरु नका. 

ही सर्व साधने एकदा इन्स्टॉल केल्यानंतर कायमस्वरुपी आपलीच राहतील. ही सवलत केवळ ६ जानेवारी २०१५ पर्यंतच उपलब्ध असेल. 
—————————————————————–
यापुढे मी माझे काही नवीन महत्त्वाचे मराठी लेख हे PDF आवृत्तीत प्रकाशित करणार आहेत. त्यामुळे हे लेख आपल्याला डाऊनलोड करता येतील किंवा मित्रांना सहजतेने पाठवता येतील. प्रत्येक लेख डाऊनलोड करण्यासाठीची स्वतंत्र लिंक ही 2know.in च्या फेसबुक पेजवर देण्यात येईल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 2know.in चे फेसबुक पेज लाईक करावे लागेल व त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे Only for Likers या अ‍ॅपवर क्लिक करुन लेख डाऊनलोड करता येतील. पण त्याठिकाणी केवळ 2know.in चे लेख न ठेवता, इतरही काही महत्त्वाचे साहित्य हे खास 2know.in च्या वाचकांसाठी उपलब्ध असेल. उदाहरणार्थ, Only for Likers मधून आपणास ‘इंटरनेट गुरु’ चा पहिला अंक डाऊनलोड करुन वाचता येईल. PDF आवृत्तीतील नवीन लेख उपलब्ध झाल्याची सुचना ही फेसबुक पेजवरच देण्यात येईल. त्यामुळे 2know.in चे फेसबुक पेज लाईक करायला अजिबात विसरु नका.

2know.in चे फेसबुक पेज
महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी 2know.in चे फेसबुक पेज लाईक करा
आपण जर हा लेख ईमेलने वाचत नसाल आणि आपल्याला पुढील लेख हे ईमेलने वाचायचे असतील, तर इतर ४००० हून अधिक लोकांप्रमाणे 2know.in ला ईमेलने सब्स्क्राईब करा. आपण जर हा लेख जीमेलवर वाचत असाल, तर या मेलच्या उजव्या बाजूस आपल्याला माझी गूगल प्लस प्रोफाईल दिसेल, Add to circles वर जाऊन आपल्याला मला फॉलो करता येईल. काही शंका असतील, तर या मेलला Reply करा, किंवा 2know.in॒@gmail.com वर मेल करा. 
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.