ऑर्कुटवर मोफत जाहिरात करा

क दोन वर्षांपूर्वी आर्कुटवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या, पण त्यानंतर वरच्या कोपर्‍यात उजव्या बाजूला ऑर्कुटद्वारे गुगलच्या जाहिराती दाखवल्या जाऊ लागल्या. या जाहिरातींमुळे मित्रांची यादी थोडीशी खाली गेली. असो! त्यानंतर मात्र ऑर्कुटने आपल्यालाही त्या तिथे मोफत जाहिरात करण्याची संधी दिली. जिचा आपण फारच चांगल्या प्रकारे उपयोग करुन घेऊ शकतो.

ऑर्कुटच्या मराठी भाषांतरात ‘promote’ च्या ठिकाणी ‘जाहिरात करा’ हा शब्द वापरला आहे. म्हणून मी ‘ऑर्कुटच्या जाहिराती’ असा या इथे उल्लेख करत आहे. बाकी ऑर्कुटच्या जुन्या आवृत्तीत ‘प्रोस्ताहित करा’ असा ही शब्दप्रयोग वापरल्याचं दिसून येतं.

ठिक आहे! तर इंटरनेटवरील एखादे पान ऑर्कुटवर ‘प्रमोट’ कसे करायचे!? ते आपण मागील एका लेखाद्वारे पाहिले आहे. त्यात Share on orkut या बटणाबाबत माहिती देण्यात आली होती. ‘शेअर ऑन ऑर्कुट’ या बटणाचा वापर केल्याने आपण इंटरनेटवरील कोणत्याही पानाची जाहिरात क्षणार्धात तयार करु शकतो. त्यासाठी ‘शेअर ऑन ऑर्कुट’ हे बटण आपल्या वेब ब्राऊजर वर घ्या. आणि त्यानंतर आपल्या वेब ब्राऊजरमध्ये इंटरनेटवरील ‘ते’ पान उघडा, ‘ज्या’ पानाची जाहिरात आपल्याला ऑर्कुटवर करायची आहे. जसं समजा मी 2know.in हे पान उघडलं आहे. आता मी माझ्या वेब ब्राऊजरच्या वरच्या बुकमार्क बारमधील ‘Share on orkut’ या बटणावर क्लिक करणार! त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यात promote to your friends हाही एक पर्याय असेल. त्याला अधीपासूनच टिक मार्क केलेलं असेल, त्याला तसंच राहू द्या. आणि आता Share वर क्लिक करा! झाली तुमची जाहिरात तयार!

जाहिरात तयार करण्याचा दुसरा पर्याय म्हणजे…
१. सर्वात आधी orkut.com वर जा. (मी ‘मराठी भाषेतील ऑर्कुट गृहित धरुन पुढील माहिती सांगत आहे.)
२. प्रोफाईल, स्क्रॅप, फोटो, व्हिडिओ या रांगेत शेवटी ‘अधिक’ हा पर्याय दिलेला आहे, त्यावर जा.
३. ‘अधिक’ या पर्यायावर आपल्या माऊसचा कर्सर नेल्यानंतर येणार्‍या पर्यायांच्या रांगेत ‘जाहिरात करा’ हा एक पर्याय आपल्याला दिसून येईल. (इंग्लिश ऑर्कुट वापरणार्‍यांना more मध्ये promote हा पर्याय दिसून येईल.) त्यावर क्लिक करा.
४. आता जाहिरात तयार करत असताना आपल्या जाहिरातीला योग्य असे एक ‘शीर्षक’ द्या. ‘टिप्पणी’ या पर्यायाद्वारे आपल्या जाहिरातीबाबत थोडक्यात माहिती सांगा. शेवटच्या ‘सामग्री’ या पर्यायाद्वारे तुम्ही एखादा फोटो (प्रतिमा) किंवा यु ट्युब व्हिडिओ आपल्या जाहिरातीला जोडू शकता.
५. योग्य अशी जाहिरात तयार केल्यानंतर सर्वात शेवटी ‘जाहिरात तयार करा’ या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमची जाहिरात ऑर्कुटवर प्रसारीत झालेली असेल.

तुम्ही अशा कितीही जाहिराती तयार करु शकता. आणि त्याच पानावर दिलेल्या ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायाद्वारे तुम्ही त्या जाहिराती सांभाळू शकता! म्हणजेच त्यांत बदल करु शकता किंवा त्यांना हटवू शकता, डिलीट करु शकता.

याशिवाय ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायाद्वारे तुम्ही, ‘तुमची जाहिरात किती वेळा पाहिली गेली?’, ‘किती वेळा त्या जाहिरातीतील लिंकवर क्लिक केले गेले?’, ‘किती जणांनी तुमच्या जाहिरातीची जाहिरात केली?’ म्हणजेच ती प्रमोट केली! तर ‘किती जणांनी ती डिलीट करुन टाकली?’ म्हणजेच किती जणांनी तिला कचर्‍याची पेटी दाखवली!?, हे सारं काही तुम्ही जाणून घेऊ शकता! त्यासाठी ‘जहिरात करा’ या पानावरील ‘माझ्या जाहिराती’ या पर्यायावर जा.

तुमची जाहिरात प्रथम तुमच्या ऑर्कुटमधील मित्रांच्या मुख्य पानावर ‘गुगलच्या जाहिराती’ दाखवल्या जातात त्या तिथे अधुनमधून दाखवली जाईल! जर तुम्ही केलेली जाहिरात तुमच्या मित्राला आवडली, तर तो ती जाहिरात त्या तिथेच दिलेल्या पर्यायाद्वारे ‘प्रमोट’ करेल! म्हणजेच तिचा ‘प्रचार’ करेल! आणि जर त्याला ती जाहिरात आवडली नाही, तर तो तिला कचर्‍यात टाकेल, डिलीट करेल! समजा जर तुमच्या मित्राने तुमच्या जाहिरातीचा प्रचार केला, तर तुमच्या मित्राच्या ऑर्कुट फ्रेंड सर्कल मध्ये ती जाहिरात सर्वत्र दाखवली जाईल. अशाप्रकारे तुमच्या जाहिरातीचा ऑर्कुटवर प्रचार होत जाईल. ती जाहिरात ऑर्कुटवर पसरत जाईल!

खाली दिलेला व्हिडिओ देखील तुम्हाला कदाचीत या कामात मदत करु शकेल.

चांगल्या सामाजिक कारणांसाठी देखील आपण ‘ऑर्कुट प्रमोट’ चा उपयोग करु शकतो. खरं तर त्याच कारणासाठी ‘ऑर्कुट प्रमोट’ चा अधिक उपयोग होऊ शकतो!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.