ऑर्कुट वर इमेज, प्रतिमा, चित्र स्क्रॅप म्हणून टाकण्याबाबत माहिती

वीन ऑर्कुटमध्ये देण्यात आलेली एक सुविधा मला फार आवडते. ती म्हणजे, आपण आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर जाऊन एखादे सुंदर चित्र क्षणार्धात स्क्रॅप म्हणून टाकू शकतो. आधी कसं व्हायचं!? तर ते चित्र कॉपी आणि मग पेस्ट करावे लागायचे. किंवा html कोडच्या सहाय्याने एखादे ग्राफिक आपण स्क्रॅप करु शकत होतो. पण या नवीन सुविधेच्या सहाय्याने आपल्या मित्राला चित्र, प्रतिमा स्क्रॅप करणं हे आता अतिशय सोपं झालं आहे.

आता मी ऑर्कुटवर जात आहे. तिथे मी माझ्या मित्राला एक चित्र स्क्रॅप करेन. आणि हे सारं करत असतानाच तुम्हाला त्याबाबची कृती सांगत जाईन.

१. मी माझ्या ऑर्कुटच्या मुख्य पानावर आलो आहे.
२. आता उजव्या बाजूच्या my friends या विभागातून माझ्या मित्राची निवड केली आहे. म्हणजेच त्याच्या नावावर क्लिक करुन मी त्याच्या प्रोफाईलवर आलो आहे.
३. त्याच्या स्क्रॅपबॉक्स च्या रिकाम्या चौकटीत क्लिक करताच स्क्रॅपबॉक्स वर मला काही पर्याय दिसू लागले आहेत. खाली मी स्क्रॅपबॉक्स आणि त्यावरील पर्यायांचे चित्र देत आहे.

ऑर्कुटचा स्क्रॅपबॉक्स आणि त्यावरील पर्याय
Insert Images या पर्यायाचे चिन्ह असे दिसेल

४. यापैकी insert images या पर्यायाची मी निवड केली आहे. म्हणजेच स्क्रॅपबॉक्स वरील पर्यायांमध्ये असलेल्या एका लोगोची मी निवड केली आहे. तो लोगो, ते चिन्ह कसे दिसते!? ते मी शेजारी देत आहे.
५. त्यानंतर एक नवीन विंडो उघडली गेली आहे. त्या तिथे दिलेल्या तीन पर्यायांद्वारे चित्र कुठून घ्यायचे ते आपण ठरवू शकतो.
६. पहिला पर्याय आहे तो, आपल्या संगणकावरुन चित्र, प्रतिमा घेण्याचा. त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे संगणकावरुन चित्राची फाईल ब्राऊज आणि अपलोड करावी लागेल.
७. दुसरा पर्याय देण्यात आला आहे तो पिकासा वेब अल्बमचा. आपल्या पिकासा वेब अल्बममध्ये काही सुंदर प्रतिमा असतील, तर आपण त्या तिथून घेऊ शकता.
८. तिसचा पर्याय आहे तो गुगल इमेज सर्चचा. आणि हा पर्यायच खरं तर खूप महत्त्वाचा आहे. कारण वरील दोन पर्यायांद्वारे आपण केवळ आपल्या संग्रहातील चित्रांचा स्क्रॅप म्हणून वापर करु शकतो. पण गुगल इमेज सर्चच्या सहाय्याने आपण आपल्या मनातील शब्दांना चित्राचे स्वरुप देऊ शकतो. कारण इथे चित्रांचा, प्रतिमांचा खूप मोठा साठा आहे.
९. मी तिसर्‍या पर्यायाची निवड करत Google Image Search ची निवड केली आणि त्या तिथे दिसणार्‍या सर्च बॉक्स मध्ये nature असं टाईप करुन Search Images या बटणावर क्लिक केलं. आता माझ्यासमोर निसर्ग प्रतिमांचा गुगलचा संग्रह उघडला गेला आहे.
१०. त्यापैकी मला भावलेल्या प्रतिमेवर माऊसच्या सहाय्याने मी क्लिक केलं. आणि त्यानंतर खाली Select या बटणावर क्लिक करताच, स्क्रॅपच्या रिकाम्या चौकटीत मला मी निवडलेली प्रतिमा दिसू लागली आहे.
११. Post या बटणावर क्लिक केल्यानंतर “Please enter the text as it is shown in the box.” अशी सुचना घेऊन एक बॉक्स त्या चित्राखाली आला आहे. कधी हा बॉक्स येईल तर कधी येणार नाही. आता मात्र तो बॉक्स आला आहे. त्या बॉक्स मध्ये दिलेले शब्द मी त्याखाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत टाकत आहे.
१२. आणि आता पुन्हा एकदा Post या बटणावर क्लिक करताच मी निवडलेले चित्र माझ्या मित्राच्या स्क्रॅपबुकमध्ये दिसू लागले आहे.

अशाप्रकारे आपण आपल्या मित्राच्या स्क्रॅपबुकमध्ये मनाला भावलेल्या सुंदर प्रतिमा अगदी सहज रितीने टाकू शकता. आणि कधीकधी शब्दांपेक्षा प्रतिमाच काही अधिक सांगून जातात.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.