गुगल ट्रेंड्स वापरुन लोकांचा एकंदरीत कल जाणून घ्या

लोक सर्च इंजिनचा वापर करुन कोणत्या शब्दाचा सर्वाधिक शोध घेतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल-नसेल काही हरकत नाही, आता मी विचारल्यानंतर त्याबाबत थोडीफार उत्सुकता तरी वाटली असेलच! गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून कोणती माहिती जाणून घेण्यात जागातील लोकांना अधिक रस आहे!? हे आपल्याला समजू शकेल ‘गुगल ट्रेंड्स’ या साईटचा वापर करुन!

१. चला मग! ‘गुगल ट्रेंड्स’ या साईटवर जाऊयात!
२. तिथे एक रिकामे खोके दिले आहे, सर्च बॉक्स! त्या तिथे मी टाकत आहे… esakal, lokmat, loksatta, pudhari, maharashtratimes
३. Search Trends वर क्लिक केलं.
४. त्यानंतर खाली चित्रात दिखवलेला आलेख मला दिसून आला.

मराठी वर्तमानपत्र – आलेख

५. हा आलेख पाहून हे स्पष्ट होतं की गुगल सर्च इंजिनचा वापर करुन सर्च करत असताना लोक ‘lokmat’ या शब्दाला सर्वाधिक पसंती देतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो esakal, loksatta, pudhari आणि शेवटी maharashtratimes यांचा! म्हणजेच सर्वसाधरणपणे सांगायला गेलं तर, लोक ‘लोकमत’ ला अधिक पसंती देतात! त्यानंतर क्रमांक लागतो ‘सकाळ’ या वर्तमानपत्राचा.

अशाप्रकारे कोणत्याही विषयासंबंधी आपण लोकांचा ‘शोध घेण्याविषयक’ एकंदरीत कल जाणून घेऊ शकतो.

प्रत्येक देश, प्रत्येक शहर, प्रत्येक भाषा यांचा विचार करुनही आपल्याला ट्रेंड्स ची पाहणी करता येते! जसं वर दिलेल्या आलेखाखाली मला खाली चित्रात दाखवलेली माहिती आढळून आली.

मराठी वर्तमानपत्र – तक्ता

वर दिलेला स्क्रिनशॉट घेताना प्रत्येक शब्दासाठी वेगवेगळे रंग येत नाहीयेत! तरीही एक कल्पना असावी म्हणून वरचे चित्र देत आहे. तुम्ही स्वतः ‘मी सर्च केलं तसं’ सर्च करुन पहा! तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल!

तर यावरुन मला हे समजू शकतं की पुण्यात esakal ला पसंती दिली जाते, तर मुंबईत lokmat ला! esakal ला भारता खालोखाल अमेरीका आणि UAE मध्ये अधिक पसंती दिली जाते. आणि असं बरंच काही आपण जाणून घेऊ शकतो.

सर्च करत असताना तुम्ही जो शब्द आधी टाकाल त्यानुसार ‘सर्च रिझल्टस्‌’ ची, आलेखांची, तक्त्यांची मांडणी झालेली आपल्याला दिसून येईल. जसं esakal, lokmat, loksatta, pudhari, maharashtratimes हे टाईप करत असताना मी esakal हा शब्द आधी टाकला! जर मी lokmat, esakal, loksatta, pudhari, maharashtratimes असं करुन lomat ला आधी टाकलं असतं, तर येणारे रिझल्टस्‌ lokmat नुसार सॉर्ट केलेले आलेख आणि तक्ते घेऊन आले असते!

बाकी त्या पानाच्या वर उजव्या बाजूला दिलेल्या पर्यायांचा वापर करुन आपण वर्षानुसार, विशिष्ट काळानुसार आणि देशानुसार ट्रेंड्सची पाहणी करु शकतो. याशिवाय आपण ज्या शब्दांचा शोध घेत आहोत, त्या शब्दांशी संबंधीत विविध वर्तमानपत्रांतील बातम्या आपल्याला त्या पर्यायांखाली दिसून येतील.

अशाप्रकारे ‘गुगल ट्रेंड्स’ चा वापर आपण मनोरंजन, ज्ञान किंवा व्यवसायिक मदत अशा कोणत्याही स्वरुपात करु शकता.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.