गुगल बुकमार्कस्
इंटरनेटवर एखादे पान किंवा एखादी वेबसाईट आपल्याला आवडते. अशावेळी ते पान आपल्याला कायमस्वरुपी संग्रहीत करायचे असेल, तर आपण त्या पानावर जायचा पत्ता साठवून ठेवू शकतो. असा पत्ता आपण अनेक ठिकाणी साठवू शकतो, उदाहरणार्थ आपल्या वेब ब्राऊजरमध्ये तुम्ही बुकमार्कस् सेव्ह करुन ठेवू शकता. ऑनलाईन बुकमार्कस् सेव्ह करण्यासाठी देखील अनेक साईट्स आहेत. जसे की, स्टंबलअपॉन, डिग इ.
एखादे पान बुकमार्क करण्याचा फायदा म्हणजे, एक तर आपण आपल्या आवडत्या पानापर्यंत अगदी सहज पोहचू शकतो. आणि दुसरं असं की, आपण आपले आवडते पान आपल्या मित्रांबरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर शेअर करु शकतो. आपण आपल्या ऑनलाईन अनुभुतीचा एक चांगला संग्रह करु शकतो, जो आपल्या आवडीच्या कामाच्या दृष्टिनेही महत्त्वाचा असेल.
आजकाल बहुतेक प्रत्येकाने जीमेल अकाऊंट म्हणजेच गुगल अकाऊंट काढलेले आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की, गुगलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडत्या पानाचे ऑनलाईन बुकमार्कींग कसे करता येईल!?
गुगल बुकमार्कस् |
१. https://www.google.com/bookmarks हा गुगलच्या बुकमार्किंग विभागाचा पत्ता आहे. इथे आपण आपले आवडते पान साठवू शकतो.
२. बुकमार्किंगच्या पानावर Tools मध्ये Add Bookmark नावाचा पर्याय आहे. इथून आपण आपल्या आवडत्या पानाचा पत्ता देऊन तो साठवू शकतो. किंवा आपण ज्या पानावर आहात तिथे गुगल बुकमार्कींग ची सोय असेल, तर आपण डायरेक्ट त्या पर्यायावर क्लिक करुन ते पान साठवू शकतो. उदा. या लेखाच्या खाली शेअरींगचे Add This बटण दिलेले आहे, त्याचा उपयोग करुन आपण हे पान गुगल बुकमार्कस् मध्ये साठवू शकतो.
३. आपण आत्तापर्यंत इतरत्र साठवलेले बुकमार्कस् इंम्पोर्ट या पर्यायाचा वापर करुन गुगल बुकमार्कस् मध्ये आणू शकतो, किंवा गुगल बुकमार्कस् मध्ये समाविष्ट असलेले बुकमार्कस् एक्सपोर्टच्या सहाय्याने दुसरीकडे हलवू शकतो.
४. गुगल बुकमार्कस् मध्ये आपण lists च्या सहाय्याने आपल्या बुकमार्कस् चे वर्गीकरण करु शकतो.
इंटरनेटवरील ऑनलाईन पानांचा एक चांगला संग्रह तयार करण्यासाठी आपण ‘गुगल बुकमार्कस्’ चा उपयोग करुन घेऊ शकतो.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.