नवीन ब्लॉगरचे टेम्प्लेट सेटिंग

काल आपण गुगलचे बदलते स्वरुप आणि जीमेलचे नवे रुप याबाबत थोडक्यात माहिती पाहिली होती. मागील काही दिवसांपासून ब्लॉगरच्या रुपातही अमुलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून आला असेल. आज आपण नवीन ब्लॉगर मध्ये टेम्प्लेट कस्टमाईझ करणे, टेम्प्लेटचा बॅकअप घेणे, टेम्प्लेट रिस्टोअर करणे, टेम्प्लेटचे HTML एडिटिंग करणे, या गोष्टी कुठून करता येतील? हे पाहणार आहोत. यापूर्वी ‘ब्लॉगर’ संबंधित लिहिले गेलेले लेख हे ब्लॉगरच्या जुन्या रुपाच्या अनुषंगाने लिहिले गेले आहेत, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. ब्लॉगरने आपले रुप पालटल्याने इंटरनेट वरील ब्लॉगर संबंधीत सगळे स्क्रिनशॉट्स आणि लेख आता मागे पडले (Outdated) आहेत. जाणत्या ब्लॉगरसाठी ही समस्या नसली, तरी अगदी नवख्या, शिकणार्‍या ब्लॉगरला ही समस्या जाणवू शकते. ब्लॉगमधील पर्यायांच्या जागा जरी नवीन ब्लॉगर मध्ये बदलल्या असल्या, तरी बहुतांश पर्याय तेच आहेत, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे या जुन्या लेखांचा विचार करावा.

नवीन ब्लॉगरचे टेम्प्लेट सेटिंग: टेम्प्लेट चा बॅकअप घेणे, रिस्टोअर करणे, HTML एडिट करणे, आणि टेम्प्लेट बदलून आपल्या ब्लॉगचे रंगरुप बदलणे, या गोष्टी कुठून करता येतील?

टेम्प्लेट चा बॅकअप घेणे आणि टेम्प्लेट रिस्टोअर करणे:

ब्लॉग डॅशबोर्ड वर जायचा दुवा
ब्लॉगर टेम्प्लेट

१. आपल्याला ज्या ब्लॉगच्या टेम्प्लेट सेटिंग मध्ये बदल घडवायचे आहेत, त्या ब्लॉगच्या ‘डॅशबोर्ड’ मध्ये प्रवेश करा. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ‘घराच्या’ चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपला त्या ब्लॉगच्या डॅशबोर्ड मध्ये प्रवेश होईल.
२. एकदा टेम्प्लेट या विभागात प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर टेम्प्लेट बदलण्यासंदर्भात चार पर्याय आहेत.
पर्याय एक: Customize हा दुवा वापरुन सद्यस्थितीतील टेम्प्लेट मध्ये रंग, शब्दांचे आकार आणि प्रकार, विजेटचे आकार, आणि लेआऊट यामध्ये आपल्या मनाजोगे बदल घडवता येतात. असं केल्याने आपल्या ब्लॉगला सहजगत्या एक वेगळेपण प्राप्त होऊ शकते.
पर्याय दोन: खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे Customize च्या खाली आपल्याला काही आयत्या टेम्प्लेट्स दिसून येतील. त्याही आपण आपल्या ब्लॉगला देऊ शकतो आणि परत त्यांचे Customization पण करु शकतो.

आहे त्या टेम्प्लेटला मध्ये बदल घडवा (Customize) अथवा त्याखाली दिलेल्या टेम्प्लेट पैकी एकाची निवड करा

पर्याय तीन: तिसर्‍या पर्यायात आपण ब्लॉगला बाहेरुन एखाद्या साईटवरुन घेतलेले ब्लॉगर टेम्प्लेट देऊ शकतो. चित्रात आपल्याला त्याबाबतची माहिती दिसून येईल.
पर्याय चार: आपण जर स्वतः HTML एडिटिंग करु शकत असाल, तर थेट टेम्प्लेट एडिटिंगच्या माध्यमातून आपण आपल्या ब्लॉगचे रुप पालटू शकाल. याकरीता आपल्याला HTML एडिटिंग यायलाच हवं, असंही काही नाही. कारण बाहेर अनेक इंग्रजी, मराठी साईट्सवर सोप्या पायर्‍यांच्या (Steps) माध्यमातून ब्लॉगमध्ये विशिष्ट बदल घडविण्यासाठी कसे HTML एडिटिंग करावे लागेल!? याबाबतची माहिती दिलेली असते. तर अशी माहिती आपण वाचत असाल, आणि आपल्याला HTML एडिटिंग करायचे असेल, तर ते आपल्याला इथून करता येईल.

ब्लॉगर : बॅकअप, रिस्टोअर, एडिट HTML

HTML एडिटिंग करताना आपल्याकडून कधी काही चुक होऊ शकते किंवा असं कोणतंही कारण न सांगता येऊ शकते की, ज्यामुळे आपल्याला आपल्या ब्लॉगचं टेम्प्लेट गमवावं लागू शकेल, आणि म्हणूनच आपल्या ब्लॉगच्या सद्यस्थितीतील टेम्प्लेटचे बॅकअप आपल्या संगणकावर असणे हे कधीही श्रेयस्कर! ठराविक कालावधी दरम्यान किंवा टेम्प्लेट मध्ये एखादा बदल केल्यानंतर वारंवार आपल्या ब्लॉगर ब्लॉगच्या टेम्प्लेटचे बॅकअप आपल्या संगणकावर घेत चला. तो कसा घेता येईल? ते आपण वरील चित्रामध्ये पाहू शकतो.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.