पूर्वनियोजीत वेळेवर ट्विट, स्टेटस अपटेड करा

फेसबुक किंवा ट्विटरवर काहीतरी शेअर करत असताना ते त्याच वेळी शेअर केले जाते जेंव्हा आपण ‘पोस्ट’ किंवा ‘ट्विट’ करतो. फेसबुक किंवा ट्विटरवर पूर्वनियोजीत वेळेवर एखादी गोष्ट शेअर करण्याची सुविधा उपलब्ध नाही. आपणास भविष्यातील एखाद्या विशिष्ट वेळी आपल्या परस्पर स्टेटस अपडेट करायचे असेल, ट्विट करायचे असेल, तर त्यासाठी त्यासंदर्भातील एका वेगळ्या माध्यामाची गरज आहे. ‘बफर’ ही एक अशी ऑनलाईन सेवा आहे की जी आपणास या कामात मदत करते. सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचा, सेवांचा प्रचार करणार्‍यांसाठी ही सेवा खास करुन अधिक उपयुक्त आहे.

‘बफर’ सेवेचा वापर कसा करावा?

  1. bufferapp.com वर जा आणि त्यावर आपले खाते (register) उघडा.
    बफर सोशल नेटवर्क अपडेट
    ‘बफर’वर सोशल नेटवर्कशी जोडले जा
  2. ट्विटर, फेसबुक, गुगल प्लस, लिंक्डइन या सोशल नेटवर्कवरील आपली खाती आपणास ‘बफर’शी जोडता येतील.
    ‘बफर’चा वापर करुन पूर्वनियोजीत वेळेवर ट्विट, स्टेटस अपडेट करा
  3. चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या मनात आहे ते दिलेल्या जागी लिहा, त्याची प्रकाशनाची पूर्वनियोजीत वेळ ठरवा आणि ‘बफर’ (Buffer) करा! मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.

सर्व सोशल नेटवर्कस्‌वर एकत्रितपणे एखादे स्टेटस पोस्ट करण्यासाठी देखील ही सेवा उपयुक्त आहे. अशावेळी आपणास प्रत्येक सोशल नेटवर्क उघडून त्या ठिकाणी तेच स्टेटस अपडेट करावे लागणार नाही. प्रत्येक सोशल नेटवर्कसाठी आपण ठरवून दिलेल्या पूर्वनियोजीत वेळेवर ते स्टेटस त्या सोशल नेटवर्कवर पोस्ट होत राहिल. अन्यथा ‘बफर’वर स्टेटस अपडेट करत असताना आपण खाली ‘कस्टम टाईम’ (custom time) नमूद केला असेल, तर तो नमूद केलेल्या वेळी निवडलेल्या सर्व सोशल नेटवर्कस्‌वर प्रकाशीत होईल. एखादे विशिष्ट स्टेटस ‘बफर’शी जोडलेल्या सर्व सोशल नेटवर्कस्‌वर शेअर न करता त्यावरील आपल्या निवडीच्या ठरावीक सोशल नेटवर्कस्‌वरही शेअर करता येते.

गूगल प्लस प्रोफाईल सध्यातरी आपणास बफरशी जोडता येणार नसून एखादे गूगल प्लस पेज मात्र आपणास बफरशी जोडता येईल. आपली फेसबुक प्रोफाईल किंवा एखादे फेसबुक पेज या दोन्ही गोष्टी आपणास एकाच वेळी बफरशी जोडता येणार नाहीत. आपणास फेसबुक प्रोफाईलची किंवा फेसबुकवरील आपल्या कोणत्याही एका पानाची निवड करावी लागेल. ट्विटरवर देखील आपली एकाहून अधिक खाती असतील तर त्यापैकी एकच खाते आपणास बफरशी जोडता येईल. एकाच सोशल नेटवर्कची एकाहून अधिक पाने किंवा खाती ‘बफर’शी जोडण्यासाठी त्याची पेड ‘आवृत्ती’ घ्यावी लागेल.

गूगल क्रोम वेब ब्राऊजरसाठी बफरचे ‘एक्सटेन्शन’ उपलब्ध आहे. याचा वापर करुन इंटरनेटवरील पाने आपणास सर्व सोशल नेटवर्कस्‌वर अगदी सहजतेने शेअर करता येतील. Settings मध्ये आपणास Link Shortning हा एक पर्याय दिसेल. मोठ्या आकारातील वेब पत्ता लहान करण्यासाठी buff.ly, bit.ly किंवा j.mp यापैकी एका डोमेनची आपण तिथून निवड करु शकाल. याचा आणखी एक फायदा म्हणजे आपण शेअर केलेल्या लिंकवर किती जणांनी क्लिक केले? ते आपणास या माध्यमातून समजू शकेल. त्यासाठी ‘बफर’वरील Analytics हा विभाग पहावा. ट्विट किंवा स्टेटस पोस्ट करण्यासंदर्भातील आठवड्याचे पूर्वनियोजीत वेळापत्रक आपणास Schedule मध्ये नमूद करता येईल.

३००० हून अधिक लोक 2know.in चे लेख ईमेलने मिळवतात, तर ३५० हून अधिक लोक फेसबुकवर 2know.in शी जोडले गेले आहेत. आपणास जर हा लेख आवडला असेल, तर माझी आपणास विनंती आहे की, 2know.in चे लेख ईमेलने मिळवण्यासाठी सब्सक्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, गूगल प्लस या सोशल नेटवर्कस्‌च्या माध्यमातून 2know.in शी जोडले जा.