फेसबुकसाठी कव्हर फोटो

खाद्या नवीन लोकप्रिय गोष्टीची सुरुवात झाली, की त्या अनुषंगाने इतर सेवा-सुविधा विकसित होत जातात. फेसबुकने टाईमलाईन प्रोफाईल सुरु केल्यानंतर फेसबुक कव्हरची लोकप्रियता देखील अशीच वाढली आणि फेसबुक कव्हर फोटो पुरविणार्‍या वेबसाईट्सची संख्याही वाढत गेली. फेसबुक कव्हर फोटोची लांबी ८५१px असून उंची ३१५px आहे. साधरणतः या आकारातील फोटो आपल्याला फेसबुक कव्हर फोटो म्हणून वापरता येतो. आपल्याजवळील फोटो हा सर्वसाधरणतः या आकारात असेल, तर आपल्याला तो त्या ठिकाणी व्यवस्थित बसेल असा करता येतो.
फेसबुकची नवीन टाईमलाईन प्रोफाईल सुरु झाल्यानंतर फेसबुक कव्हर फोटो पुरविणार्‍या अनेक वेबसाईट्स लगेचच इंटरनेटवर अस्तित्त्वात आल्या. यांपैकी काही साईट्सचे पत्ते मी या इथे खाली देत आहे. 
या सर्व साईट्सवर मिळून आपल्यासाठी हजारो फेसबुक कव्हर फोटो उपलब्ध आहेत. इथे फेसबुक कव्हर फोटोंच्या प्रकारांवरुन त्यांची वर्गवारीही करण्यात आली आहे. या वर्गवारीमधून आपण आपल्या आवडीचा फोटो निवडून तो आपल्या फेसबुक प्रोफाईलला कव्हर फोटो म्हणून देऊ शकतो. या साईट्सवरील सर्व फोटो हे फेसबुक कव्हरसाठी तयार करण्यात आल्याने त्यांचा आकारही अचूक आहे. 
फेसबुक कव्हरचा वापर करण्यासाठी आपण सर्वप्रथम फेसबुकची टाईमलाईन प्रोफाईल वापरण्यास सुरुवात करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईल फोटोच्या वर फेसबुक कव्हर फोटो देता येईल. उदाहरणार्थ, आपण खाली देलेल्या चित्रात कारचा फोटो पाहू शकाल. तो एक फेसबुक कव्हर फोटो आहे. फेसबुक कव्हर फोटोच्या जागी आपल्या माऊसचा कर्सर नेल्यानंतर उजव्या बाजूला खाली आपल्याला तो फोटो बदलने, त्याला व्यवस्थित करणे असे पर्याय दिसून येतील.
फेसबुक टाईमलाईन, फेसबुक कव्हर फोटो
आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा फेसबुक कव्हर फोटोचा शोध घ्यावा आणि मग तो आपल्या फेसबुक प्रोफाईलवर द्यायला हरकत नाही. नेहमी नेहमी तोच फोटो पाहून कंटाळा आला असेल, तरीदेखील आपण या हजारो फेसबुक कव्हर फोटोंमधून आपल्या आवडीचा फोटो देऊ शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.