फेसबुक आणि ट्विटर जीमेलशी जोडा

ला माहीत आहे, फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडता आले, तर तुम्हाला फारच आनंद होणार आहे. सारखं सारखं अनेक टॅब्ज ओपन करुन वेगवेगळ्या अकाऊंट्सला लॉग इन होत बसणं… ही खरंचऽ एक मोठी डोकेदुखी आहे.

नवा मेल आला आहे का!? ते पाहण्यासाठी आपण जीमेल मध्ये अधूनमधून डोकावून पहात असतोच, तसंच मग… सहज म्हणून जाता जाता… फेसबुक आणि ट्विटर वरही एक नजर टाकाता आली, तर ते आणखीनच छान होईल!

१. त्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल अकाऊंट ला लॉग इन व्हा.
२. त्यानंतर settings वर क्लिक करा.
३. settings मध्ये Lab या पर्यायावर जा.
४. Add any gadget by its URL “enable” करा. आणि मग save changes” वर क्लिक करा.

५. आता परत settings वर क्लिक करा. यावेळी settings मध्ये तुम्हाला gadgets हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा.
६. Add a gadget by its URL च्या खाली, दिलेल्या रिकाम्या जागेत, आत्ता देत असलेली लिंक कॉपी आणि पेस्ट करुन टाका.

७. फेसबुकसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://hosting.gmodules.com/ig/gadgets/file/104971404861070329537/facebook.xml
८. ट्विटरसाठी त्या रिकाम्या जागेत पुढे देत असलेली लिंक टाका आणि Add वर क्लिक करा  http://twittergadget.appspot.com/gadget-gmail.xml
 ९. आता inbox वर क्लिक करा आणि आपल्या डाव्या साईडबारमध्ये खालच्या बाजूला (चॅटच्या खाली) पहा! फेसबुक आणि ट्विटर, तुमच्या जीमेलला जोडले गेल्याचे तुम्हाला दिसून येईल. गुगलने गुगल बझ जीमेलला जोडलं! अगदी तसंच फेसबुक आणि ट्विटर जीमेलला जोडले जातील.
१०. फेसबुकचे स्टेटस पाहण्यासाठी ‘फेसबुक वेजेट’च्या expand या पर्यायावर क्लिक करा. ट्विटरचे स्टेटस पाहण्यासाठी ‘click here’ लिहिले आहे, त्यातील here या लिंक वर क्लिक करा.
११. युजरनेम, पासवर्ड टाकून परवानगी (Allow) दिल्यानंतर तुमचे अकाऊंट्स जीमेलमध्ये काम करु लागतील.

अशाप्रकारे गुगल बझ नंतर फेसबुक आणि ट्विटरचे अकाऊंट्स देखील तुम्हाला तुमच्या जीमेल खात्याशी जोडता येतील. हे दोन अकाऊंट्स जीमेलशी जोडले गेल्याने आपली अतिशय उत्तम अशी सोय होणार आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.