फेसबुक पेजचे फेसबुक लाईक वेजेट

फेसबुकवर आपल्यापैकी अनेक लोकांचे फेसबुक खाते असेल. फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्या परिचितांशी कायम संपर्कात राहू शकतो. पण फेसबुकचा उपयोग हा केवळ एव्हढ्यापुरताच मर्यादित नसून, फेसबुकचा वापर करुन आपण जे कार्य करत आहोत, ते अधिक लोकांपर्यंत पोहचवू शकतो. ‘फेसबुक पेज’ हे त्यादृष्टिने प्रभावीपणे वापरता येते. समान विचारांची किंवा एकाच उद्दिष्टाने एकत्र आलेली माणसे आपण एखाद्या विशिष्ट फेसबुक पेज अंतर्गत एकत्र आलेली पाहू शकतो. अनेक उद्योजकांचे, उत्पादनांचे फेसबुक पेजही आपण कदाचीत पाहिलं असेल. उदा. टाटा डोकोमोचे फेसबुक पेज, नोकिआचे फेसबुक पेज, इ. आपण टि.व्ही. वर जाहिराती पहात असाल, तर अनेक उत्पादने असं सांगताना आढळून येतील की, फेसबुकच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात राहा. आणि मग त्यांच्या फेसबुक पेजचा पत्ताही दिलेला असतो. अशाप्रकारे अनेक ब्लॉगचे, वेबसाईट्सचे देखील स्वतःचे फेसबुक पेज आहे. उदा. 2know.in चे फेसबुक पेज. 2know.in चे फेसबुक पेज लाईक करुन आपण फेसबुकच्या माध्यमातून 2know.in शी कायमचे संपर्कात राहून मराठीतून इंटरनेटविषयक नवनवीन माहिती मिळवू शकतो.
मागे फार पूर्वी मी फेसबुकवर आपलं स्वतःचं पेज कसं तयार करायचं? याबाबत लेख लिहिला होता. पण फेसबुकच्या सतत बदलत जाणार्‍या इंटरफेसमुळं, आता तो कदाचीत कालबाह्य झाला असण्याची शक्यता आहे. नवीन इंटरनेफेसनुसार फेसबुक पेज कसं तयार करायचं? ते मी पुढील लेखात सांगेन. आत्ता आपण पाहूयात, आपल्या फेसबुक पेजचं वेजेट आपल्या ब्लॉगमध्ये कसं जोडता येईल? इथे मी दोन पद्धती सांगणार आहे. पहिली नवीन पद्धत जराशी अवघड आहे. तर दुसरी पद्धत फारच सोपी आहे.
१. नेहमीप्रमाणे facebook.com वर जाऊन आपलं युजरनेम आणि पासवर्ड देऊन आत प्रवेश करा.

फेसबुक Developers मध्ये प्रवेश करा
२. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे उजव्या बाजूच्या साईडबारमध्ये More अंतर्गत आपल्याला Developers हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. (याच पर्यायाच्या वर Create a Page नावाचा पर्याय देखील आहे. त्याचा वापर करुन आपण फेसबुक पेज तयार करु शकाल).

फेसबुक Developers – Documentation – Websites – Social Plugins
३. आपण Facebook Developers मध्ये आला आहात. चित्रात दाखवल्याप्रमाणे Documentation वर जाऊन Websites अंतर्गत जाऊन Social Plugins मध्ये प्रवेश करा.

फेसबुक Social Plugings – Like Button
४. इथे आपल्या ब्लॉगसाठी अनेक प्रकारचे वेजेट्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आपण Like Button हे वेजेट पाहणार आहोत (थेट पत्ता – https://developers.facebook.com/docs/reference/plugins/like/ ).

फेसबुक पेजचे लाईक वेजेट तयार करा
अ) url to like च्या खाली दिलेल्या जागेत आपल्या फेसबुक पेजचा पत्ता टाईप करा. आपल्या फेसबुक पेजवर गेल्यानंतर वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेसबार मध्ये आपल्याला हा पत्ता मिळेल. उदा. 2Know.in च्या फेसबुक पेजचा पत्ता आहे – facebook.com/2know.in.
ब) Layout Style मधून आपल्या आवडीची, सोयीची Layout निवडा. वेगवेगळ्या लेआऊट (Layout) कशा दिसतात? ते आपणास उजव्या बाजूस दिसत राहिल.
क) आपल्या ब्लॉगवर किंवा साईटवर सोयीस्कर ठरेल अशी वेजेटची Width (लांबी) निवडा.
ड) आपले फेसबुक पेज लाईक करणार्‍यांचे चेहरे वेजट वर दिसावेत किंवा नाही, वेजेटचा कलर कसा असावा? अक्षरांचे फंन्ट कोणते असावेत? इत्यादी निवड आपल्याला करता येईल.
इ) सरतेशेवटी Get Code वर क्लिक करा. एक नवीन खिडकी उघडेल. त्यात सांगितल्याप्रमाणे दिलेले कोड आपल्या ब्लॉग मध्ये टाका आणि जतन करा.

आपल्यासाठी आणखी एक दुसरी सोपी पद्धत.
आपल्या ब्लॉगचा HTML Editor उघडा. 
(ब्लॉगरसाठी : Design – Page Elements – Add a Gadget – HTML/JavaScript)
खाली देत असलेला कोड त्यात टाका. जिथे “आपल्या फेसबुक पेजचा पत्ता” असं लिहिलं आहे, तिथे आपल्या फेसबुक पेजचा पत्ता टाका आणि हे बदल जतन करा.

<div id=”fb-root”></div><script src=”http://connect.facebook.net/en_US/all.js#xfbml=1″></script><fb:like-box href=”https://आपल्या फेसबुक पेजचा पत्ता” width=”300″ show_faces=”true” border_color=”” stream=”false” header=”false”></fb:like-box>

आता वर दिलेल्या कोड मधील width, show_faces, border_color, stream, header हे शब्द पहा. वरील कोडमध्ये width समोर 300 असं टाईप केलं आहे. तिथे आपण आपल्या ईच्छेनुसार बदल करु शकता. show_faces समोर true असं लिहिलं आहे, याचा अर्थ आपल्या फेसबुक वेजेटमध्ये आपले फेसबुक पेज लाईक करणार्‍यांचे चेहरे दिसतील. तिथे true च्या ठिकाणी false केल्यास आपलं पेज लाईक करणार्‍यांचे चेहरे आपल्या फेसबुक वेजेटवर दिसणार नाहीत. border_color समोर कलर कोड टाकून आपण वेजेटच्या बॉर्डरचा कलर कोणता असेल, ते ठरवू शकाल. त्यानंतर stream म्हणजेच आपल्या फेसबुक पेजवरील अपडेट्स आणि header च्या बाबतीत देखील आपण असेच बदल करुन आपली निवड ठरवू शकाल.

अशाप्रकारे आपण आपल्या फेसबुक पेजचे वेजेट आपल्या ब्लॉगवर अथवा वेबसाईटवर देऊ शकतो. त्यामुळे आपल्या कार्याचा प्रचार होण्यास मदत मिळू शकते.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.