फोटो चे कार्टून तयार करा

ज आपण काहीतरी मजेशीर करुयात. म्हणजे आपल्याकडील एखाद्या फोटोचे कार्टून तयार करुयात. थोडासा विरंगुळा म्हणून ही आयडीया चांगली आहे. चला मग! लगेचच कामाला सुरुवात करुयात. त्यासाठी आपल्याला kusocartoon.com या वेबसाईटवर जावं लागेल.

१. वर दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर Convert Your Photo To Cartoon Now ! असं लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्याखाली सहा प्रकारचे कार्टून इफेक्टस्‌ दिलेले आपल्याला दिसून येतील. आपल्या माऊसच्या सहाय्याने त्यापैकी एकाची निवड करा.

 
कार्टून चा प्रकार, इफेक्ट निवडा
फोटो अपलोड करा

२. त्यानंतर पानाच्या खाली Browse… या बटणावर क्लिक करुन, आपला स्वतःचा किंवा आपल्या एखाद्या मित्राचा फोटो संगणकावरुन निवडा. वर Tags मध्ये फोटो बाबत दोन शब्दात काहीतरी लिहा. आणि मग Upload Photo वर क्लिक करा.
३. यानंतर नवीन पानावर आपण जाल, जिथे Upload Success असं लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. त्याखाली लिहिलं असेल, photo editing… wait — seconds.
४. काही सेकंदांनंतर हिरव्या रंगात Done. Click Here To View अशी ओळ येईल. त्यावर क्लिक करा.
५. आणि मग… तुम्हाला तुमचा कार्टूनाईझ झालेला फोटो दिसून येईल!
६. त्याखाली Cartoon Converter नावाचा बॉक्स दिसेल. त्याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या कार्टुनला अधिक चांगला आकार, इफेक्ट देऊ शकाल. आता या माध्यमातून देता येतील अशा इफेक्टसची यादी वाचत बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःच त्यांना आजमावून पाहू शकता.

कार्टून कन्व्हर्टर इफेक्टस्‌

अशाप्रकारे आपला आजचा विरंगुळा संपला आहे… आता आधिसारख्याच मख्ख चेहर्‍याने संगणकाला डोळे चिटकवलेत तरी चालेल!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.