बिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध

ज आपण बिंग, गुगल आणि याहू यांनी उपलब्ध करुन दिलेल्या व्हिडिओ सर्चची माहिती करुन घेणार आहोत. या तिघांमध्ये मला ‘बिंग’चा व्हिडिओ सर्च हा अधिक चांगला वाटतो आणि त्यामागे तसं एक खास कारण आहे.

बिंग व्हिडिओ
१. सर्वप्रथम बिंगच्या ‘चलचित्र शोध’ घेणार्‍या वेबसाईटवर आपण जाऊयात. bing.com/video
२. आता दिलेल्या सर्च बॉक्स मध्ये असा कोणताही शब्द टाईप करा, ज्याशी संबंधित व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडेल. उदा. ‘akshay kumar’.
३. यानंतर एका ओळीत चार असे अनेक व्हिडिओ आपल्या समोर हजर होतील.
४. त्यापैकी कोणत्याही एका व्हिडिओवर आपल्या माऊसचा कर्सर आणा! क्लिक करु नका! क्लिक न करताही त्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आपल्याला दिसू लागेल. अशाप्रकारे कोणता व्हिडिओ चांगला आहे!? हे तुम्ही झटपट पाहू शकाल.
५. आणि प्रिव्ह्यू मधून तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला, तर मग आता त्या व्हिडिओवर क्लिक करा. लगेच मोठ्या आकारात तो व्हिडिओ तुम्हाला दिसू लागेल.
६. डाव्या बाजूच्या साईडबारमधून त्या व्हिडिओचा आकार किती असावा? स्क्रिनचा प्रकार, रिझोल्युशन, सोर्स असं सारं काही हाताळता येईल.

सर्च रिझल्ट मध्येच प्रिव्ह्यू बघता येण्याच्या सुविधेमुळे मला बिंगचा चलचित्र, व्हिडिओ शोध हा अधिक चांगला वाटतो.

सर्च इंजिन, व्हिडिओ सर्च

याहू व्हिडिओ सर्च
१. video.search.yahoo.com या इथे याहू चा व्हिडिओ सर्च उपलब्ध आहे.
२. समोर दिसणार्‍या सर्च बॉक्स मध्ये कोणताही एक शब्द टाईप करा. उदा. ‘sachin tendulkar’.
३. सर्च वर क्लिक केल्यानंतर येणारे एक पान, एका ओळीत दोन असे व्हिडिओ सर्च रिझल्टस्‌ घेऊन येईल.
४. ‘याहू व्हिडिओ सर्च’ चं वैशिष्ट म्हणजे सर्च रिझल्टच्या पानावरच आपण Play Now या बटणाचा उपयोग करुन यु-ट्युब व्हिडिओ पाहू शकतो.
५. सर्च रिझल्टच्या पानावरील वरच्या बारवर लांबी, काळ इ. बाबत पर्याय देण्यात आलेले आहेत. याशिवाय त्या व्हिडिओचा सोर्स काय!? त्याबाबतचा पर्याय डाव्या बाजूच्या साईडबारमध्ये देण्यात आला आहे.

गुगल व्हिडिओ
१. सर्वप्रथम आपण video.google.com वर जाऊयात.
२. दिलेल्या सर्च बॉक्स मध्ये कोणताही शब्द टाईप करा. उदा. ‘katrina kaif’.
3. सर्च रिझल्टस्‌ घेऊन आलेल्या पानाच्या डाव्या बाजूला तुम्ही व्हिडिओचा, चलचित्राचा कालावधी, वेळ, क्वालिटी आणि सोर्स याबाबतच्या सेटिंग्ज करु शकाल.

तर अशाप्रकारे तुम्ही जालावर उपलब्ध असणार्‍या चलचित्रांचा शोध घेऊ शकता. या उपलब्ध व्हिडिओ चा अमर्याद आनंद लुटण्यासाठी इंटरनेटच्या ‘अनलिमिटेड डाटा प्लॅन’ची निवड करा.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.