मराठी भावगीतं ऐका आणि डाऊनलोड करुन घ्या

धी रेडिओवर एखादं गाणं लागून गेलं किंवा टि.व्ही. वरच्या एखाद्या कार्यक्रमाची वेळ संपली! की परत येत नसे! पण आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात मात्र सारं चित्रच पालटून गेलं आहे. ज्ञानाच्या बाबतीत तर आहेच! पण मनोरंजनाच्या बाबतीतही विचार करायचा झाला, तर ‘इंटरनेट’ हा कल्पतरुच आहे. फक्त याच्या छायेखाली बसून तुम्हाला काय हवं आहे ते मनात आणायचं आणि मग तुमची ईच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा! आजकाल एखादं गाणं रेडिओवर लागून गेलं किंवा टि.व्ही. वरचा एखादा कार्यक्रम संपला आणि आपला तो पहायचा राहून गेला तर काळजी करण्याचं काही एक कारण उरलेलं नाही! नेटवर जरा व्यवस्थित फेरफटका मारला, की सारं काही हव्या त्या वेळी आपल्या समोर उपलब्ध होतं.

मराठी भावगीतांच्या बाबतीतही आपल्याला असंच म्हणावं लागेल. मराठी माणसाच्या मनोविश्वात भावगीतांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. “या गाण्याला ‘भावगीत’ असं म्हणतात!” हेही मला जेंव्हा  कळत नव्हतं, तेंव्हापासून मला मराठी भावगीतं आवडतात. तेंव्हा ती गाणी मी रेडिओवर ऐकत होतो. …पण जसं की वर सांगितलं आहे, आजकाल सारं काही हवं त्या वेळी आपल्या समोर हजर होतं. आणि म्हणूनच आज आपण असा एक फोल्डर्स पाहणार आहोत, जिथे मराठी भावगीतांचा उत्तम असा संग्रह करण्यात आलेला आहे. तर मग आता जास्त वेळ न घेता मराठी भावगीतांच्या संग्रहाचा दुवा (link) मी खाली देतो.

हा आहे दुवा जिथे तुम्हाला मराठी भावगीतं सापडतील. ही सारी भावगीतं तुम्ही ऑनलाईन ऐकू शकाल आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीचं भावगीत डाऊनलोड करुन घ्यावंसं वाटलं, तर खाली डाऊनलोड वर क्लिक करा,  ( esnips downloader आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन घ्या.) लगेच ते भावगीत तुमच्या संगणकावर डाऊनलोड होईल. बाकी तुम्ही स्वतः esnips या वेबसाईटच्या सर्च बॉक्समध्ये ‘bhavgeet’, ‘भावगीत’, ‘भावगीते’ असे त्यासंदर्भात मनात येतील शब्द टाकून मराठी भावगीतांचा शोध घेऊ शकता.

मराठी भावगीतांच्या बाबतीत मला सापडलेला एक चांगला दुवा तर मी दिला, आता तुम्ही त्या भावगीतांचा आनंद घ्या!

ता.क. –  मराठी गाणी’ हा नवीन विभाग सुरु करण्यात आला आहे. वर लिंकबारमध्ये त्याची लिंक देण्यात आली आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.