मोफत अँटिव्हायरस

व्हायरस, स्पायवेअर, मालवेअर, हॅकर, फिशिंग, स्पॅम, इत्यादी गोष्टींपासून आपल्या संगणकाचे आणि आपल्या संगणकावरील, इंटरनेटवरील महत्त्वाच्या गोपणीय, खाजगी माहितीचे संरक्षण व्हावे यासाठी आपल्या संगणकावर एखादा अँटीव्हायरस प्रोग्रॅम असणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक अँटिव्हायरस सेवेचे स्वतःचे असे वेगळेपण असते आणि त्यांच्या दरांतदेखील फरक असतो. शक्यतो अँटिव्हायरस हा दरवर्षी नव्याने विकत घ्यावा लागतो, आणि त्याचा दरदेखील खिशाला न परवडणारा असतो. त्यामुळेच आपण काही दर्जेदार पण मोफत असे अँटिव्हायरस या लेखामध्ये पाहणार आहोत.
मोफत अँटिव्हायरस

अव्ह्यास्ट! मोफत अँटिव्हायरस

अव्ह्यास्ट! (avast!) हा प्रसिद्ध मोफत अँटिव्हायरस आपल्यापैकी अनेकांना आधिपासूनच परिचीत असेल. ‘अव्ह्यास्ट’च्या मोफत, प्रो आणि इंटरनेट अशा तीन आवृत्या आहेत. त्यापैकी मोफत आवृत्तीत आपल्याला व्हायरस आणि स्पायवेअर यांपासून संपूर्ण सुरक्षा मिळते. फायरवॉल, अँटिस्पॅम (फिशिंग) यासारख्या सुविधा मात्र ‘इंटरनेट’ आवृत्तीत उपलब्ध आहेत. 

एव्हिजी मोफत अँटिव्हायरस

एव्हिजी (AVG) हा मोफत अँटिव्हायरस देखील जगभरातील लाखो लोक आपल्या संगणकावर वापरतात. हा अँटिव्हायरस स्पायवेअर आणि व्हायरस यांपासून तर सुरक्षा पुरवतोच, पण आपण जर आपला संगणक केवळ ब्राऊजिंगसाठी किंवा फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्ससाठी वापरत असाल, तर एव्हिजी अँटिव्हायरस त्यासंदर्भातील चांगली प्राथमिक सुरक्षा पुरवितो.

अविरा मोफत अँटिव्हायरस

अविरा (Avira) मोफत अँटिव्हायरस ट्रॉजन्स, वॉर्मस्‌, व्हायरस इत्यादींपासून आपला संगणक सुरक्षीत आणि साफ ठेवतो. संशयीत अपरिचीत कोड्सना हा अँटिव्हायरस प्रतिबंध करतो. हा अँटिव्हायरस आपल्या संगणकावर इन्स्टॉल करणं देखील खूपच सोपं आहे. उपलब्ध मोफत अँटिव्हायरसपैकी अविरा हा देखील एक चांगला पर्याय आहे.
हे काही मोफत अँटिव्हायरस आहेत, जे आपण आपल्या संगणकावर वापरु शकाल. पण केवळ मोफत आहेत म्हणून एकाचवेळी एकाहून अधिक अँटिव्हायरस आपल्या संगणकावर चालवू नका. दोन अँटिव्हायरस जर एकाचवेळी आपल्या संगणाकावर चालू असतील, तर ते एकमेकांच्या कामात अडथळा निर्माण करु शकतात. त्यामुळे कोणताही एक चांगला अँटिव्हायरस निवडून तो आपल्या संगणकावर चालवावा.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.