मोफत ऑनलाईन गेम्स

मी स्वतः फारसे गेम्स खेळत नाही… म्हणजे अजिबातच खेळत नाही असं नाही, पण कधीतरीच खेळतो… नेहमी नेहमी नाही. त्याचं काय आहे? संगणकावर 3D गेम्स खेळायला लागलं की माझं डोकंच गरगरायला लागतं. आणि आपण कुठेन आलो आहोत आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे!? ते मला काही एक समजत नाही. म्हणून मी त्या 3D गेम्सच्या अजीबात नादी लागत नाही. पण मोबाईलवर 2D, 3D असे अगदी भरपूर गेम्स मी खेळले आहेत. मोबाईलवर कसं निवांत पडल्या पडल्या बटणं दाबत बसता येतं. आणि ‘गेमलॉफ्टचे’ गेम्स तसे बर्‍यापॆकी चांगले आहेत. म्हणजे गेमलॉफ्ट बरोबरच बाकीच्या कंपन्याही आहेतच. माझा मोबाईल सिंबियन आहे आणि जावापेक्षा सिंबियन गेम्स त्यावर अगदी चांगले चालतात. म्हणजे अगदी 3D मोबाईल गेमही हँग न होता त्यावर चांगला चालतो.

मोफत गेम

संगणकावर मात्र मागील काही वर्षात गेम खेळल्याचं मला आठवत नाही. गेम घ्या , इन्स्टॉल करा, मग शेवटी तो ट्रायल व्हर्जन आहे म्हणून सांगणार. आणि मोफत मिळाला तर एकदम बोऽअर असणार… आणि एखाद्या चांगल्या गेमचा क्रॅक हुडकायचा उत्साहही माझ्या अंगात नाही. त्यामुळे मग क्वचित चुकून कधीतरी मी संगणकावर गेम खेळला, तर तो ऑनलाईन खेळतो.

संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन गेम खेळण्यासाठी माझी आवडती साईट आहे, miniclip.com. इथे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्याप्रकारचे दर्जेदार गेम्स उपलब्ध आहेत. आणि मोफत ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मला माहीत असलेली आणखी एक वेबसाईट म्हणजे zapak.com. पण zapak चे गेम्स miniclips इतके दर्जेदार वाटत नाहीत.

बाकी आता मी खाली अशा काही वेबसाईट्सची यादी देत आहे, ज्या मला गुगलच्या सर्च मध्ये सापडल्या.
१. www.freeonlinegames.com
२. www.fupa.com
३. www.bgames.com
४. www.gamesoid.com
५. www.gamepuma.com
६. www.loglod.com
७. www.gamegecko.com
८. www.topminigames.com
९. www.freegamesonline.com
१०. www.onlineflashgames.org

याव्यतिरीक्त ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठी अजूनही भरपूर वेबसाईट्स उपलब्ध आहेत, पण त्या सगळ्या सांगत बसण्यात काही अर्थ नाही… आणि इतक्या बास आहेत ना!?

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.