मोबाईलवर ईपुस्तके कशी वाचता येतील?

पल्या मोबाईलवर ईपुस्तक वाचणे हे खूपच सोपं आणि सोयीचं आहे. संगणकावर ईपुस्तक वाचत असताना आपल्याला एकाच जागी बसावं लागतं आणि आपण सगळीकडे तर आपला संगणक घेऊन जाऊ शकत नाही. पण आपल्या मोबाईलवरच जर ईपुस्तक असेल, तर ते कायम आपल्या सोबत राहू शकतं. त्यामुळे काही बाबतीत ते कागदी पानांच्या पुस्तकापेक्षाही सोयीचं ठरतं. आपण आपल्याला हवं तसं बसून, अगदी झोपून देखील आपल्या मोबाईलवर ईपुस्तक वाचू शकतो. तर शेवटी प्रश्न हा उरतो की, आपल्या मोबाईलवर ईपुस्तक कसं वाचता येईल? मोबाईलवर ईपुस्तक वाचण्याबाबतचे काही पर्याय मला माहित आहेत. आणि मागे दोन वर्षांपूर्वी मी एक अख्खं मोठं पुस्तक देखील असं माझ्या मोबाईलवर वाचलं होतं. खरं मी खाली देत असलेल्या मार्गांव्यरितीक्तही मोबाईलवर ईपुस्तक वाचण्याचे इतर मार्ग आहेत. आपला मोबाईल कोणता आहे? त्यावर ते अवलंबून आहे. पुढे कदाचीत मी आपल्याला अधिक मार्ग सुचवेनही. पण तोपर्यंत त्याबाबत मला आत्ता माहित असलेले पाच पर्याय आपण पाहूयात.
क्विकऑफिस डॉक्युमेंट व्य्हूव्हर्स (Quickoffice Document Viewers):

खालील पायर्‍या एक एक करुन पूर्ण करा.
  1. क्विकऑफिस डॉक्युमेंट व्य्हूव्हर आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंन्स्टॉल करा. 
  2. आपल्या संगणकावर जर एखादे PDF ईबुक असेल, तर ते उघडा त्यातील मजकूर कॉपी करा.
  3. आता आपल्या संगणकावर एक नवीन Microsoft Word Document उघडा. त्यात वर कॉपी केलेला मजकूर पेस्ट करा. आणि या Word Document ला ईपुस्तकाचे नाव देऊन ते सेव्ह करा.
  4. आता आपल्या मोबाईलमध्ये Books नावाचे एक फोल्डर तयार करा. आपला मोबाईल संगणकाला जोडून वर सेव्ह केलेले Word Document आपल्या मोबाईलमधील Books नावाच्या फोल्डर मध्ये घ्या.
  5. आता आपल्या मोबाईलमधील Books नावाच्या फोल्डर मध्ये असलेले हे ईपुस्तक क्विकऑफिसच्या माध्यमातून उघडा. 
अशाप्रकारे क्विकऑफिसच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवर ईपुस्तक वाचू शकाल. Symbian आणि Android व्यतिरीक्त फोनसाठी ही पद्धत उपयुक्त आहे की नाही ते मला माहित नाही. व्किकऑफिसच्या माध्यमातून ईपुस्तक वाचत असताना आपण अक्षरे मोठी करु शकाल, go to च्या माध्यमातून थेट हव्या त्या पानावर जाऊ शकाल. Find वापरुन नेमका मजकूर शोधू शकाल.

रीडएम्‌ (ReadM) ईबुक रीडर:

ईबुक वाचण्यासाठी हे एक चांगलं अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अ‍ॅप्लिकेशन DOC आणि TCR फॉरमॅट सपोर्ट करतं. याचबरोबर GZIP and BZIP2 आर्चिईव्हज्‌ देखील सपोर्टेड आहेत. 
वैशिष्ट्ये: बुकमार्कस्‌, कलर हायलाईटनिंग, अनोटेशनस्‌, टेक्स्ट एडिटिंग, स्क्रिन रोटेशन, ऑटोमॅटिक टेक्स्ट स्क्रोलिंग आणि निरनिराळे टेक्स्ट एन्कोडिंग प्रकार याला सपोर्टेड आहेत.
  1. मोफत रीडएम्‌ डाऊनलोड करा.
  2. डाऊनलोड झालेल्या zip फाईलवर राईट क्लिक करा. क्लिक Extract to…
  3. आपल्या मोबाईल फोनमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करा.
  4. आपल्याकडे जर एखादे PDF फॉरमॅट मधील ईबुक असेल, तर ते TEXT DOCUMENT मध्ये Convert करा. 
  5. आपल्या मोबाईल फोन मध्ये हे TEXT DOCUMENT घ्या. हवं तर त्यासाठी एक Books नावाचं फोल्डर तयार करा आणि त्यामध्ये ते ठेवा. 
  6. आता रीडएम्‌ हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ओपन करा. 
  7. आता आपल्याला हवं ते ईपुस्तक या उघडलेल्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून निवडा आणि वाचायला सुरुवात करा.
मोबिपॉकेट (Mobipocket) ईबुक रीडर:
  1. मोबिपॉकेट ईबुक रीडर साठी या इथे क्लिक करा.
  2. आपल्या मोबाईलचा प्रकार निवडा. उदा. eg. blackberry, symbian Os, Palm Os, windows mobile, dedicated ebook devices like Cybook, iLiad.
  3. त्यानुसार मोबिपॉकेट ईबुक रीडर आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन घ्या.
  4. free-ebooks.net वर जाऊन आपल्याला वाचायला आवडेल असे ईबुक निवडा.
  5. आपल्या मोबाईलवर ईबुक वाचण्यासाठी आवडलेल्या ईपुस्तकाची मोबिपॉकेट (PRC) फाईल डाऊनलोड करा.
  6. आपल्या मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये Books नावाचे फोल्डर तयार करा. त्यामध्ये आपण डाऊनलोड केलेले ईपुस्तक पेस्ट करा.
  7. आता मोबिपॉकेट हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाईलवर उघडण्यापूर्वी आपल्या मोबाईलच्या फाईल मॅनेजर मधून, Books नावाच्या फोल्डर मधून आपणाला हवे असलेले पुस्तक उघडा. ते पुस्तक आपोआप मोबिपॉकेट या अ‍ॅप्लिकेशन मधून उघडले जाईल.
वॅटपॅड (Wattpad):

वॅटपॅड

वॅटपॅड हे एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आहे. ते आपल्याला m.wattpad.com या इथे मिळेल. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आपण अनेक ईपुस्तके आपल्या मोबाईलवर पाहू शकाल आणि डाऊनलोड करुन घेऊ शकाल. पण यासाठी आपल्या मोबाईलवर इंटरनेटचे कनेक्शन असणे आवश्यक आहे. मोबाईलवर ईपुस्तक वाचण्यासाठी वॅटपॅडने अनेक सुविधा पुरवल्या आहेत. जसे आपण बॅकग्राऊंड, टेक्स्ट कलर बदलू शकाल, ऑटो स्क्रोल, इ. वॅटपॅट मध्ये जगातल्या निरनिराळ्य़ा भाषांमधील ईपुस्तके उपलब्ध आहेत.

बुक्स इन माय फोन (Books In My Phone):

आपल्या जावा (Java) मोबाईलवर ईपुस्तके वाचता यावीत म्हणून बुक्स इन माय फोन त्यानुरुप ईपुस्तकांचे रुपांतरण करतो. आपण हे अ‍ॅप्लिकेशन थेट आपल्या फोनवरुन इन्स्टॉल करु शकाल – mobile.booksinmyphone.com.
वैशिष्ट्ये: 
  1. फॉन्टचे आकार बदलता येतात.
  2. नाईट-व्हिजन मोड आहे. रात्रीच्या आंधारात वाचत असताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून उपयुक्त.
  3. ऑटो बुकमार्क.
  4. पॉज आणि ऑटो रिझ्युम फंक्शन.
  5. पुस्तकाचे विभागवार थेट वाचन करता येते.
मोबाईलवर ईपुस्तक वाचण्यासाठी उपयुक्त असणारे हे पाच मार्ग मला माहित आहेत. याव्यतिरीक्त इतर मार्ग जर आपणाला माहित असतील, तर ते इतर वाचकांसोबत प्रतिक्रियेच्या माध्यमातून शेअर करा. वर दिलेले पर्याय वापरुन आपण मराठी ईबुक वाचू शकाल का? हे मात्र मी पडताळून पाहिलेले नाही. आपला फोन आणि प्रस्तुत अ‍ॅप्लिकेशन देवनागरी अक्षरे सपोर्ट करतो का? यावर ते अवलंबून आहे. पण आपल्याला जर आपल्या संगणकावर मोफत मराठी ईपुस्तके वाचायची असतील, तर ती marathiebooks.2know.in या इथे उपलब्ध आहेत. 
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.