मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ

दोन-तीन दिवसांपूर्वीच मी मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ डाऊनलोड केला आणि मला आश्चर्य वाटतं पण त्याचा आवाज अगदी सुस्पष्ट आहे. आणि हव्या त्या रेडिओ केंद्राशी जोडलं जाणंही अगदी सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला mundu चं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलवर इंस्टॉल करुन घेणं आवश्यक आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे. सॉफ्टवेअर इंस्टॉल केल्यानंतर युजरनेम आणि पासवर्ड देऊन तुम्हाला तुमचे आकाऊंट रजिस्टर करुन घ्यावे लागेल.

मुंडू ऑनलाईन इंटरनेट रेडिओ

या सॉफ्टवेअरच्या आत प्रवेश केल्यानंतर options मध्ये change station हे option असल्याचे आपल्याला दिसून येईल. त्यावर गेल्यानंतर india, indie, jazz, pop, rock, romantic, salsa, top hits, world, acoustic, alternative, ambient, beat, bluegrass, blues, classic rock, classical, club, country इ. संगीताच्या निरनिराळ्या प्रकारांची यादी दिसून येईल. पुन्हा यापॆकी आवडत्या संगीत प्रकारावर क्लिक केल्यानंतर, त्या संगीत प्रकारामध्ये उपलब्ध असलेल्या ऑनलाईन इंटरनेट रेडिओ केंद्रांची एक यादी दिसून येईल. त्यापॆकी हवे ते रेडिओ केंद्र निवडले की, लगेच buffering होऊन गाणे ऐकू येईल.

महत्त्वाचे तोटे:
१. इंटरनेट रेडिओ असल्याने डाटा प्लॅन चार्जेस ऍप्लाय होतात.
२. मोबाईल इंटरनेटची गती कमी असल्याने गाणे मध्येच बंद पडते आणि पुन्हा buffering सुरु होते.
महत्त्वाचे फायदे आणि तोट्यांवर मात: 
१. मोबाईल इंटरनेटसाठी अनलिमिटेड डाटा प्लॅन निवडा. उदा. ‘एअरसेल’ चा ९८रु. चा महिनाभरासाठीचा अनलिमिटेड इंटरनेट डाटा प्लॅन. 
२. 3G नेटवर्क बाबतीत मला खूप काही माहिती नाही. पण त्याने मोबाईल इंटरनेट देखील ब्रॉडबॅंड स्पीडने चालेल. तेंव्हा वेगवान इंटरनेटसाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवर 3G नेटवर्कचे कार्ड वापरु शकता. अथवा तुमच्या घरात जर wi-fi असेल आणि तुमचा मोबाईल जर wi-fi सपोर्ट करत असेल, तर तुम्हाला मोबाईल इंटरनेटच्या स्पीडची काहिच समस्या जाणवणार नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर आरामात इंटरनेट रेडिओ ऐकू शकाल. 
३. आत्ता आपण आपल्या एफ.एम. मोबाईलवर केवळ ४-५ रेडिओ केंद्रच ऎकू शकतो. मोबाईल इंटरनेट रेडिओ वापरल्याने रेडिओ केंद्रांची ही संख्या शेकडोच्या घरात जाते. 
सध्या आपण आपल्या मोबाईल इंटरनेटसाठी नेहमीचे साधे नेटवर्क वापरत असल्याने खरंतर स्पीडची समस्या जाणवत आहे. पण जेंव्हा 3G नेटवर्कच कॉमन होऊन जाईल. तेंव्हा अशा रेडिओ केंद्रांचा मनमुरात आनंद लुटताना कोणतंही बंधन जाणवणार नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.