रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चे प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स
माझा मित्र सध्या एअरसेलचा ९८रु. चा महिना अनलिमिटेड प्लॅन वापरतोय, पण हा अनलिमिटेड प्लॅन वापरता वापरता त्याच्या सहनशक्तीचा लिमिटेड प्लॅन संपल्याने आम्ही ‘रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’ ची चॊकशी केली. तेंव्हा आम्हाला एक पान मिळाले ज्यावर रिलायन्स नेटकनेक्ट च्या विविध योजना आणि दरांबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. मी आपल्या वाचकांसाठी तसे आणखी एक पान मागितले. …आणि आत्ताच ते स्कॅन केले आहे… स्कॅन केलेले पान फोटोच्या स्वरुपात खाली देत आहे. पण त्याला मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा किंवा आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन, झुम करुन पहा.
आत्ता मी टाटा इंडिकॉम चा अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन वापरत आहे. पण यापूर्वी रिलायन्स नेटकनेक्ट वापरलेले आहे. सध्याचा टाटा इंडिकॉम चा स्पीड एकदम बेस्ट आहेच, पण रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चा स्पीड टाटा इंडिकॉम अनलिमिटेड च्या तिप्पट आहे.
रिलायन्स नेटकनेक्ट चा मुख्य तोटा म्हणजे त्यांचा कोणताही प्लॅन १. अनलिमिटेड नाहीये आणि २. सर्व प्लॅन्स महाग आहेत. रिलायन्स नेटकनेक्ट चा मुख्य फायदा म्हणजे ते १. अतिशय वेगवान आहे आणि २. वायरलेस आहे. तुम्हाला एक यु.एस.बी. मोडेम मिळेल, ज्याचा उपयोग करुन प्रसावात देखील तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर इंटरनेट वापरु शकाल. खाली आहे ‘रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’ प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ची इमेज…
रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चे प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स |
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.