संगणक व स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम अँटिव्हायरस

मानवी शरिरास जशी जंतूसंसर्गापासून बचावासाठी प्रतिकारशक्तीची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे डिजिटल जंतूंपासून (व्हायरस) आपले संरक्षण व्हावे यासाठी संगणक व स्मार्टफोनला फायरवॉल व अँटिव्हायरसची आवश्यकता असते. आपल्या संगणकास सुरक्षेची हमी देणार्‍या अनेक अँटिव्हायरस कंपन्या आहेत, पण त्यापैकी सर्वोत्तम कोण आहे? ते पहायला हवं. याबाबतीत आपल्याला स्वतःला फारसा विचार करण्याची गरज नाही. AV-TEST Institute नावाच्या संस्थेनं आपलं हे काम अगदी सोपं केलं आहे.
या संस्थेमार्फत निरनिराळ्या अँटिव्हायरसची स्वतंत्रपणे चाचणी घेतली जाते. त्यानंतर प्रत्येक अँटिव्हायरच्या कार्यक्षमतेचे Protection, Performance, Usability अशा मानकांवर गुणांकन केले जाते. त्यामुळे सर्वोत्तम अँटिव्हायरस कोणता? हे अगदी सहजतेने कळून येते. संगणक (Windows, Mac OS), मोबाईल (Android) अशा उपकरणांवर ही चाचणी अनिश्चित अशा कालांतराने घेतली जाते. सर्वांत अलीकडील चाचणी ही ऑगस्ट २०१४ ला घेण्यात आली आहे. या चाचणी अनुसार सर्वोत्तम अँटिव्हायरस कोणते? ते आपण पाहू.

संगणकासाठी (Windows) सर्वोत्तम अँटिव्हायरस

१. बिटडिफेंडर इंटरनेट सिक्युरिटी २०१४ व २०१५
२. कास्परस्काय इंटरनेट सिक्युरिटी २०१५
३. इंटेल सिक्युरिटी (McAfee) इंटरनेट सिक्युरिटी २०१५
४. नॉर्टन इंटरनेट सिक्युरिटी २०१५
संगणकासाठी घेतलेल्या या चाचणीचा संपूर्ण निकाल हा AV-TEST च्या साईटवर पाहता येईल.

अँड्रॉईड फोनसाठी सर्वोत्तम अँटिव्हायरस

१. CM सिक्युरिटी १.८ (क्लिन मास्टर ५.८) (किंगसॉफ्ट मोबाईल सिक्युरिटी ३.३)
२. बिटडिफेंडर मोबाईल सिक्युरिटी २.२३
३. ३६० मोबाईल सिक्युरिटी १.०
याव्यतिरीक्त इतरही काही अँटिव्हायरस हे AV-TEST ने घेतलेल्या चाचणीच्या निकालांत सर्वोत्तम गणले गेले आहेत.

अँटिव्हायरस
अँटिव्हायरस सेवा पुरविणार्‍या कंपन्यांची चिन्हे
कोणते अँटिव्हायरस चांगले आहेत? ते आता आपल्याला समजले आहे. पण त्यापैकी कोणता अँटिव्हारस निवडायचा? हे ठरवण्यासाठी आपल्याला या सर्व अँटिव्हायरसची बाजारातील सध्याची किंमत पहावी लागेल. अँटिव्हायरसची किंमत ही आपण १ संगणकासाठी १ वर्ष या निकषावर पहाणार आहोत.

वर ‘बिटडिफेंडर इंटरनेट सिक्युरिटी २०१३’ ची किंमत सांगितली आहे. २०१४ किंवा २०१५ च्या आवृत्तीची किंमत थोडीशी अधिक असेल. पण या इथे मी तुम्हाला पैसे वाचवण्याची चांगली युक्ती सांगतो. बिटडिफेंडरच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम ‘इंटरनेट सिक्युरीटी २०१५’ आपल्या संगणकावर इन्स्टॉल करा. हे सॉफ्टवेअर वापरण्याकरीता १ महिना आपल्याला पैसे भरावे लागणार नाहीत (Free Trial). दरम्यानच्या काळात बिटडिफेंडर २०१३ ऑनलाईन मागवा. आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन साठी एक डिव्हिडी मिळेल व त्यासोबतच सॉफ्टवेअर सुरु करण्यासाठी संकेताक्षरे (Activation Code) मिळतील. पण आपण बिटडिफेंडर इंटरनेट सिक्युरीटी २०१५ इंटरनेटवरुन आधीच इन्स्टॉल केले असल्याने आपल्याला डिव्हिडीचा काहीच उपयोग नाही. पण त्यासोबत मिळालेली संकेताक्षरे मात्र महत्त्वाची आहेत. ही संकेताक्षरे संगणकावर पूर्वीच इन्स्टॉल केलेल्या ‘बिटडिफेंडर इंटरनेट सिक्युरीटी २०१५’ ची मुदत वाढविण्याकरीता वापरता येतात. मी स्वतः यावेळी असंच केलं आहे. मी ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी २०१३’ इंटरनेटवरुन खरेदी केले आणि त्यासोबत मिळालेली संकेताक्षरे ही ‘बिटडिफेंडर टोटल सिक्युरिटी २०१५’ ची मुदत १ वर्षाने वाढविण्याकरीता वापरली. 
CM सिक्युरिटी हे अ‍ॅप पूर्णतः मोफत असल्याने अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी मात्र किंमत हा मुद्दा ठरु शकत नाही. मी स्वतः माझ्या मोबाईलवर CM सिक्युरिटीचाच वापर करतो.
मला आशा आहे की, आपल्याला हा लेख आवडला असेल. जर आवडला असेल, तर जाता जाता 2know.in चे फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरुन अशीच नवनवीन माहिती आपल्याला फेसबुकवरही मिळू लागेल.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.