सर्वांत स्वस्त ३जी इंटरनेट

ध्यंतरी एअरटेलने आपल्या ३जी सेवेच्या दरात मोठी कपात केली होती. त्यासंदर्भात मी एक लेख देखील लिहिला होता. अपेक्षेप्रमाणे एअरटेल पाठोपाठ आता इतर मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर्सनीसुद्धा आपल्या ३जी सेवांच्या दरात चांगलीच कपात केली आहे. ३जी जीवनाचा आनंद घेणं आता सर्वांना सहज शक्य होणार आहे. या लेखामध्ये आपण अशाच काही स्वस्त ३जी डेडा प्लॅन्सची माहिती घेणार आहोत. आपण सर्वांत स्वस्त ३जी डेटा प्लॅन पासून सुरुवात करुयात.

टाटा डोकोमोचा स्वस्त ३जी प्लॅन:
डोकोमोचे प्लॅन्स हे नेहमीच खूप आकर्षक आणि स्वस्त असतात. ३जी सेवेच्या बाबतीतही त्यांनी यावेळी आघाडी घेतली आहे. एअरटेल ३जी चे दर स्वस्त झाल्यानंतर डोकोमो ३जी चे दर देखील स्वस्त होणं अपेक्षेत होतं आणि तसं झालं देखील. आज आपण डोकोमो ३ जीचा एक अत्यंत स्वस्त आणि खिशाला परवडणारा प्लॅन पाहणार आहोत. यानंतर आपल्याला पुन्हा कधीही २जी जीपीआरएसचे अत्यंतीक संथ गतीचे इंटरनेट वापरावे लागणार नाही. आता अधिक गतीमान आणि आधुनिक जीवन जगण्याठी तयार रहा. अर्थात इंटरनेटच्या सुविधेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्यासाठी एक चांगला स्मार्टफोन देखील असायलाच हवा.

स्वस्त दराज ३जी जीवन
टाटा डोकोमोच्या माध्यमातून स्मार्ट लाईफ जगण्यासाठी आपणास केवळ २४६ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे, यामध्ये २१९ रुपयांचा टॉकटाईम मिळेल. जो आपण आपल्या सिमकार्डची व्हॅलिडिटी संपेपर्यंत कधीही वापरु शकतो. २४६ चा हा रिचार्ज केल्यानंतर ४८ तासांच्या आत ४ रुपयांचा आणखी एक रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज करण्यासाठी केवळ *१४१*१५# हा क्रमांक आपल्या मोबाईल फोनवरुन डायल करावा. आपल्या मोबाईल बॅलन्स खात्यातून ४ रुपये वजा होतील आणि काही तासांत आपल्या खात्यात १ जीबी ३जी इंटरनेट डेटा ३० दिवसांसाठी उपलब्ध होईल. *१११*१# हा क्रमांक डायल करुन आपण तो जमा झाल्याची खातरजमा करु शकाल. याचाच अर्थ २५० रुपयांत आपणास २१९ रुपयांचा टॉकटाईम आणि १ जीबी ३जी डेटा उपलब्ध होणार आहे. फूल टॉकटाईमचा खर्च वजा केल्यास केवळ ३१ रुपयांत डोकोमो आपणास १ जीबी ३जी सेवा उपलब्ध करुन देत आहे. इतर कोणत्याही नेटवर्क प्रोव्हाडरशी तुलना केल्यास ही सर्वांत स्वस्त ३जी सेवा आहे. 
बीएसएनएलचा ३जी प्लॅन:

बीएसएनएलची साईट सध्या सरकारी साईटला साजेशी कामगिरी बजावत आहे. त्या साईटवरील दरांच्या संदर्भातील कोणतंही पान आत्ता उघडलं जात नाहीये. पण मागच्या वेळी मी जेंव्हा त्यांचे दर पाहिले होते, तेंव्हा माझ्या मते १५० रुपयांना १ जीबी ३जी डेटा बीएसएनएल तर्फे पुरवला जात होता. ‘कृषी कार्ड’ धारकांना मला वाटतं कदाचीत याहूनही स्वस्त इंटरनेट उपलब्ध असेल. पण सर्वांनाच हे कार्ड उपलब्ध होऊ शकत नाही. तेंव्हा कृषी कार्डची ही योजना मर्यादीत स्वरुपातील आहे.
एअरसेलचे अनलिमिटेड ३जी डेडा प्लॅन:

एअरसेलने १९८ रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट सेवा देऊ केली आहे. यात १ जीबी डेडा हा ३जी सेवेचा असेल आणि त्यानंतर २जी गतीने आपणास अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध होईल. पण एअरसेलचा हा प्लॅन सुरु करण्यापूर्वी तो महाराष्ट्रात उपलब्ध आहे का? याची एकदा खात्री करुन घ्यावी. 
एअरटेलचा १ जीबी ३जी इंटरनेट डेटा प्लॅन महाराष्ट्रात २५२ रुपयांना उपलब्ध आहे. एकंदरीत आता लवकरच २जी इंटरनेट वापरण्याचे कंटाळवाणे दिवस संपतील असा अंदाज आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.