सर्वोत्तम ऑल इन वन मेसेंजर meebo

मिबो ऑल इन वन ऑनलाईन मेसेंजर

meebo हा नक्कीच एक सर्वोत्तम ऑल इन वन मेसेंजर आहे. meebo.com या वेबसाईटची मेसेंजर सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची गरज नाही. meebo.com या वेबसाईटवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही google, yahoo, msn, aol(AIM), facebook, myspace, ICQ, Jabbar आणि यांशिवाय इतर ५३ मेसेंजर सुविधांचा लाभ एकाच वेळी एकाच ठिकाणी घेऊ शकता. अर्थात आपण काही इतके सारे मेसेंजरस वापरत नाही. पण समजा तुम्ही एकाहून अधिक दोन अथवा चार जरी मेसेंजरस वापरत असाल, तर meebo ही साईट तुमच्यासाठी नक्कीच एक सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.

तुमच्या ईच्छेनुसार तुम्ही केलेला चॅट या इथे जतनही करुन ठेवता येईल. शिवाय आपल्या मित्राला एखादी फाईल सेंड करण्याची सुविधाही meebo ने तुमच्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या साईटचे खास वॆशिष्ट्य म्हणजे अतिशय सुटसुटित, युजर फ्रेंडली आणि आकर्षक इंटरफेस. तुम्ही तुमच्या पानची बॅकग्राऊंड थिमही त्या तिथे बदलू शकता आणि त्याला अधिक आकर्षक बनवू शकता. व्हिडिओ, ऑडिओ चॅट, ग्रुप चॅट असे सारे फंक्शन्स त्या तिथे कार्यरत आहेत. आणि हो! जर कंटळा आला असेल, तर…आपल्या मित्राबरोबर गेमही खेळता येईल. meebo.com चे जगभरात अनेक युजर्स आहेत आणि तुम्हीही त्यांच्यापॆकी एक बनू शकता, कारण शेवटी त्यात तुमचाच फायदा आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.