2know.in आता ‘मराठी इंटरनेट’

या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाची बातमी म्हणजे ‘2know.in’ या ब्लॉगचे नाव बदलून ते आता ‘मराठी इंटरनेट’ असे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ब्लॉगच्या ट्विटर खात्याचे, गूगल प्लस पेजचे व फेसबुक पेजचे ‘2know.in’ हे नाव बदलून ते देखील ‘मराठी इंटरनेट’ असे केले आहे. या ब्लॉगला या इथे अथवा सोशल नेटवर्कवर भेट देणारे जे नवीन वाचक आहेत, त्यांना या ब्लॉगचा विषय चटकन लक्षात यावा हा त्यामागील उद्देश आहे. नाव सोपं झाल्याने आता ते इतरांना सांगणे देखील सोपे जाईल. यापुढे जर आपणास कोणाला 2know.in बद्दल सांगायचे असेल, तर त्यांस केवळ गूगलमध्ये देवनागरीत ‘मराठी इंटरनेट’ असा शोध घ्यायला सांगा! त्यांना लगेच हा आपला ब्लॉग सापडेल. या ब्लॉगचे सोशल नेटवर्कवरील सुधारित पत्ते खालीलप्रमाणे आहेत. सर्व दुवे नवीन टॅबमध्ये उघडले जातील.

फेसबुकfacebook.com/marathiinternet

ट्विटरtwitter.com/marathiinternet

गूगल प्लसplus.google.com/+2knowin

‘मराठी इंटरनेट’ला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून फॉलो करणं का महत्त्वाचं आहे?

 1. हा मुद्दा मी उदाहरणाने स्पष्ट करतो. कालच ‘न्यूजहंट’चे नाव बदलून ‘डेलीहंट’ असं करण्यात आल्याचं मला समाजलं. लवकरच त्या अ‍ॅपच्या इंटरफेसमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. आता केवळ इतकी छोटीशी गोष्ट सांगण्याकरीता मला नवीन लेख लिहिणे शक्य नाही. तेंव्हा अशाप्रकारचे अपडेट्स मी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून पोस्ट करतो.
 2. एखादी छानशी ऑफर असेल, तर केवळ ती एक ऑफर सांगण्याकरीता देखील मला नवा लेख लिहिणे शक्य नाही. ऑफर या ठराविक वेळापुरत्या येतात आणि लगेच जातात! त्या काळात जर मी योगायोगाने नवा लेख लिहित नसेन, तर ती ऑफर आपल्यापर्यंत पोहचणार नाही!
 3. ‘मराठी इंटरनेट’ व्यतिरीक्त माझं इतर लेखन कार्यही सुरु असतं. तेंव्हा काही कारणाने मी ‘मराठी इंटरनेट’ वर नवीन लेख प्रकाशित करु शकलो नाही, तर आपल्याला सोशल नेटवर्कवरुन नवीन अपडेट्स मिळत राहतील.
 4. ‘मराठी इंटरनेट’वर नवीन लेख प्रकाशित झाला आहे का? ते पाहण्यास आपणास प्रत्यक्ष या ब्लॉगवर यावे लागणार नाही. आपणाला त्यासंदर्भातील माहिती ही सोशल नेटवर्कच्या माध्यमातून मिळेल.

आपण ‘मराठी इंटरनेट’च्या सोशल नेटवर्कवरील परिवारात सामिल व्हाल अशी अपेक्षा आहे. ‘मराठी इंटरनेट’ हा ब्लॉग देवनागरी मराठीत असल्याने या ब्लॉगची घौडदौड ही आपल्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. ‘मराठी इंटरनेट’ हा अजूनही एक ‘प्रयोग’ आहे, त्यास लोकाश्रय न मिळाल्यास दुर्देवाने तो अयशस्वी ठरेल. या ब्लॉगला जितके अधिक वाचक असतील, तितके या ब्लॉगचे अस्तित्त्व बळकट होईल.

मराठी इंटरनेट
2know.in – ‘मराठी इंटरनेट’चे चिन्ह

बाकी 2know.in चे बदलले चिन्ह पाहिलेत का!? त्या चिन्हात आता ‘मराठी इंटरनेट’ची भर पडली आहे. आपल्या ब्लॉगचे url म्हणजेच web address म्हणजेच इंटरनेटवरील पत्ता हा 2know.in असाच आहे! केवळ या ब्लॉगचे नाव मात्र ‘मराठी इंटरनेट’ असे बदलण्यात आले आहे. शेवटी सर्वांना हा बदल आवडेल अशी आशा आहे!

 • राजेश

  माझ्या मोबाईल मधील internal व external मधील सर्व file (audio,video,image,pdf files.)remove झाल्यात.
  माझ्याकडे ES file Explorer App आहे.
  मला पुन्हा file परत आणता येईल
  का.
  आताच remove झाल्यात.