2know.in च्या वाटचालीची ३ वर्ष – आकडेवारी, तुलना

ज माझ्या 2know.in या ब्लॉगला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. हा या ब्लॉगवरील १९९ वा लेख असणार आहे. पुढील लेख 2know.in वरील २०० लेखांची संख्या पूर्ण करेल. लेखांची संख्या, वाचकसंख्या, वाचनसंख्या या घटकांच्या अनु्षंगाने आज आपण 2know.in च्या वाटचालीतील ३ वर्षांची तुलना करणार आहोत. या आकडेवारीत 2know.in अंतर्गत येणार्‍या साईट्सचा समावेश नसून ही आकडेवारी केवळ 2know.in या ब्लॉगची आहे. खाली मी एक तक्ता देता आहे. त्यात उभ्या रांगेत विशिष्ट वर्षातील ब्लॉगची कामगीरी असेल आणि आडव्या रांगेत ब्लॉगसंदर्भातील विशिष्ट घटकाची आकडेवारी असणार आहे.
२०१० २०११ २०१२
2know.in वर वर्षभरात लिहिलेले लेख १४१ २३ ३४
वर्षभरात 2know.in ला भेट देणार्‍या वाचकांची संख्या सुमारे २६००० सुमारे ४१००० सुमारे ५६०००
त्यांनी वाचलेल्या पानांची संख्या सुमारे ८२००० सुमारे ९९००० सुमारे १२७०००

मी मागील वर्षभरात केवळ ३४ लेख लिहिले असले, तरी वाचकांच्या संख्येत आणि त्यांनी वाचलेल्या पानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आपणास दिसून येईल. आता मी अधिक नियमितपणे लिहिण्याचा प्रयत्न करेन, तेंव्हा मला खात्री आहे की यावर्षी वाचकांची संख्या ही १००००० होईल आणि त्यांनी वाचलेल्या पानांची संख्या ३ ते ३.५ लाख असेल. 2know.in च्या या यशस्वी आणि सुंदर वाटचालीत सहभागी असणार्‍या आणि 2know.in वर प्रेम करणार्‍या सर्व वाचकांचा मी आभारी आहे. आता आपण चौथ्या वर्षात पदार्पण करत आहोत.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.