Maithili Thinks….. मैथिली ची मुलाखत

ज आपल्याकडे आली आहे… Maithili Thinks….. हा अप्रतिम ब्लॉग लिहिणारी मैथिली! अत्यंत योग्य आणि नेमक्या शब्दांत ती आपलं भावविश्व व्यक्त करु शकते, याचं मला अगदी मनापासून आश्चर्य वाटतं! इतक्या कमी वयात ती इतकं छान लिहू शकते, यातूनच तिचं वेगळेपण आपल्यासमोर प्रकट होतं.

…आणि मराठीसाठी तर ही एक खूपच चांगली गोष्ट म्हणता येईल, कारण इतके दिवस डिज्नी चॅनलच्या परदेशी कार्यक्रमांच्या माध्यमातूनच एखाद्या टिनेजर मुलीचं भावविश्व आमच्यापर्यंत हसतखेळत पोहचत होतं. पण आता त्याच नेमकेपणाने ते आमच्या मराठमोळ्या मैथिलीकडून आमच्यापर्यंत पोहचत आहे.

रोजच्या जीवनातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या निरिक्षणातूनच जीवनातील खर्‍या रंगांची उकल आपल्याला होत असते. आणि अशीच उकल मैथिली आपल्या Maithili Thinks….. च्या माध्यमातून करते.

तर आज मी इंटरनेटबाबत काही सांगत बसणार नाही. आपण मैथिलीशीच अगदी मनमोकळ्या गप्पा मारुयात.

मैथिली ची मुलाखत!
मी : बर्‍याच मुलांचं असं मत असतं की, मुली विचार करु शकत नाहीत! आता तुझ्या ब्लॉगचंच नाव आहे ‘Maithili Thinks…..”  म्हणजे बघ! जी गोष्ट obvious नाही, तिच आपण सांगतो! याचा अर्थ असा घ्यायचा का!? की, तू मुलींमध्ये exceptional आहेस!  
मैथिली : कोण म्हणते की मुली विचार करू शकत नाहीत….मी काही exception वैगरे नाहीये…सगळ्याच मुली व्यवस्थित , rational , practical आणि logical विचार करू शकतात…rather मुलीच असा विचार करू शकतात….( जी मुले “मुली विचार करू शकत नाहीत” अशा मताचे असतात त्याना हा टोमणा…बाकि dnt take it personally… 

मी : तुझ्या वयाच्या मुली ऑर्कुट,फेसबुकवर बिझी असतात. त्यांपैकी क्वचितच कोणी ब्लॉग लिहित असेल, मला सांग तुझा ब्लॉग लिहिण्याचा प्रवास कसा सुरु झाला?  त्यासाठी लागणार्‍या तांत्रिक बाजू तुला कोणी शिकवल्या की तू स्वतः शिकत राहिलीस!?

Maithili Thinks…..  मैथिलीचा ब्लॉग

मैथिली : मला पण काहीतरी संगयाचेय , काहीतरी बोलायाचेय, आजू बाजुला जे काही चालले आहे त्यावर मत मांडायचे आहे, ह्या भावनेने लिहावासे वाटले, ( कारण एक तर तेव्हा नुकतीच शाळा संपली होती…खूप एकटे एकटे वाटायचे…माझी अखंड बडबड ऐकायला आस पास कोणीच नसायचे…त्यामुले लिहायला सुरुवात केली होती…आणि तांत्रिक बाजू मीच स्वतःहून शिकत राहिले…  बाकी काही ख़ास डिफिकल्ट असे नव्हतेच त्यात…!!!

मी : तू इतकं छान लिहितेस! यामागचं रहस्य काय? गॉड गिफ्ट, घरचं वातावरण की आभ्यास!?
मैथिली : Ohh…!!! Thank You..Thank You..!!! ( पार हरभर्‍याच्या झाडावर पोहोचले मी…) तर…, option ३ cancel कारण अभ्यासाचा आणि लिहिण्याचा काहीच सम्बन्ध नाही ( माझा आणि अभ्यासाचाच सम्बन्ध फरसा येत नसल्याने…) So, आजू बाजूचे वातावरण  , मित्रमैत्रिणी आणि ब्लॉग विश्वातून मिलनार्‍या encouragement मुले मी लिहाण्याचा प्रयत्न करते…!!!

मी : कोणत्या क्षेत्रात तुला तुझं करिअर करायचं आहे?
मैथिली : मला civil services मध्ये करियर करायचे आहे…!!! पण सध्या एखादे field secure करायचे म्हणून BMS करणार आहे. .

so that , पुढे माझ्या समोर दोन options open राहतील… !!!
मी : प्रतिक्रियांच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर तुझ्या प्रत्येक पोस्ट मागे साधारणतः १५-२५ कॉमेंट्स आलेले असतात (तरी यात मी तू स्वतः केलेले कॉमेंट्स धरत नाहीये!). ब्लॉग लिहिणार्‍या इतर कोणत्याही मुलापेक्षा ही आकडेवारी नक्कीच खूप अधिक आहे. तुला वाटतं का!? की, मुलींना वेळोवेळी सगळ्यांकडून सॉफ्ट कॉर्नर मिळत राहतो! कारण माझ्या जवळच्या मित्राची ही एक नेहमीची फार मोठी तक्रार आहे. माझ्या त्या मित्राला तुझं मत जाणून घ्यायला आवडेल! मी मुलगी नसल्याने तो माझा ब्लॉग कधीच वाचत नाही ही गोष्ट वेगळी!  
मैथिली :  ह्या प्रश्नाचे मला खूप विस्ताराने उत्तर द्यावे लागेल…
ब्लॉग च्या बाबतीत म्हणशील तर इथे मुलगी म्हणून  कोणालाही सॉफ्ट कॉर्नर वैगरे मिळत नाही. माझ्याही ब्लॉग वर पण  सुरुवातीला ४-५ कमेंट्स च असायच्या…जसे जसे इथे मला आणि ब्लॉग ला ओळख मिळत गेली तसे तसे कमेंट्स चे प्रमाण वाढत गेले इतकेच….!!!

आणि हो बाहेरच्या जगात मात्र मुलगी म्हणून न मागताच सॉफ्ट कॉर्नर मिळत राहतो…नेहमीच…!!! निदान मला तरी बर्‍याचदा मिळाला आहे… म्हणजे कॉलेज मध्ये चित्र विचित्र आवाज काढून, कागदाची विमाने उडवून सुद्धा माझी ” बड़ी नटखट है ये बच्ची…” ह्या वर सुटका व्हायची आणि मुलांना मात्र वर्गाबाहेर काढणे, id काढून घेणे इत्यादि शिक्षा  व्हायच्या….
सो, तुझ्या मित्राच्या  बाबतीत असे काही झाले असावे म्हणून त्यांचे असे मत असेल…..!!! 
मी : “आमच्या काळात…ऽऽऽ”, असं कोणी मोठा माणूस सांगू लागला की मला राग यायचा. पण पर्वाच मी सहज म्हणून यु ट्युब वर ‘डक टेल्स’ कार्टून पहात होतो आणि मग त्या व्हिडिओ खालच्या प्रतिक्रिया वाचून माझ्याही मनात नकळत शब्द उमटले,‘आमच्या काळात काय कार्टून्स होते!’ आता मोठी माणसं करतात तशी चुक मला जाणिवपूर्वक करायची नाहीये, पण तुला कोणते कार्टून्स आवडतात हे जाणून घ्यायला मला आवडेल!
मैथिली : मला न हंगामा वरचे Shinchan आवडते खूप…( माझे shinchan प्रेम इतके प्रसिद्ध आहे की माझ्या friends नी त्यांच्या मोबाइल मध्ये shinchan नावानेच contact save केलाय…मला हाक मारताना सुद्धा ते ह्याच नावाने हाक मारतात…माझे pet name च झालेय ते…) आणि offcource TOM AND JERRY अजुनही आवडते….!!! सद्ध्या तरी ही दोन कार्टून्स च बघते पूर्वी कार्टून नेटवर्क वरची बरीचशी कार्टून्स बघायचे…  
मी : अरे व्वा! मला देखील शिंगचॅन खूप खूप आवडतो.
मी : बरं आता मला सांग, दॅट्स सो रेवन, विझर्डस्‌ ऑफ वेवरली प्लेस, ड्रेक अँड जॉश, हॅना माँटॅना, लिझी मॅक्‌ग्वायर, फिल ऑफ द फ्युचर इ.इ. डिज्नी चॅनेलचे, निकचे कार्यक्रम तुला आवडतात!!? आवडत असतील तर यांपैकी कोणता कार्यक्रम तू रोज पाहतेस!? पहात असशील, तर त्यातल्या कोणत्या गोष्टी तुला भावतात!?  
मैथिली : हे सगळे कार्यक्रम मी बघते पण सगळ्यात जास्त मला लिझी आवडायचे… कारण ती एक फक्त साधी teenager होती…बाकी सगल्या shows मधली charecters special असायची…कोणी Rock Star, कोणी wizard, वैगरे…हाँ पण तसे सगळेच कार्यक्रम तसे कूल असायचे…( Hannah Montana बघायला मात्र मला officially मनाई आहे…कारण एकदा HM बघत असताना अचानक आई आली आणि तिने Hannah आणि तिच्या बॉय फ्रेंड चा किस्सिंग  सीन बघितला….तेव्हा मी ८ वीत होते त्यामुले त्या नंतर आई समोर HM बघता नाही येत…. )

मी : आई आली! बरोबर ना!? माझ्या आईवर देखील हॅना माँटॅनाचे बॅड इंप्रेशन पडले आहे! मला हे एक आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे… की, हॅना माँटॅना तिच्या त्या बॉयफ्रेंडला किस करत असतानाच बरोबर आई आपल्या आसपास कशी काय असते!? आणि पहायला गेलं तर किसिंगचे ऍपिसोड्स तसे कमीच आहेत, त्यामुळे ही प्रोबॅबिलिटी खरतनाकच म्हणावी लागेल! …आणि तू आठवीपासून तरी हे कार्यक्रम बघतेस, मी तर बारावीनंतर भीत भीत हे कार्यक्रम पहायला सुरुवात केली!

मी : मला टिनएजर लाईफ मधल्या काही चांगल्या गोष्टी सांग  आणि काही अशा गोष्टी, ज्या “नको होत्या ना याऽऽर!”
मैथिली : ह्हह्म्म…… मित्र मैत्रिणी बरोबर केलेली दंगा मस्ती, शिक्षकाना त्रास देने, तासन तास फ़ोन वर बोलने, नाईट outs, निरूद्देश भटकंती, भान्दाने आणि मारामार्या, एकत्र केलेला अभ्यास आणि नको तेवढा टाइम पास ,first crush… सगलेच खूप सही होते…!!! ( वाईट गोष्टी काहीच आठवत नाहीयेत रे सद्ध्या…मूड खूप छान असल्याने…)

मी : भविष्याबाबत काही स्वप्नं!? अगदी डे ड्रिम्स सांगितलीत तरी चालेल!  मी तुझ्या जागी असतो, तर अशीच स्वप्नं सांगितली असती, जी मला आज दिवास्वप्न वाटतात!
मैथिली :  भविष्या बाबत बरीच स्वप्ने आहेत पण तू दिवास्वप्ने विचारल्याने तीच सांगते….

पाहिले स्वप्न तर offcource कोणाही teenager चे असेल तेच…… ; गाडी चे …Hummer…कसली गाडी आहे ती…..Awesome….!!! आणि दुसरे जरा अजीब आहे….. मला stud farm हवय…..आणि अगदी stud farm नसेल तरी निदान दोन घोड़े तरी हवे आहेत…फार्म वर….( हे माझे लहानपण पासून चे constant राहिलेले एकमेव स्वप्न आहे….) का कोण जाणे, पण I m Jst Crazzzzyy for Horses…!!! ( हसू नका plz…)
मी : तू इतकं छान लिहितेस की, तुझा ब्लॉग वाचत असताना मला डिज्नी चॅनल वरचा एखादा टिनएजर शो पहात असल्यासारखं वाटतं! मला सांग की या ‘टिएजर मुलीला’ आपल्या सर्व वयोगटांतील वाचकांना काही सांगायचंय?
मैथिली : U knw , ही मला आत्ता पर्यंत सगळ्यात जास्त भावलेली कमेन्ट आहे….Thanks once again….( हराभर्‍याचे झाड तुटेल अशाने…. …) Newys…., काही ख़ास असे काहीच नाहीये माझ्या कड़े सांगान्य  सारखे… खरेच नै….!!! फक्त येत रहा माझ्या ब्लॉग वर आणि असेच encourage करत रहा… Your comments are really very precious and Important to me… …!!! 
मी : आणि शेवटी तू आमच्या 2know.in या वेबसाईटबाबत काहीतरी सांग, आणि तेही चांगलं! नाहीतर मी एडिट करेन!   
मैथिली : मी येते इथे नेहमीच…खूप चांगली आणि उपयोगी वेबसाइट आहे ही….!!!
(उत्सुक वाचकांना सुचना – 2know.in बाबतचं हे तिचं वैयक्तिक मत आहे, मी एडिट केलेलं नाहीये! हवं तर विचारा तिला! )
धन्यवाद मैथिली!!!

* तर ही होती मैथिली जिने आज आपल्याबरोबर अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली!? ते खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पोहचवू शकता. मैथिलीचा ब्लॉग तर वाचाच! …पण 2know.in लाही अशीच भेट देत रहा! नमस्कार!

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.