जीटॉक वरचे invisible मित्र कसे शोधाल?
खाली देत असलेली ट्रिक मी स्वतः तपासून पाहिलेली नाही, पण ती मला नेटवर सापडली आहे. आणि ती अशी आहे की, एकदा ट्राय करुन पहायला काहीच हरकत नाही. बर्याचदा आपले मित्र गायब होऊन बसतात, पण ते ऑनलाईन मात्र असतात! अशावेळी कोणता गॉगल वापरुन मिस्टर गायब ला पाहता येईल, हे आपण पाहणार आहोत.
१. तुम्हाला जीटॉक मधील ज्या गायब मित्राशी बोलायचं आहे, त्यावर क्लिक करुन त्याची चॅट विंडो ओपन करा.
२. आता ऑप्शन (scrap लिहिलं आहे त्यासमोर) वर जाऊन “Go off the record” वर क्लिक करा.
३. मग आपल्या मित्राला तुमच्या मनात येईल तो संदेश पाठवा.
४. जर लाल अक्षरात “…..@…. is offline and can’t receive messages right now”, असं लिहिलेलं तुम्हाला दिसून आलं, तर तुम्हाला गायब आहे असं वाटत असलेला तुमचा मित्र, हा प्रत्यक्षात मात्र खरंच offline आहे.
५. पण step3 प्रमाणे तुम्ही संदेश पाठवल्यानंतर लाल अक्षरात लिहिलेलं काहीही अढळून आलं नाही, तर तुमचा मित्र ऑनलाईन असून ऑफलाईन आहे असं भासवत आहे. म्हणजेच गायब झाला आहे, इनव्हिजिबल झाला आहे.
६. आता तुम्ही तुमच्या मित्राला रंगे हात पकडू शकता.
एकदा ट्राय करुन पहा. मला वाटतं ही ट्रिक काम करेल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.