पेजरँक चेक करा
गुगलच्या दृष्टीनं किंवा गुगलच्या सर्च इंजिनच्या दृष्टीनं तुमच्या वेबसाईटचं, ब्लॉगचं ‘वजन’ म्हणजे गुगलची ‘पेजरँक’ असं मला वाटतं! 2know.in ची सुरुवात जानेवारी महिन्यात झाली आणि त्यावेळी लगेच 2know.in ला पेजरँक प्राप्त झाली नव्हती. पण या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जेंव्हा गुगलने सर्वांच्या पेजरँक्स् अपडेट केल्या तेंव्हा 2know.in लाही पेजरँक प्राप्त झाली. आणि आमची सध्याची पेजरँक आहे ३! (एप्रिल २०१० या महिण्याप्रमाणे! भविष्यात यात बदल होऊ शकतो!)
गुगल पेजरँक |
पेजरँक म्हणजेच गुगलने तुमच्या वेबसाईटला, ब्लॉगला १० पॆकी गुण दिल्यासारखं आहे. आम्हाला १० पॆकी ३ गुण मिळाले! काही जणांना हे फारच कमी वाटतील, पण हे ३ गुण मिळवणंही सोपं नाही! खास करुन जेंव्हा तुमची वेबसाईट फक्त तीन महिन्यांची असेल! आणि म्हणूनच या ३ गुणांचाही आम्हाला अभिमान वाटतो! 2know.in ‘सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड’ आहे, हेच यावरुन सिद्ध होतं! दुर्देवानं मराठीतून सर्च करणारे लोक कमी आहेत, नाहीतर आम्हाला भरपूर सर्च ट्रॅफिक मिळालं असतं!
‘ऍलेक्सा ट्रॅफिक रँक’ मध्येही 2know.in ने लाखा लाखाची उड्डाणे घेऊन दीड करोड क्रमांकावरुन वरुन ३२ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्थात आता वर जाईल तसं स्पर्धा तिव्र होत जाणार आहे!
तुमच्या वेबसाईटसाठी, ब्लॉगसाठी गुगलची पेजरँक चेक करायची असेल, तर त्यासाठी देखील भरपूर वेबसाईट्स आहेत. पण त्यांची संपूर्ण यादी देत बसण्यापेक्षा मी या इथे खाली ‘पेजरँक चेकर टुल’ देत आहे, याचा वापर करुन तुम्ही आपल्या वेबसाईटची किंवा ब्लॉगची पेजरँक चेक करु शकाल. खाली तुमच्या वेबसाईटचा पत्ता दिल्यानंतर तुम्ही Cheak PR वर क्लिक कराल, त्यानंतर नवीन टॅब ओपन होईल. तिथे दिलेला Anti-bot code जसाच्या तसा दिलेल्या जागेत टाईप करुन Verify Now वर क्लिक करा! लगेच तुमच्या वेबसाईटची, ब्लॉगची पेजरँक तुम्हाला दिसून येईल!
Check Page Rank of any web site pages instantly: |
This free page rank checking tool is powered by Page Rank Checker service |
वर दिलेल्या टुलने आपलं काम केलं नाही, तर या देत असलेल्या पानावरुन कोणत्याही एका वेबसाईटवर जा आणि आपल्या ब्लॉगची किंवा वेबसाईटची पेजरँक चेक करा.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.