मोफत मराठी शुभेच्छापत्रे
वर्षभर कोणता ना कोणता ‘डे’ हा साजरा केला जात असतो, आणि कोणताही ‘सार्वजनीक डे’ नसेल तर आपल्या जवळच्यांचा ‘बर्थ डे’ तरी असतोच ना! अशावेळी कधीकधी गरज भासू शकते ती शुभेच्छा पत्रांची! आजकाल हळूहळू ऑनलाईन शुभेच्छापत्रांची पद्धत रुढ होत चालली आहे. अशा शुभेच्छा पत्रांचे काही फायदे आहेत, ते म्हणजे १. एक तर ते मोफत असतात, २. कधीही कोणत्याही वेळी उपलब्ध असतात ३. निवडण्यासाठी खूप सारी शुभेच्छा पत्रे आपल्या समोर असतात, म्हणजेच चॉईस मोठी असते, आणि ४. शेवटचं पण काही जणांसाठी (खास करुन मुलींसाठी) महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘वेळ चांगला जातो’. इंटरनेट वर त्यांना काहीतरी मिळतं, ज्यात चांगला वेळ निघून जाईल.
तर मराठी शुभेच्छापत्रं मिळतात अशा काही वेबसाईट्सची माहिती मी आज या इथे देणार आहे. याव्यतिरिक्तही शुभेच्छापत्रे उपलब्ध करुन देणार्या काही मराठी वेबसाईट्स असू शकतात, तुम्हाला माहित असलेल्या वेबसाईट्सची माहिती तुम्ही खाली देलेल्या कॉमेंट बॉक्सद्वारे देऊ शकता.
मराठी शुभेच्छापत्र |
१. वेबदुनिया मराठी : सर्व श्रेणी मधले उत्कृष्ट ग्रिटिंग कार्डस आपल्याला मराठी वेबदुनियेवर पहायला मिळतील. व्हॅलेंनटाईन डे पासून ते विवाहापर्यंत, शिवजयंती पासून ते नवरात्री, ईद, दसरा असे सर्व प्रकारचे ग्रिटिंग्ज आपल्याला त्या तिथून पाठवता येतील. वाढदिवस, नमस्कार, धन्यवाद, जलद आरोग्य लाभो असे इतर अनेक प्रकारचे ग्रिटिंग्जही मराठी वेबदुनियेवर आहेत.
२. मराठी वल्ड : इथेही वर सांगितल्याप्रमाणे सर्व श्रेणीं मधले ग्रिटिंग कार्डस्, शुभेच्छापत्रे पाहायला मिळतात. तुम्ही स्वतः त्या तिथे जाऊन एक चक्कर मारुन या.
आता मात्र तेच तेच सांगत बसण्यात काहीच अर्थ नाही. खाली अधिक माहिती न देता सरळ काही मराठी शुभेच्छापत्र पुरवणार्या वेबसाईट्सची यादी देत आहे.
३. मराठी माती
४. श्रीयोग इन्फो .कॉम
५. bharath greetings
६. नुकत्याच आलेल्या प्रतिक्रियेवरुन मोफत मराठी शुभेच्छापत्र पाठवण्यासाठी आपल्याला आणखी एक चांगली साईट मिळाली आहे. या इथे आपल्याला शुभेच्छा, वाढदिवस, प्रेम, दिवाळी, नवरात्र इत्यादी प्रकारांतील मोफत मराठी शुभेच्छापत्रे मिळतील. या साईटचं नाव आहे ‘मराठी ग्रेटिंग्ज’. मोफत शुभेच्छापत्रांसाठी आपण या इथे देखील जाऊ शकतो.
मराठी शुभेच्छापत्रे |
शुभेच्छापत्र पाठवण्याचे खरं तर अनेक फायदे होतात. पण शुभेच्छा पत्र पाठवल्याने एक संदेश मात्र नक्कीच जातो की, ‘मला तुझी पर्वा आहे.’ आणि ‘तुझ्यासाठी मी सद्देव उपलब्ध आहे, तुझ्याबरोबर आहे.’ हो! आणि मग काय!? आपल्यापैकी बर्याचजणांची मग नकळत समोरच्याकडूनही तिच अपेक्षा असते! … ते काही जरी असलं तरी, नुसतं शुभेच्छापत्र पाठवणं महत्त्वाचं नाही, तर ते मनापासून पाठवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण अंतरात्म्याची भाषा ही अंतरात्म्यालाच कळते! आणि हे अगदी सायंटिफिकली सिद्ध झालं आहे. म्हणून शुभेच्छापत्र तर पाठवाच पण एक कर्तव्य म्हणून नाही, तर मनापासून हृदयापासून पाठवा. जसं की, शेजारच्या शुभेच्छापत्रात सागितलेलं आहे, ‘दिवसेंदिवस प्रेम वृद्धिंगत होवो ही सदिच्छा!’
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.