मोबाईलवर मराठी SMS वाचण्याचे सॉफ्टवेअर
अनेक चांगले चांगले मोबाईल्स देखील देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहीत. अशावेळी जेंव्हा आपल्याला आपल्या मित्राकडून एखादा मराठी sms येतो, तेंव्हा काहीएक अक्षर वाचता येण्याऎवजी केवळ ‘चौकोन चौकोन’ दिसू लागतात. मग यावर उपाय काय? एक तर आपल्या मोबाईलवर देवनागरी फंट्स डाऊनलोड करुन घेणं. (मला तरी अजून असे फंट्स विश्वसनीयरित्या नेटवर ऑनलाईन मिळालेले नाहित.) अथवा असं एखादं सॉफ्टवेअर वापरणं, जे आपल्याला कोणत्याही भारतीय भाषेमधला sms वाचण्यास मदत करेल. मग असं सॉफ्टवेअर आहे? आहे ना! IndiSMS. मराठी भाषेतील sms वाचण्यासाठी हे एक अतिशय उत्कृष्ट आणि विश्वसनीय सॉफ्टवेअर आहे.
या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन तुम्ही मराठीत लिहू शकता, तुमच्या मित्राला मराठीतून sms सेंड करु शकता. अथवा समजा तुम्हाला sms सेंड करायचा नाहिये, पण तुमच्या मोबाईलवर देवनागरीत काहितरी अर्जंट उतरवायचं आहे. जसं की एखादा पत्ता किंवा प्रतिभेने अंतरंगात उतरलेल्या कवितेच्या, कल्पनेच्या काही ओळी, ज्या की नंतर विसरल्या जाऊ शकता…असं सारं काही तुम्ही या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मराठीत उतरवू शकता आणि ड्राफ्ट म्हणून सेव्ह करु शकता. मराठी व्यतिरीक्त अन्य भारतीय भाषांनाही हे सॉफ्टवेअर सपोर्ट करतं, पण जर तुम्हाला त्या भाषा येत असतील तर…बाकी या सॉफ्टवेअरचा स्पिड चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे, छान आहे, आणि हेल्पफुल आहे. जर तुम्ही हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केलंत, तर यात तुमचाच फायदा आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.