लिंक्डइन प्रोफाईल चे प्रिंटेबल रिझ्यूम मध्ये रुपांतर करा
‘लिंक्डइन’ ही जगभरातील लोकांना व्यावसायिक दृष्ट्या एकत्र जोडणारी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. मी स्वतः लिंक्डइनचा फारसा वापर करत नाही. पण आपल्यापैकी अनेकजण लिंक्डइन या सोशल नेटवर्कचे सदस्य आहेत. आणि त्यांची व्यवसायिक प्रोफाईलही या वेबसाईट वर आहे. लिंक्डइन वेबसाईट च्या प्रोफाईलमध्ये आपण आपली शैक्षणिक पार्श्वभूमी सांगतो, आपल्या करिअर स्किल विषयक माहिती सांगतो. याशिवाय आपल्या व्यवसायाविषयी, संस्थेविषयी, कार्याविषयी, वेबसाईट विषयी आपण लिंक्डइन प्रोफाईल मधून व्यक्त होतो. या प्रोफाईल द्वारे आपल्या कार्याशी, व्यवसायाशी संबधीत जगभरातील इतर व्यक्तिंशी आपण जोडले जातो. त्यामुळे आपल्या व्यवसायात पुढे जाण्यासाठी नव्या वाटा आपल्याला सापडू शकतात, नवी दालनं आपल्यासाठी खुली होऊ शकतात. लिंक्डइन विषयक थोडक्यात परिचय आपण करुन घेतला आहे. आज आपण पाहणार आहोत, लिंक्डइन प्रोफाईलचे प्रिंट करता येईल अशा प्रिंटेबल रिझ्यूम मध्ये कसे रुपांतर करता येईल? जेणेकरुन त्या रिझ्यूम चे प्रिंट आपल्याला काढता येईल.
लिंक्डइन लॅबमध्ये कार्यरत असणार्या टिमने रिझ्यूम बिल्डर नावाचे नवीन टूल विकसित केले आहे. या टूलचा वापर करुन आपण आपल्या लिंक्डइन प्रोफाईलचे प्रिंट करता येईल अशा रिझ्यूम मध्ये रुपांतर करु शकतो. त्याकरिता सर्वप्रथम वर दिलेल्या दुव्यावर जा आणि आपल्या लिंक्डइन खात्याद्वारे साईन इन व्हा. आपल्याला त्यानंतर या अॅप्लिकेशनला फेसबुकवर आपण देतो त्याप्रमाणे अनुमती द्यावी लागेल. एकदा अनुमती दिल्यानंतर हे अॅप्लिकेशन आपल्या लिंक्डइन प्रोफाईल वरील माहिती प्रिंट करता येईल अशा PDF मध्ये बदलेल.
लिंक्डइन प्रोफाईल वापरुन प्रिंटेबल रिझ्यूम तयार करा |
तयार झालेल्या रिझ्यूम मध्ये जर आपणास काही बदल हवे असतील, तर ‘न्य़ू रिझ्यूम’ वर क्लिक करा. त्यानंतर डाव्या बाजूच्या साईडबार मधून आपण आपल्यास आवडेल अशा आकर्षक रिझ्यूम टेम्प्लेटची निवड करु शकतो. प्रोफाईलमध्ये आणखी काही आवश्यक अशा माहितीची भर घालू शकतो. प्रोफाईलची प्रायव्हसी ठरवू शकतो, ती शेअर करु शकतो. सरतशेवटी योग्य असा रिझ्यूम तयार केल्यानंतर आपल्याला त्याचे प्रिंट काढता येईल. लिंक्डइन या जगातील नंबर एकच्या व्यवसायिक सोशल नेटवर्कचा वापर करुन आपला रिझ्यून तयार करण्याची कल्पना आकर्षक आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.