इंटरनेटवरील लेख सुटसुटीत मोकळा करुन कसा वाचता येईल?

पल्यापैकी अनेकांना इंटरनेटवरील लेख वाचण्याची आवड असेल. त्या सर्वांना आजचा लेख उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. इंटरनेटवरील एखादा लेख सुटसुटीत आणि मोकळा करुन कसा वाचता येईल? ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे नेमकं काय? तर आत्ता आपण 2know.in वरील हा लेख वाचत आहात. या लेखाच्या वर माझ्या ब्लॉगचे चिन्ह आहे. लेखाच्या उजव्या बाजूला काही सुचना आणि जाहिराती आहेत. आणि त्याशिवाय फेसबुक, ट्विटर अशी बरेच वेजेट्सी आहेत. लेखाव्यतिरीक्त असलेल्या या इतर गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्या दृष्टिने अधिक महत्त्वाचं काय आहे? तर हा लेख. तेंव्हा आपल्याला हा लेख या ब्लॉगवर असलेल्या इतर गोष्टींपासून मोकळा करुन पाहायचा असेल, वाचायचा असेल, तर काय करावं लागेल? ते आपण पाहणार आहोत. या लेखात देत असलेल्या स्क्रिनशॉट्स वरुन मी नेमकं काय म्हणत आहे? याचा आपल्याला अंदाज येईलच. त्याशिवाय आपण हे सर्वकाही स्वतः करुन पाहू शकाल.

इव्हरनोट क्लिअरली गुगल क्रोम एक्सटेन्शन

इव्हरनोट ही एक अशी सुविधा आहे, जिचा उपयोग करुन आपण विविध प्रकारे नोट्स घेऊन सर्वकाही लक्षात ठेवू शकतो. पण आज आपण ते पाहणार नाही आहोत. तर या इव्हरनोटचे क्लिअरली (Clearly) नावाचे एक गुगल क्रोम एक्सटेन्शन आहे. या एक्सटेन्शचा वापर करुन आपण मी वर सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवरील कोणताही लेख सुटसुटीत करुन, आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून मोकळा करुन एकाग्रतेने वाचू शकतो.
इव्हरनोट क्लिअरली
इव्हरनोट क्लिअरली हे एक्सटेन्शन गुगल क्रोम वेब ब्राऊजरसाठी बनले आहे. हे एक्सटेन्शन आपल्या गुगल क्रोम वेब ब्राऊजरमध्ये इन्स्टॉल करुन घ्या. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे टेबल लँप सारखे दिसणारे एक चिन्ह आपल्याला आपल्या क्रोम वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल. आता इंटरनेटवरील कोणताही एक ब्लॉग उघडून त्यातील एक लेख वाचायला घ्या. जसं की आत्ता आपण माझ्या ब्लॉगवरील हा लेख वाचत आहात. आता इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शचे जे चिन्ह अ‍ॅड्रेस बार शेजारी दिसत आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ब्लॉगवरील इतर गोष्टींपासून (वेजेट्स, चिन्ह, जाहिराती, इ.) स्वतंत्र मोकळा झालेला सुटसुटीत असा लेख दिसू लागेल.
2know.in वरील लेखाचे मूळ पान
2know.in वरील लेख असलेले सूटसुटीत मोकळे पान
इंटरनेटवरील एकादा लेख प्रिंट करत असताना आपल्याला त्या लेखाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गोष्टींची गरज नसते. फार पूर्वी आपण वेब पेजवरील हवा तोच भाग प्रिंट कसा करायचा? ते पाहिलं होतं. इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शनच्या सहाय्याने आपण एखादा लेख आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून स्वतंत्र वेगळा करु शकतो. त्यामुळे इंटरनेटवरील लेख प्रिंट करण्यासाठी देखील आपल्याला इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शचा उपयोग होऊ शकतो. प्रिंट संबंधीत पर्याय आपल्याला उजव्या बाजूच्या काळ्या पट्टीत दिसून येईल.
प्रिंटच्या वर लेखाची थिम बदलण्यासंदर्भातील पर्याय आहे. त्याचा उपयोग करुन आपण लेखासाठी आपल्या आवडीची थिम निवडू शकतो किंवा लेखाचा फंट बदलू शकतो. आपण जर इव्हरनोट वापरत असाल, तर Clip to Evernote (हत्तीचे चिन्ह) या पर्यायाचा वापर करुन आपण तो लेख आपल्या इव्हरनोट वरील नोट्समध्ये साठवू शकतो. अशाप्रकारे क्लिअरली हे एक गुगल क्रोमसाठी उपयुक्त असे एक्सटेन्शन आहे, असं म्हणायला हरकत नाही.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.