ऑर्कुट स्क्रॅप मध्ये नकाशा कसा टाकता येईल?
पुन्हा एकदा एक नवीन महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 2know.in ला सहा महिने पूर्ण होतील. दिवस कसे येतात आणि निघून जातात ते कळत देखील नाही. या सहा महिन्यात आपण बरीच मजल मारली आहे. आणखीही खूप पुढे जायचं आहे. सारं काही हळूहळू होत राहिलच! आज आपण पाहणार आहोत, ऑर्कुट स्क्रॅप मध्ये एखाद्या ठिकाणचा नकाशा कसा टाकता येईल!?
तुम्हाला तुमच्या मित्राला भेटायचं ठिकाण सांगायचं असेल, अथवा तुमच्या घराचा पत्ता सांगायचा असेल, किंवा सांगायचं असेल की, कोणतं दुकान चांगलं आहे, जेवायला जायला कोणतं हॉटेल चांगलं आहे!? अशावेळी आपण ऑर्कुट ला मिळालेल्या गुगल मॅप्सच्या जोडीचा चांगला फायदा घेऊ शकतो.
ठिक आहे! तर आता आपण याबाबतची एक एक पायरी पाहूयात.
१. सर्वप्रथम आपल्याला आपल्या ऑर्कुट खात्यात प्रवेश करावा लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑर्कुट वर जा.
२. My Friends मधून कोणत्याही एका मित्राची निवड करा.
३. त्याच्या स्क्रॅपबॉक्स मध्ये क्लिक करा. तसं केल्यानंतर स्क्रॅपबॉक्स वर आपल्याला काही चिन्ह (पर्याय) दिसू लागतील.
स्क्रॅपबॉक्स आणि त्यावरील पर्याय |
गुगल मॅप्स चे चिन्ह |
४. त्यापैकी शेजारी दाखवत असलेल्या ‘गुगल मॅप्स’ च्या चिन्हाची निवड करा. त्या चिन्हावर क्लिक करा.
५. एक विंडो ओपन होईल. त्या विंडोच्या सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला ‘दाखवायचं आहे’ अशा ठिकाणचे नाव टाका. उदा. Pune.
६. आता तुमच्या इंटरनेट कनेक्शन स्पीड प्रमाणे हळूहळू एक नकाशा उघडला जाईल.
७. त्या नकाशाला आपण माऊसच्या सहाय्याने पकडून हलवू शकतो. डावीकडे दिलेल्या + या चिन्हावर क्लिक केल्यास नकाशा झुम होईल तर – या चिन्हावर क्लिक केल्यास नकाशा झुम आऊट होईल. अशाप्रकारे नकाशाला हलवून योग्य त्या ठिकाणापर्यंत आपण पोहचू शकतो.
८. आता फक्त खाली दिलेल्या Select या बटणावर क्लिक करा आणि आपला नकाशा स्क्रॅप म्हणून पोस्ट करा.
नकाशा तर स्क्रॅप च्या सहाय्याने तुमच्या मित्राकडे पोहचला आहे. आशा आहे तो आता वाट चुकणार नाही.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.