कॉम्प्यूटरचा स्पीड वाढवण्याचा ‘एक’ उपाय

आजकाल कधी कॉम्प्यूटर आजारी पडला आणि त्यासाठी त्याच्या डॉक्टरांना बोलावलं…तर ते १५-२० मिनीटांच्या क्षुल्लक कामासाठी देखील २००-३०० रु. घेतात. काम क्षुल्लकच असलं तरी ते त्यांनाच येत असतं! म्हणून काही बोलताही येत नाही आणि मग गपचूप खिसा रिकामा करवा लागतो. पर्वा असेच एक कॉम्प्यूटरचे डॉक्टर आमच्याकडे येऊन गेले आणि २०० रुपये घेऊन गेले. बाकी लहान-सहान प्रॉब्लेम्स व्यतिरीक्त त्यांना कॉम्प्यूटरचा स्पीडही वाढवण्यास सांगितलं होतं. पण कसलं काय!? काही एक फरक पडल्याचं मला नंतर दिसून आलं नाही.

त्याचदिवशी दुपारी फोनवरुन बोलता बोलता माझ्या मित्राने मला कॉम्प्यूटरचा स्पीड वाढवण्याचा एक साधा-सुधा उपाय सांगितला आणि त्याची मला बरीच मदतही झाली. त्याने मला काय काय सांगितलं!? ते खाली देत आहे.

हे करण्यापूर्वी “मराठी आवाज” (वाचक) ने आपल्यासाठी खालील सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार!

हा प्रकार करताना जरा जपून करावा. कारण Defragmentation करताना जर चुकून जरी लाईट वगैरे गेली आणि बॅक- अप नसल्यामुळे जर संगणक अचानक बंद झाला तर अख्खी Hard Disk लगेचच CRASH होते. काही केल्या Data Recover होत नाही.  आणि कुठलाही बॅक- अप नसताना ,थेट ‘आख्खी हार्ड डिस्क’ क्रॅश होणं, म्हणजे जवळपास आयुष्यातून उठल्याचं फिलींग येतं आपल्याला.  ते काय असतं ? हे सांगण्याची गरज नसावी , असं वाटतं. त्यामुळे लाईट जाणार नाही अशी वेळ निवडा आणि मग Defragmentation करा. किंवा जास्त वेळ  म्हणजे निदान तासभर तरी बॅक अप देणारा Inverter/UPS असेल असं बघा.

१. My Computer वर राईट क्लिक करा.
२. त्यानंतर Manage वर क्लिक करा.
३. आता डाव्या बाजूला Storage च्या खाली…”Disk Defragmenter” वर क्लिक करा.
४. आता तळाला “Defragment” वर क्लिक करा.
५. आपल्याला आपल्या संगणकाचा स्पीड वाढला असल्याचे दिसून येईल.

असं केल्याने तुमच्या संगणकाचा स्पीड, गती वाढेल असा दावा मी करणार नाही. पण काहिशी मदत ही नक्कीच होईल, असं मला वाटतं. तुम्हाला स्वतःला जर संगणकाचा स्पीड वाढवण्याचा एखादा सोपा उपाय माहित असेल, तर तो इथल्या सर्व वाचकांबरोबर जरुर शेअर करा. त्यामुळे सगळ्यांनाच मदत होईल.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.