गाण्याची माहिती (Mp3 Tag) बदलणे
संगणकावर किंवा मोबाईलवर कोणतेही एखादे गाणे लावल्यानंतर आपल्याला त्या गाण्यासोबत त्या गाण्याची माहिती दिसते. उदाहरणार्थ, Artist, Composer, Title, Track, इत्यादी. यालाच MP3 Tag असे म्हणतात. अनेकदा हे एमपी३ टॅग अचूक असत नाहीत. आपण जर इंटरनेटवरुन गाणे डाऊनलोड केले असेल, तर आपल्याला त्या गाण्याच्या माहितीत त्या वेबसाईटचा पत्ता दिसू लागतो. त्यामूळे आपण आपल्याकडील गाण्यांचे गायक, संगीतकार, संगीतप्रकार, इत्यादी अनुसार वर्गीकरण करु शकत नाही. त्यासाठी गाण्याची माहिती बदलून ती अचूक करणं आवश्यक आहे.
गाण्याची माहिती बदला, Change Mp3 Tag |
- सर्वप्रथम mp3tag.de या साईटवर जा.
- मेनूमधून DOWNLOAD या लिंक वर क्लिक करा.
- त्या पानावरील .exe फाईल आपल्या संगणकावर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन घ्या.
- आता Mp3tag संगणकावर उघडा आणि मेनूमधील फाईलच्या यादीतून Add directory… ची निवड करा.
- आपण संगीत साठवले आहे अशा फोल्डरची निवड करा, त्यानंतर त्या फोल्डरमधील गाणी आपल्याला Mp3tag मध्ये दिसू लागतील.
- समोर असलेल्या गाण्यांपैकी कोणत्याही एका गाण्याची निवड करा. त्या गाण्याची माहिती बदलण्यासंदर्भातील पर्याय आपल्याला डाव्या बाजूला दिसू लागतील.
- इथून आपण Title, Artist, Album, Year, Track, Genre, Album Artist, Composer, गाण्याशी संबंधीत चित्र, इत्यादी माहिती बदलू शकाल अथवा भरु शकाल.
खाली यासंदर्भातील १ मिनिटाची छोटिशी चित्रफित दिलेली आहे.
संगणकावर गाणी ऐकत असताना मिडिया लायब्ररी (media library) मध्ये Artist, Ablum, Track, Genre, इत्यादी अनुसार गाण्यांची वर्गवारी करता येते. पण ही वर्गवारी तेंव्हाच अचूक असू शकते, जेंव्हा गाण्यांचे एमपी३ टॅग अचूक असतात. त्यासाठी Mp3tag चा आपल्याला खूप चांगला आणि महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो.