गुगल क्वोट्स वापरुन एखाद्या गोष्टीबाबत कोण काय म्हणालं ते जाणून घ्या
तुमच्या मनात जर एखादा ‘मुद्दा’ असेल आणि त्या मुद्द्यावरुन ‘कोण काय म्हटलं!?’ हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर अशावेळी आपल्याला ‘गुगल क्वोट्स’ या गुगल च्या वेबसाईटचा चांगला उपयोग करुन घेता येईल. अर्थात गल्लीच्या चौकात उभे राहून चकाट्या पिटणार्यांची मतं या वेबसाईटवर दाखवण्यात येणार नसून, ज्यांचे चेहरे आपण रोज वर्तमानपत्रात पाहतो, अशांच्याच मतांना या इथे मान मिळणार आहे!
‘गुगल लॅब्ज्’ मध्ये सध्या ‘गुगल क्वोट्स’ ची तयारी सुरु आहे, तरीही आज आपण ‘गुगल क्वोट्स’ या वेबसाईटचा वापर करु शकतो.
‘गुगलचा शब्दकोश’ वापरुन मी जेंव्हा quote या शब्दाचा अर्थ पाहिला, तेंव्हा तो असा आहे, ‘उदाहरण म्हणून उल्लेख करणे’, ‘दुसर्याचा उतारा देणे’, ‘नमुना म्हणून दाखविणे’, ‘(किंमती) अंदाजाने सांगणे’, अगदी ‘नवनीत’ च्या शब्दकोशातही हेच अर्थ सांगितलेले आहेत. ‘गुगल क्वोट्स’ च्या बाबतीत म्हणायचं झालं तर, ‘एखाद्या गोष्टीबाबत कोणी काय म्हटलं!?’ असाच त्याचा अर्थ लावावा लागेल.
१. या इथून तुम्हाला ‘गुगल क्वोट्स’ वर जाता येईल. आपण भारतासाठी उपलब्ध असणारी अवृत्तीच पाहणार आहोत. त्यामुळे दिलेल्या लिंकवर जाऊनही जर तुम्हाला भारतीय आवृत्ती दिसली नाही, तर उजव्या बाजूला एकदम वरच्या कोपर्यात Edition लिहिलं आहे, तिथे India करा.
२. आता वरच्या बाजूला मधोमध What did they say about: असं लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल, त्यासमोर एक रिकामा बॉक्स दिलेला आहे, त्यात तुम्हाला ज्या विषयाबाबत माहिती जाणून घ्यायची आहे, त्या विषयाशी संबंधीत एखादा दुसरा शब्द टाका. उदाहरणार्थ ‘marathi’ किंवा ‘maharashtra’.
३. त्या रिकाम्या खोक्यात मी ‘maharashtra’ हा शब्द टकाला आहे. आता काय होतं ते पाहूयात! महाराष्ट्राशी संबंधीत असे, खाली चित्रात दाखवलेले क्वोट्स मला दिसून आले. मोठ्या आकारात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा.
गुगल क्वोट्स |
४. एका बाजूला ‘लाल कृष्ण आडवाणी’ काय म्हणाले? ते दिलं आहे, तर दुसर्या बाजूला ‘मनमोहन सिंग’ यांनी केलेला महाराष्ट्राचा उल्लेख दिसून येईल.
५. Quotes by: या पर्यायाद्वारे आपण नेत्याचे नाव बदलू शकतो, तर त्यापुढे दिलेल्या पर्यायाद्वारे साल बदलू शकतो.
बाकी यात सांगत बसण्यासाखं विशेष अवघड असं काही नाही! त्यामुळे तुम्ही स्वतः त्या वेबसाईटवर जाऊन एक नजर फिरवा, आणि मग एका नजरेतच तुमचा ‘गुगल क्वोट्स’ या वेबसाईटवर जम बसेल!
उपयोग करुन घेणार्यांसाठी ही एक उपयुक्त वेबसाईट आहे.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.