दुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा
आजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये ओपन न होता, नवीन टॅब मध्ये कसे ओपन होतील!? ते आपण पाहणार आहोत. आपण आपल्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर जो लेख लिहितो, त्यादरम्यान येणार्या काही शब्दांना, त्यांचे अधिक विश्लेशन होण्यासाठी लिंक देणे ही एक गरजेची गोष्ट असते. अशावेळी आपण देत असलेल्या लिंक वर जर एखाद्या वाचकाने क्लिक केले आणि मग त्यानंतर उघडले जाणारे पान हे दुसरीकडे ओपन न होता त्याच विंडोमध्ये, टॅबमध्ये ओपन झाले, तर ही गोष्ट वाचकाच्या दृष्टीने मोठीच गैरसोयीची ठरु शकते. कारण तो आपला लेख वाचत असतो, आणि हा लेख वाचत असताना त्यादरम्यान दुवा आलेला असतो. अशावेळी दुव्यावर क्लिक केल्यामुळे निम्यातूनच त्याला लेख सोडावा लागत असेल, तर ही गोष्ट फारशी सोयीस्कर म्हणता येणार नाही.
दुवा, लिंक |
अशावेळी राईट क्लिकच्या सहाय्याने वाचक ती लिंक नवीन विंडो किंवा टॅब मध्ये ओपन करु शकतो, पण ते फारच गैरसोयीचे ठरणार नाही का!? शिवाय आपण आपल्या वाचकांना काही सांगत असतो आणि सांगता सांगताच त्यांना कायमचंच दुसरीकडे पाठवून द्यायचं!? ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत, अशावेळी आपण त्यांची सोय बघायला नको का!? इंटरनेट सर्फ करताना मला बर्याचदा असा अनुभव येतो की, एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती त्याच टॅब मध्ये ओपन होते. आणि ही गोष्ट मला फारच त्रासदायक वाटते! कारण बॅक वर क्लिक करुन परत मुळ लेखाकडे परतनं आलंच! आणि लिंकवरुन लिंकवर असा परत पुढे प्रवास केला असेल, तर मग बॅक बटण तरी किती वेळा दाबायचं!? त्यापेक्षा ती वेबसाईटच मी सोडून देतो!
असाही एक मतप्रवाह आहे की, लिंक दुसर्या टॅबमध्ये ओपन होणं ही गोष्ट आपण वाचकांवर का थोपवायची!? त्यांची ईच्छा असेल तर ते राईट क्लिक करुन दिलेली लिंक नवीन टॅबमध्ये ओपन करतीलच की! याच मुद्यावर एका इंग्रजी ब्लॉगरने वाचकांच्या प्रतिक्रिया मागवालेल्या आणि त्यापैकी अनेकांचं मत हे लिंक दुसर्या टॅब मध्ये उघडण्याची व्यवस्था करावी! असंच पडलं. कारण त्याच विंडो, टॅब मध्ये ओपन होणारा दुवा, ओपन होणारी लिंक ही गैरसोयीची आहे. खाली दिलेले चित्र मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
दुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा |
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.