फेसबुक पेज तयार करा
फेसबुक पेज तयार करणं म्हणजे ऑर्कुट कम्युनिटी तयार करण्यासारखं आहे. (फेसबुक पेज आणि फेसबुक कम्युनिटी). जिथे आपण इकाच उद्देशाने एकत्र येणार्या लोकांचा समुदाय तयार करतो. पण मला वाटतं फेसबुक पेज हे ऑर्कुट कम्युनिटी पेक्षा अधिक चांगलं माध्यम आहे. कारण ऑर्कुट कम्युनिटीचे अपडेट्स आपल्या मित्राच्या प्रोफाईल वर दिसत नाहीत. पण ‘फेसबुक पेज’ चे अपडेट्स मात्र त्या कम्युनिटीत सहाभागी सदस्यांच्या मित्रांच्या प्रोफाईलवर दिसतात, अर्थात सहभागी सदस्याने त्या पेजवर काही कृती केल्यास, म्हणजे कॉमेंट टाकल्यास, फोटो अपलोड केल्यास इ. यामुळे काय होतं!? तर लोकांमध्ये फेसबुक पेजचा प्रचार हा अधिक वेगाने होतो. आणि ते कायम समुदायाच्या विषयांशी संलग्न राहतात, त्यात सक्रियतेने सहभागी होतात.
आपल्या मनातील संकल्पनेला संघटनात्मक स्वरुप देण्यासाठी आपला समुदाय तयार करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या युगात यासाठी आपल्याला घराबाहेर पडण्याची काही एक गरज नाही. किंवा आपल्यात फार अंगीभूत कौशल्य हवं, असंही काही नाही. सारं काही अगदी सहज-सोपं आणि कोणालाही करता येण्यासारखं आहे. आता आपण पाहणार आहोत की, फेसबुक पेज कसं तयार करता येईल!?
फेसबुक पेज तयार करणं हे खूपच सोपं आहे. यासाठी मी खाली सांगत आहे, त्याप्रमाणे कृती करा.
१. फेसबुक वर लॉग इन व्हा आणि कोणत्याही एका आधिपासून तयार असलेल्या ‘फेसबुक पेज’ वर जा.
२. त्या फेसबुक पेजवर डाव्या बाजूच्या साईडबार मध्ये सर्वात खाली आपल्याला एक पर्याय दिसून येईल ‘Create a Page for My Business’. त्या पर्यायावर क्लिक करा.
फेसबुक पेज तयार करा |
३. चित्रात दाखवलेल्या पर्यायावर तुम्ही आला असाल. तिथे आपल्या पानाचा प्रकार निवडा. ‘Local Business’, ‘Brand, product or organisation’, ‘Artist, band or public figure’ आणि त्यांचे उपप्रकार! यातून आपल्याला आपल्या पानाचा योग्य असा प्रकार निवडायचा आहे. उदा. माझ्या वेबसाईटसाठी पान तयार करताना मी कोणता प्रकार निवडला!? मी ‘Brand, product or organisation’ या पर्यायावर गेलो आणि त्यातील सर्वात शेवटचा उपप्रकार ‘Website’ निवडला.
४. आता तुमच्या पानाला एखादे नाव द्या. Page Name च्या पुढे ते टाका. खालच्या छोट्या बॉक्स मध्ये टिक मार्क करा आणि सर्वात शेवटी Create Official Page या निळ्या बटणावर क्लिक करा. तुमचे फेसबुक पान तयार झाले आहे!
५. आपल्या फेसबुक पानाला एक छानसा फोटो द्या आणि आपल्या कार्याची माहिती अपडेट्सद्वारे सदस्यांना देत रहा.
मला खात्री आहे की ‘फेसबुक पेज’ चा आपल्याला खूपच चांगला फायदा होईल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.