फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची यादी तयार करुन वर्गवारी करा

जीवनाच्या विविध टप्यांवर निरनिराळी माणसे आपल्या जीवनात येतात आणि कालांतराने वेगळया वाटेवर निघूनही जातात. अशा दूर गेलेल्या लोकांशी पुन्हा संवाद साधनं हे दशकभरापूर्वी योगायोगावर अवलंबून असलं, तरी इंटरनेट आणि सोशल नेटवर्कींग वेबसाईट्सच्या काळात आज ते सहज शक्य झालं आहे. सोशल नेटवर्कींग मध्येही आता फेसबुकचं जगभर वर्चस्व आहे. फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्या अनेक मित्रांशी, सहकार्‍यांशी जोडले गेलो आहोत. यातले अनेक जण जीवनातल्या एका विशिष्ट टप्यापर आपली सोबत करत होते. उदाहरणार्थ, माझे प्राथमिक शाळेतले मित्र, माध्यमिक शाळेतले मित्र, कॉलेजचे मित्र, इ. किंवा ते जीवनाच्या याच टप्यावर समांतररीत्या माझी सोबत करत आहेत. उदाहरणार्थ, नातेवाईक, ऑफिसमधले सहकारी, इतर मित्र इ. तर अशाप्रकारे आपण आपल्या फेसबुक मित्रांची वर्गवारी करु शकतो. ही वर्गवारी कशी करता येईल!? ते आज आपण पाहणार आहोत.

फेसबुकवर मित्रांची वर्गवारी करा:

मला खात्री आहे की, फेसबुक वर आपलं आधिपासूनच एक खातं (Facebook Account) असेल. जर नसेल, तर आजच फेसबुकवर खातं उघडायला, साईन अप करायला काही हरकत नाही. तर फेसबुकचं आपलं एक खातं आहे. त्यात लॉग इन (Log in) होऊन आत प्रवेश करा.

फेसबुक: एडिट फ्रेंड्स

१. पानाच्या वर उजव्या बाजूला कोपर्‍यात Home, Profile, Find Friends च्या रांगेत Account नावाचा पर्याय आहे, तो उघडा. त्यात Edit Friends वर क्लिक करा.

फेसबुक: नवीन यादी, वर्गवारी तयार करा आणि नियंत्रीत करा

२. चित्रात दाखवल्याप्रमाणे + Create a list हे बटण वापरुन आपण फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची वर्गवारी करायला सुरुवात करु शकतो. अशा हव्या तितक्या वर्गवार्‍या, याद्या (lists) आपल्याला निर्माण करता येतील. आणि एकच मित्र आपणास एकाहून अधिक वर्गवारी मध्ये जोडता येईल.
३. पानाच्या डाव्या बाजूला एकंदरीत निर्माण करण्यात आलेल्या वर्गवार्‍या दिसून येतील. शिवाय तिथे Friends not on a list नावाचा एक पर्याय आहे, त्या विभागात अजूनही कोणत्याही यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या मित्रांची नावे आपल्याला दिसतील. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण त्यांना ठराविक वर्गवारी मध्ये जोडू शकतो.

फेसबुक: यादीत नसलेले मित्र जोडा

४. + Create a list वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे एक नवीन खिडकी दिसेल. इथे आपण यादीला विशिष्ट वर्गवारीनुसार नाव देऊ शकतो. काही मित्रांना, सहकार्‍यांना या यादीमध्ये जोडून Create list वर क्लिक करा. अशाप्रकारे मित्रांची वर्गवारी करणारी आपली एक यादी तयार झाली आहे.

फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची यादी तयार करुन त्यांची वर्गवारी करा

————————————————————————————————————–
आपण जर अशा याद्या तयार करुन फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची वर्गवारी केली असेल, तर ही वर्गवारी आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कशी दाखवता येईल? ते आता आपण पाहणार आहोत.

फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची वर्गवारी आपल्या प्रोफाईलवर कशी दाखवता येईल?

१. आपल्या फेसबुक प्रोफाईलवर जा आणि वर उजव्या बाजूच्या कोपर्‍यातून Edit Profile टॅब वर क्लिक करा.

फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची वर्गवारी प्राफाईलला जोडा

२. चित्रात दाखवल्याप्रमाणे, दिलेल्या सुचनांप्रमाणे कृती करुन आपण फेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची, फेसबुकवरील कुटूंबियांची यादी आपल्या फेसबुकच्या प्रोफाईलवर दाखवू शकतो. ही यादी आपल्याला आपल्या फेसबुक प्रोफाईलच्या डाव्या बाजूच्या साईडबार मध्ये दिसेल.

फेसबुक प्रोफाईलवर यादी, वर्गवारी अशी दिसेल

यानंतर एखादा नवीन मित्र फेसबुकवर जोडला गेल्यानंतर, आपण त्याला लगेच एखाद्या यादीत समाविष्ट करु शकतो. किंवा Freinds not on a list वापरुन त्याला नंतर देखिल यादीत जोडू शकतो. फेसबुकवरील सहकारी मित्रांची अशाप्रकारे वर्गवारी केल्याने आपण फेसबुकला अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करु शकतो. उदाहरणार्थ, फेसबुकच्या News Feed चा Most Recent हा पर्याय “उघडून” आपण फक्त शाळेतल्या मित्रांच्याच किंवा कॉलजमधील मित्रांच्याच अशा अपडेट्स एकत्र पाहू शकतो.

फेसबुक: ठराविक यादीचे अपडेट्स न्यूज फिड मध्ये पहा

फेसबुक यादीच्या, वर्गवारीच्या सहाय्याने आपला ‘फेसबुक अनुभव’ अधिक सुखकारक आणि सोयीचा होईल याची मला खात्री आहे.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.