‘फोन’वरुन ‘फोन’वर मोफत कॉल
आजचा हा लेख म्हणजे स्वत कॉल दरांची हमी देणार्या सेवांविषयी नाहीये, तर हा लेख इंटरनेटचा अधिकाधिक उपयोग करुन घेण्याविषयी आहे. मोबाईल फोनवरुन मोबाईल फोनवर मोफत कॉल कसा करता येईल? ते आज आपण पाहणार आहोत. यानंतर आपण जवळपास मोफत, अत्यंतीक नाममात्र दरात (जे गृहित घरले नाहीत तरी चालेल) देशी आणि परदेशी मोबाईल वरुन मोबाईलवर कॉल करु शकाल. हा एक इंटरनेट कॉल असेल, त्यामुळे आपल्या मोबाईलवर एक अत्यंत स्वस्तातला 2G इंटरनेट डाटा पॅक असणं आवश्यक आहे. अशाप्रकारच्या कॉलने आपल्या मोबाईल बॅलंस मधून पैसे कमी होणार नाहीत, तर असा कॉल सुरु असताना आपल्या इंटनेट पॅकच्या माध्यमातून उपलब्ध डाटा कमी कमी होत जाईल. माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर, अशाप्रकाचा कॉल करुन एक तास बोलायचं असेल, तर त्यासाठी केवळ ३५ ते ५० MB चा इंटरनेट डाटा आपल्याला लागतो.
याचवेळी मी हेही अगदी स्पष्ट करु ईच्छितो की, 2G इंटरनेट ची गती ही आपण कोणत्या कंपनीची सेवा वापरत आहात!? आणि आपण आहात तिथे रेंज किती आहे!? यावर अवलंबून आहे. मी ‘टाटा डोकोमो’ची सेवा वापरतो आणि मी त्यांची 2G इंटरनेट सेवा वापरुन अनेक तास इंटरनेट कॉल केले आहेत. 2G नेटवर्कवर मी पुढे सांगत असलेला प्रयोग करुन पहा. जर कनेक्टिव्हिटी संदर्भात वारंवार समस्या जाणवू लागली, तर 3G नेटवर्क वापरा. 3G नेटवर्क हे 2G नेटवर्कपेक्षा निश्चितपणे महाग असेल, पण आपण जेंव्हा त्याची तुलना नेहमीच्या कॉल रेटशी कराल, तेंव्हा आपली निराशा होणार नाही. तर आता वेळ आली आहे की आपण पाहूयात, फोनवरुन फोनवर जवळपास मोफत कॉल कसे करता येतील?
इंटरनेटचा वापर करुन फोनवरुन फोनवर मोफत कॉल कसे करता येतील?
फोनवरुन फोनवर अतिशय स्वस्त दरात कॉल करण्यासंदर्भातील पायर्या मी खाली देत आहे.
- अशाप्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून कॉल करण्यासाठी आपल्याला स्मार्टफोनची गरज आहे. मी नुकताच एक अॅन्ड्रॉईड फोन विकत घेतला आहे. (आणि मला वाटतं की प्रत्येकाकडे आजच्या काळात एक स्मार्टफोन असायलाच हवा.) आपल्यालाही कदाचीत एक स्मार्टफोन विकत घ्यायला आवडेल. मी ‘अॅन्ड्रॉईड’ फोनची शिफारस करेन, कारण तो ‘आयफोन’ पेक्षा स्वस्त आहेत. आपल्याला ६ हजारांपासून अॅन्ड्रॉईड फोन मिळतील.
- एका चांगल्या इंटरनेट सेवा पुरवठादाराचे सिमकार्ड घ्या. भारतामधील लोकांसाठी मी टाटा डोकोमोचे सिमकार्ड सुचवेन.
- एखादा स्वस्त आणि चांगला इंटरनेट डाटा पॅक आपल्या सिमकार्ड वर ऍक्टिव्हेट करा. मी टाटा डोकोमोचा 2G इंटरनेट डाटा पॅक वापरत आहे. यात केवळ ६५ रुपयांमध्ये एक महिन्यासाठी २.५ GB चा इंटरनेट डाटा मिळतो. 3G बाबत बोलायचं झालं, तर टाटा डोकोमोचा ३५० रुपयांचा महिनाभरासाठीचा पॅक आहे. यात ७०० मिनिटं नेहमी आपण करतो तसे कॉल आणि ४.१ Mbps गतीचा २०० MB चा इंटरनेट डाटा मिळेल. आपण हा इंटरनेट डाटा फोनवरुन फोनवर अत्यंतिक स्वस्त दरात कॉल करण्यासाठी वापरु शकतो.
- आपल्या स्मार्टफोनमध्ये जर आधिपासूनच Nimbuzz चा समावेश नसेल, तर ते या इथून मिळवा. आपण जर अॅन्ड्रॉईड फोन वापरत असाल, तर अॅन्ड्रॉईड मार्केटमध्ये Nimbuzz चा शोध घ्या आणि ते आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंन्स्टॉल करा.
- आपण जर Nimbuzz चे सदस्य नसाल, तर तिथे एक नवीन खाते उघडा (Open Account – Sign Up). (आपण Nimbuzz चा उपयोग एक ‘ऑल इन वन मेसेंजर’ म्हणून देखिल करु शकतो. इथे आपण आपली Gtalk, Facebook, MSN, AIM, ICQ, Hyves, Yahoo, Myspace खाती एकत्र जोडून, तिथल्या सर्व मित्रांशी एकत्रितपणे गप्पा मारु शकतो). आपल्या फोनचे मेनू बटण दाबल्यानंतर आपल्याला हे अकाऊंट जोडण्यासंदर्भातला पर्याय दिसेल. आपल्याला सध्या केवळ Gtalk खाते जोडण्याची गरज आहे. तर आपल्या Gmail चे युजरनेम आणि पासवर्ड देऊन आपले Gtalk खाते Nimbuzz शी जोडून घ्या.
- आता आपल्याला आपले Gtalk वर ऑनलाईन असलेले मित्र दिसू लागतील. त्यापैकी कोणत्याही एका मित्राच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर ३ किंवा ४ पर्याय दिसतील. कॉल संदर्भातील चौथा पर्याय, जो खरं तर “Start Chat” या पहिल्या पर्यायाच्या खाली येतो, तर कॉल संदर्भातील या पर्यायचे दिसणे हे आपला मित्र कॉलसाठी तयार आहे की नाही यावर अवलंबून आहे. म्हणजेच तो जर संगणकावर असेल, तर त्याने आधी कधी अशाप्रकारचा कॉल केला आहे का? हेडफोन्स जोडले आहेत का? किंवा तो जर मोबाईलवर असेल, तर तोही Nimbuzz वापरत असायला हवा, इ. उरलेले तीन निश्चित पर्याय आहेत, Sart Chat, Send Multimedia आणि View Profile.
- आपण आपल्या मित्राच्या नावावर क्लिक केलंत आणि आपल्याला ‘कॉल’ संदर्भातील पर्याय जर दिसत नसेल, तर त्याला किंवा तिला वरील सहा पायर्यांप्रमाणे कृती करायला सांगा. त्यानंतर ‘कॉल’चा पर्याय आपल्याला निश्चितपणे दिसू लागेल.
- आपल्या मित्राने Nimbuzz जॉईन केलं की आपल्याला लगेच Start Chat च्या खाली Gtalk Call संदर्भात पर्याय दिसू लागेल. त्या पर्यायावर क्लिक करा आणि झालं! जेंव्हा तो आपला कॉल स्विकारेल, आपलं संभाषण सुरु होईल. जगाच्या पाठिवर कुठेही राहणार्या आपल्या मित्राला आपण अशाप्रकारे कॉल करु शकाल. आंतरराष्ट्रिय कॉलसाठी तर निश्चितपण ही पद्धत अतिशय स्वस्त (मोफत म्हटलंत तरी चालेल) आहे.
जवळपास मोफत, अत्यंत स्वस्त राष्ट्रिय, आंतरराष्ट्रिय फोनवरुन फोनवर कॉल |
मी असा अनुभव घेतला आहे की, अशा कॉलमध्ये आवाजाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. मला केवळ संभाषणात १ सेकंदाचे अंतर पडत असल्याचे दिसून आले. पण ही फार काही मोठी समस्या नाही, आणि नेहमीच असं होईल, असंही काही नाही. जर आपण आपल्या मोबाईलवर अनलिमिटेड ब्रॉडबँडचे वाय-फाय कनेक्शन वापरत असाल, तर कनेक्शनच्या गती संदर्भात काहीच समस्या उद्भवणार नाही आणि हे डाटा चार्जेसच्या दृष्टिनेही हे चांगलं आहे. Nimbuzz हे अॅप्लिकेशन आपल्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला कायमस्वरुपी सुरु ठेवण्यास काहीच हरकत नाही. जेणेकरुन कधीही असा इंटरनेट कॉल आला किंवा आपला मित्र चॅटवर आला, की आपला फोन वाजू लागेल.
अॅन्ड्रॉईड फोनसाठी Viber, Tango सारखे इतरही काही मोफत कॉल संदर्भात सेवा पुरविणारे अॅप्लिकेशन्स आहेत. पण त्यात Gtalk चा समावेश नाही. प्रत्यक्ष गुगलचे जे अधिकृत अॅप्लिकेशन आहे, त्यातही Gtalk कॉलिंगची सुविधा नाही. आणि आजकाल जवळपास आपल्या प्रत्येक मित्राचे जीमेल खाते असते, त्यामुळे Gtalk आणि पर्यायाने Nimbuzz वापरणेच अधिक सोयिस्कर ठरेल, असं मला वाटतं. कारण अशाप्रकारे आपण फोनवरुन संगणकावर देखिल कॉल करु शकतो. आणि शिवाय Nimbuzz हे एक ‘ऑल इन वन मेसेंजर’ देखिल आहे. इंटरनेट कॉलिंगव्यतिरीक्त स्वस्त VoIP कॉल करण्यासाठी देखिल Nimbuzz चा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.