भाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण

‘गुगल ट्रांसलेट’ ने भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन जगातील सर्व भाषिक लोकांची मोठीच सोय केली आहे. पण दुर्देवाने आपल्या मराठी भाषेत ‘गुगल ट्रांसलेट’ ची सोय अजून उपलब्ध झालेली नाहीये. पण काही हरकत नाही! पुढे मागे कधीतरी ती आपल्यासाठी उपलब्ध होईलच! सध्यातरी मराठीनंतर आपल्या जवळच्या भाषेत, म्हणजेच हिंदी भाषेत ‘गुगल ट्रांसलेट’ ची सुविधा उपलब्ध आहे. पण आजूनही ही सोय अगदीच प्राथमिक स्वरुपात असल्याचं जाणवतं. आणि यात सुधारणा करण्याची जबाबदारीही गुगलने लोकांवरच सोपवलेली आहे. म्हणजे समजा, हिंदी भाषेत भाषांतरित झालेले एखादे इंग्रजी पान जर नीट भाषांतरीत झाले नसेल, तर आपण स्वतः ते पान एडीट करुन गुगलला मदत करु शकतो. त्यामुळे येत्या पाच-दहा वर्षात भाषांतराचे आपोआप होणारे काम व्यवस्थित होऊ लागेल.

आता इंटरनेटवरचे कोणतेही इंग्रजी पान आपल्याला हिंदीत रुपांतरीत करायचे असेल, किंवा कोणतेही हिंदी पान इंग्रजी भाषेत रुपांतरीत करायचे असेल, तर त्यासाठी आपण ‘गुगल ट्रांसलेट’ चे बटण आपल्या इंटरनेट वेब ब्राऊजर वर घेऊ शकतो. मला वाटतं गुगलच्या ऑफिशिअल टुलबारवरही असं ट्रांसलेशनचं बटण देण्यात आलं आहे. आणि क्रोम वेब ब्राऊजरवरही ट्रांसलेशनची सुविधा नव्याने सुरु करण्यात आली आहे. एकंदरीत काय!? तर गुगल आपल्या साम्राज्यात ‘गुगल ट्रांसलेशन’ ची मोहिम जोरात राबवत आहे.

आपल्या संगणकावरील इंटरनेट वेब ब्राऊजरवर भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे ट्रांसलेशनचे बटण आपल्या टुलबारवर घेणे. हे करणं अगदीच सोपं आहे.

१. त्यासाठी या इथे जा. तिथे जगातल्या ५८ भाषांमध्ये ट्रांसलेशन बटण उपलब्ध आहे. त्यातल्या हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांचे आपल्याला ज्ञान आहे. क्वचित प्रसंगी काही लोकांना याव्यतिरिक्त इतर काही भाषांचेही ज्ञान असू शकते.
२. ठिक आहे! तर समजा तुम्हाला हिंदी भाषा येते! अशावेळी हिंदी भाषेच्या ‘नावा’वर आपल्या माऊसचा कर्सर आणा, लेफ्ट क्लिक दाबून धरत ते नाव उचला आणि आपल्या वेब ब्राऊजरच्या वरच्या बारमध्ये टाकून द्या. अगदी असंच तुम्ही इंग्रजी आणि अन्य भाषांच्याही बाबतीत करु शकता.

भाषांतरित करा, भाषांतर करा

३. आता इंटरनेटवरील कोणतेही इंग्रजी पान तुम्ही उघडले आणि तुम्हाला ते हिंदी भाषेत वाचायचे असेल, तर केवळ ब्राऊजरच्या वरच्या बारमधील ‘हिंदी’ या बटणावर क्लिक करा. तुमचं पान भाषांतरित होईल. अगदी असंच उलट पद्धतीने हिंदी-इंग्रजी भाषांतरच्या बाबतीत सांगता येईल.
४. याबाबतीत मी खास करुन फायरफॉक्स वेब ब्राऊजरची शिफारस करेन.
५. या बटणा व्यतिरिक्त या इथे ही ‘गुगल ट्रांसलेट’ ची सुविधा उपलब्ध आहे. शेजारी त्याचे चित्र दाखवलेले आहे. यावरुन मला माझा मागचा एक लेख आठवला तो या इथे आहे.

ट्राय करुन पाहा! ही सुविधा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. पण ती सक्षम होण्याकरिता आपले सहकार्य आवश्यक आहे, त्याकरिता आपण आपले योगदान देऊ शकता.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.