मराठी पुस्तकांचे ऑनलाईन दुकान
नोंद – ‘ग्रंथायन’ ही साईट बंद झाल्याने हा लेख कालबाह्य ठरत आहे. लवकरच ‘ऑनलाईन मराठी पुस्तक खरेदी’ बाबत अद्ययावत लेख लिहिण्यात येईल.
तब्बल २०,८५५ मराठी आणि १,१६,९०१ इंग्रजी पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथायन हे ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. तुम्हाला जर ही मराठी वेबसाईट पाहायची असेल तर ती इंटरनेट एक्स्प्लोरर वरुनच पहावी लागेल.
चरित्र, कविता, कादंबरी, बालवाड.मय, आहार, आत्मचरित्र, ललित, राजकीय, कथा, विनोदी, आरोग्य, ईतीहास, नाटक, वॆचारीक, अर्थ, अनुवादीत इत्यादी अनेक विभागांमध्ये त्यांनी या हजारो मराठी पुस्तकांची विभागणी केली आहे. तुमच्या आवडीच्या विभागानुसार तुम्ही उपलब्ध पुस्तकांची यादी आणि त्या प्रत्येकाची किंमत पाहू शकता. प्रत्येक पुस्तकाच्या लेखाकाचे आणि त्याच्या प्रकाशकाचे नाव त्या पुस्तकाच्या खालीच दिलेले आहे.
जर तुम्ही किमान ५०० रु. ची पुस्तके विकत घेतलीत, तर ती तुम्हाला कोणत्याही अतिरीक्त खर्चाशिवाय घरपोच मिळतील. आणि खरं सांगायचं म्हणजे आजकाल दोन-तीन पुस्तकं घ्यायची म्हटलं, तरी सहजच ५०० रु. च्या वर खर्च होऊन जातो. सगळ्यात चांगली बाब म्हणजे तुम्ही पुस्तकाचे पैसे नंतर… म्हणजे ती प्रत्यक्ष तुमच्या हातात पडल्यानंरही देऊ शकता. आणि जर तुम्हाला क्रेडिट कार्डने पैसे द्यायची ईच्छा असेल तर तशीही सोय उपलब्ध आहे.
तुम्ही एखाद्या पुस्तकाबद्दल जर कुठं वाचलं वा ऐकलं असेल आणि ते वाचण्याची तुमची खूप दिवसांपासूनची ईच्छा असेल, तर ग्रंथायन हे त्या पुस्तकाचा शोध घेण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.