माझा ब्लॉग आणि सध्याचे विचार
टेक्नॉलॉजी वर लिहिणार्या मराठी ब्लॉगर्सची साखळी म्हणजेच नेटवर्क तयार करण्याबाबत मी विचार करत आहे. परवाच मी अशा प्रकारचे भारतीय इंग्रजी ब्लॉगर्सचे नेटवर्क पाहिले, जे टेक्नॉलॉजीबाबत लिहितात. याचे दोन फायदे होऊ शकतात, एक म्हणजे मराठी वाचकांना टेक्नॉलॉजीबाबतचे लेख एकत्र वाचायला मिळतील आणि मराठी ब्लॉगर्सना जास्त वाचक मिळतील.
पण यात एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे, प्रत्येक ब्लॉगरची मराठी पोस्ट टाकण्याची एक फ्रिक्वेंसी असते आणि त्यानुसार त्याची वाचकसंख्या ठरते. आता ज्या ब्लॉगर्सची वाचकसंख्या अधिक आहे, त्यांना असं वाटणं साहजीक आहे की, मी माझ्या कष्टांचा फायदा दुसर्याला का मिळवून देऊ!? आणि हे अगदी बरोबर आहे!
मराठी ब्लॉग विचार |
पण जर नेटवर्क मधील समावेशाबाबत ऍलेक्सा रँकिंकद्वारे आपण काही नियम लावू शकलो, तर कदाचीत असे नेटवर्क तयार होऊ शकेल. किंवा आपण असंही करु शकतो की, साखळीतील ब्लॉगरने महिन्याला कमीतकमी १५ लेख तरी प्रकाशीत करावेत आणि त्याचा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वात समाविष्ट असावा! म्हणजे हा अजूनतरी फक्त एक विचारच आहे… याबाबत माझं स्वतःचंच मत अजून नक्की नाही.
2know.in ची फिड पूर्ण करावी का!? याबाबतही मी सध्या विचार करत आहे. माझ्या ‘मनात राहिलं मन एक’ या कवितेच्या ब्लॉगची फिड आधिपासूनच पूर्ण स्वरुपात उपलब्ध आहे. मराठीसाठी ऍडसेन्स चालत नाही, ही एक मोठी समस्या सध्या मराठी झेलत आहे. कारण मग फिड मधूनच जाहिराती देऊन फिड पूर्ण देणं हे कधीही सोपं गेलं असतं. फिडद्वारे जर संपूर्ण लेख वाचकापर्यंत पोहचू लागला, तर तो वाचक आपल्या वेबसाईटवर येईल का!? फिड पूर्ण देण्याआधी याबाबत आभ्यास करण्याची गरज आहे. ऍडसेन्सच्या जाहिराती दिसाव्यात म्हणून इंग्रजी मिश्रित मराठी ब्लॉग तयार ‘न’ करण्याबाबत मात्र मी ठाम आहे.
2know.in वर मोफत छोट्या जाहिरातींना परवानगी द्यावी का!? हाही एक विचार माझ्या मनात अधूनमधून डोकावून जातो. याबाबतही मी लवकरच निर्णय घेईन. पण अजून तसं काही नक्की नाही. कारण अशा छोट्या जाहिराती घेतल्या, तर त्या पानात कोठे द्यायच्या!? याचा मला आधी विचार करावा लागेल.
आपल्या मनातही मराठी ब्लॉगच्या सुधेरणेबाबत आणि उत्कर्षाबाबत काही कल्पना असतील किंवा आपल्या स्वतःच्या ब्लॉगबाबत काही विचार असतील किंवा माझ्या ब्लॉगबाबत मला काही सुचवायचे असेल, तर त्यासाठी आपला कॉमेंट बॉक्स आहे. त्यानुसार सुधारणा करण्याचा किंवा पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.