वर्ड डॉक्युमेंट PDF मध्ये बदला

दोन दिवसांपूर्वी आपल्या एका वाचकाने मला याबाबत प्रश्न विचारला होता. खरं तर वर्ड डॉक्युमेंट PDF फाईल मध्ये बदलण्यासाठी, कन्व्हर्ट करण्यासाठी अनेक ऑनलाईन सेवा आहेत, त्याबाबत मदत करणारे सॉफ्टवेअर्सही आहेत, पण मी स्वतः यासाठी एक अगदी सोपी पद्धत वापरतो. मी गुगल डॉक्स या गुगलच्या सेवेचा याकामात उपयोग करतो. त्यासाठी काय करावं लागेल!? ते मी आता एक एक करुन पुढे सांगणारच आहे.

आपल्याला जर याबाबत गुगल शिवाय इतर ऑनलाईन सेवा हवी असेल, तर आपण गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये word to pdf converter online किंवा online word to pdf converter अशा प्रकारे शोध घेऊ शकता. आपल्याला त्याबाबतच्या अनेक वेबसाईट्स सर्च रिझल्ट्स मधून दिसून येतील.

वर्ड डॉक्युमेंट

PDF साठी गुगल डॉक्स चा वापर :
१. docs.google.com वर जा.
२. Create New – Document.
३. आता या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या संगणकावरील वर्ड डॉक्युमेंट कॉपी आणि पेस्ट करा किंवा थेट गुगलच्या डॉक्युमेंटमध्ये लिहायला सुरुवात करा.
४. आता तुमचे डॉक्युमेंट गुगल डॉक्स वर आहे, असे मी गृहित धरतो.
५. File – Download As – PDF
६. तुमची फाईल संगणकावर PDF स्वरुपात साठवली गेली असेल.

PDF साठी ऑनलाईन सेवा :

PDF फाईल

doc2pdf.net
pdfonline.com/convert-pdf
freepdfconvert.com
fastpdf.com
expresspdf.com
इ. काही वेबसाईट्स आहेत ज्या आपल्याला ऑनलाईन वर्ड डॉक्युमेंट टू PDF फाईल कन्व्हर्जनसाठी मदत करतील. या वेबसाईट्सवर गेल्यानंतर आपल्याला आपले वर्ड डॉक्युमेंट संगणकावरुन इंटरनेटवर ऑनलाईन घेण्यासाठी Browse हा पर्याय दिसून येईल. Browse या बटणावर क्लिक करा आणि वर्ड डॉक्युमेंट संगणकावरुन निवडा. त्यानंतर convert (कन्व्हर्ट) या पर्यायाद्वारे आपले वर्ड डॉक्युमेंट PDF फाईल मध्ये कन्व्हर्ट होईल. आता हे नव्याने तयार झालेली PDF फाईल संगणकावर डाऊनलोड करुन घेण्यासाठी तयार असेल.

तर या आहेत काही सोप्या पद्धती, ज्या आपल्याला वर्ड डॉक्युमेंट PDF फाईल मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, बदलण्यासाठी वापरता येतील.

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.