सिगेट बॅकअप प्लस आणि एक्सपांशन हार्ड डिस्क मधील फरक
हार्ड डिस्कमध्ये आपल्याकडील डेटा साठवण्याची दोन प्रमुख कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे आपल्याजवळील अगदी महत्त्वाच्या फाईल्सचा बॅकअप असावा म्हणून आपण हार्डडिस्कचा वापर करतो. फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर गरजेच्या फाईल्स साठवण्यासाठी एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरली जाते. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे काही मोठ्या फाईल्स असतात, ज्या आपल्या संगणकामधील हार्ड डिस्कची जागा व्यापुन टाकतात. उदाहरणार्थ, चित्रपट, व्हिडिओ, इत्यादी. अशाप्रकारे बाह्य हार्ड डिस्क उपयुक्त ठरु लागल्याने आणि तिची किंमत कमी होऊ लागल्याने लोक १ टेराबाईट (टीबी) क्षमतेची हार्ड डिस्क घेणे पसंत करु लागले आहेत.
साधारण १००० जीबी मिळून १ टीबी बनतो. हजारो डॉक्युमेंट्स आणि शेकडो चित्रपट साठवायला १ टीबी मेमरी पुरेशी आहे. हार्ड डिस्कच्या संदर्भात बोलायचं झालं तर ‘सिगेट’ हा सर्वांत चांगला आणि लोकप्रिय असा ब्रँड आहे. सिगेट बॅकअप प्लस आणि सिगेट एक्सपांशन अशा सिगेटच्याच दोन प्रकारच्या १ टीबी हार्ड डिस्क आहेत. या दोघांची किंमतही जवळपास सारखीच आहे. आणि अगदी हीच गोष्ट हार्ड डिस्क खरेदी करत असताना अनेक लोकांना बुचकळ्यात पाडते. सिगेटने जवळपास सारखीच किंमत असणार्या १ टीबी हार्ड डिस्कच्या दोन आवृत्या का निर्माण केल्या असाव्यात? सिगेट बॅकअप प्लस आणि एक्सपांशन हार्ड डिस्क मधील फरक काय आहे? या दोन हार्ड डिस्क मधील फरक जाणून घेण्यासाठी आपणास त्यांमध्ये तुलना करावी लागेल.

१ टीबी सिगेट बॅकअप प्लस आणि सिगेट एक्सपांशन हार्ड डिस्क मधील फरक आणि तुलना
आता आपण सिगेट बॅकअप प्लस आणि एक्सपांशन मधील तुलना करुयात. बॅकअप प्लस हार्ड डिस्क सोबत आपणास एक बॅकअप सॉफ्टवेअर मिळते. या बॅकअप सॉफ्टवेअरमुळे आपोआप बॅकअप घेतला जाण्याचा पर्याय आपणास मिळतो. शिवाय या सॉफ्टवेअरच्या डॅशबोर्डवरुन थेट फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबवर आपण आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करु शकतो.
सिगेट बॅकअप प्लस १ टिबी हार्ड डिस्क |
आपणास या दोन हार्ड डिस्कच्या आकारातही फरक दिसून येतो. सिगेट बॅकअप प्लसचा अकार हा १२३.४ x ८१.१ x १४.५ मिमी. इतका आहे, तर सिगेट एक्सपांशनचा आकार १२८.१ x ८९.१ x १५.५ मिमी. इतका आहे. सिगेट बॅकअप प्लसचे वजन हे २२४ ग्रॅम आहे आणि सिगेट एक्सपांशनचे वजन २७० ग्रॅम आहे. यावरुन हे लक्षात येतं की सिगेट बॅकअप प्लस हार्ड डिस्क ही आकाराने अधिक लहान आणि हलकी आहे.
हा दोन हार्ड डिस्कमधील आणखी एक महत्त्वाचा फरक या दोन हार्ड डिस्कच्या वॉरंटीच्या कालावधीमध्ये आहे. बॅकअप प्लसला ३ वर्षांची वॉरंटी आहे, तर एक्सपांशनची वॉरंटी ही २ वर्षांच्या कालावधीकरीता आहे. या दोन्ही हार्ड डिस्क USB ३.० कनेक्टीव्हिटी सपोर्ट करतात. याचा अर्थ संगणकावरील फाईल्सचे आदानप्रदान हे या दोन्ही हार्ड डिस्क मध्ये अधिक आणि सारख्याच वेगाने होऊ शकेल. या दोन्ही हार्ड डिस्कना बाहेरुन पॉवर सप्लाय देण्याची गरज नाही. या अगदी एखाद्या पेन ड्राईव्ह (पोर्टेबल) प्रमाणे काम करतील.
या दोन हार्ड डिस्कच्या किंमतीमध्ये केवळ थोडासा फरक आहे. सिगेट बॅक अप प्लस हार्ड डिस्कची किंमत ही सिगेट एक्सपांशन प्लस हार्डा डिस्कच्या तुलनेत थोडीशीच अधिक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेतल्यानंतर मला असं वाटतं की, आपण सिगेट बॅक अप प्लस हार्ड डिस्कचीच निवड करावी.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.