२जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी
आपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक्शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं खूपच स्वस्त आहे. ३जी डेटा नेटवर्कची गती ही अधिक असते, पण त्याचप्रमाणात ते महागही आहे. त्यामुळे सध्यातरी ३जी इंटरनेटचा मनसोक्त वापर करणं शक्य नाही. यु ट्युब वर व्हिडिओ पाहणे, ऑलाईन गाणी ऐकणे, असा इंटरनेटचा मनमुराद आनंद घेणं हे अनलिमिटेड इंटरनेट प्लॅनच्या माध्यमातूनच शक्य आहे. चांगली गोष्ट ही आहे की, २जी इंटरनेटचे प्लॅन हे इतके स्वस्त आहेत, की आपल्याकडे अमर्याद २जी इंटरनेट डेटा आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आज आपण २जी मोबाईल डेडा कनेक्शनचा वापर करुन आपल्या स्मार्ट फोनवर जवळपास कोणतेही हिंदी गाणे कसे ऐकू शकतो? ते पाहणार आहोत. हे फारच सोपं आहे. पण त्यासाठी आपल्याकडे एक अँड्रॉईड फोन किंवा आय फोन असणं आवश्यक आहे. अर्थात एक चांगला २जी इंटरनेट डेटा प्लॅन आपल्या मोबाईलवर कार्यान्वित असणं हे तर गरजेचं आहेच. त्यानंतर आपल्याला आपल्या स्मार्ट मोबाईल फोनवर Saavn हे अॅप्लिकेशन इंन्स्टॉल करावं लागेल. ते आपल्याला या इथे मिळेल – saavn.com/mobile. किंवा आपल्या स्मार्ट फोनच्या अॅप्लिकेशन मार्केट मध्ये जाऊन तिथे Saavn हे अॅप्लिकेशन सर्च करा, त्यानंतर ते आपल्या मोबाईलवर इंन्स्टॉल करुन घ्या.
सावन अॅप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनवर घेतल्यानंतर ते उघडा. आपण जर हे अॅप्लिकेशन ३जी कनेक्शनच्या माध्यमातून किंवा ब्रॉडबँड वाय-फाय च्या माध्यमातून वापरणार असाल, तर काहीच समस्या नाही. आपल्या हवे ते गाणे आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय ऐकू शकाल, कारण ३जी आणि ब्रॉडबँड कनेक्शनची गती अधिक असते. पण आपण जर २जी कनेक्शन वापरत असाल, तर मात्र एखादे गाणे अखंड ऐकण्याकरीता आपल्याला त्या अॅप्लिकेशनमध्ये थोडीशी सेटींग करावी लागेल.
२जी इंटरनेटचा वापर करुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी कशी ऐकता येतील?
२जी मोबाईलवर ऑनलाईन गाणी |
मी असं गृहित धरतो की आपण आपल्या मोबाईलवर सावन हे अॅप्लिकेशन उघडलेलं आहे. आता आपल्या फोनचं Menu हे बटण दाबा. त्यानंतर Settings मध्ये शिरा. तिथे Mobile Data Streaming संबंधीत सेटींग आपल्याला करायची आहे. Mobile Data Streaming वर क्लिक करा. इथे Songs Quality Settings मध्ये चार पर्याय आपल्या समोर आहेत. High Quality, Medium Quality, Low Quality आणि Poor Quality. यातील हाय क्वालिटी हा पर्याय केवळ ३जी आणि ब्रॉडबँड कनेक्शनसाठी उपयुक्त आहे. आपण जर २जी कनेक्शन वापरत असाल, तर उरलेल्या तीन पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करण्यास हरकत नाही. पण आपण या इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे २जी इंटरनेटची गती ही स्थळ आणि काळानुरुप बदलत राहते. तेंव्हा आत्ता आपल्या २जी इंटरनेटची गती कशी आहे? त्यानुसार क्वालिटीची निवड करा. कधी आपण मिडियम क्वालिटीची अखंड गाणी ऐकू शकतो, तर कधी आपल्याला लो क्वालिटीवरच समाधान मानावे लागेल. पण या पर्यायांचा वापर करुन आपण २जी नेटवर्कच्या माध्यमातूनदेखील आपल्या मनातील कोणतेही हिंदी गाणे ऑनलाईन ऐकू शकाल.
आपल्याला हवे असे प्रत्येक गाणे आपल्या फोनच्या मेमरी कार्डवर असेलच असे नाही. तेंव्हा त्या गाण्याचा आनंद आपण ऑनलाईन स्ट्रिमिंगच्या माध्यमातून घेऊ शकतो.
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.